Jump to content

वनिता बोराडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वनिता जगदेव बोराडे
भारत सरकार द्वारा सर्वोच्च भारतीय महिला नागरी सम्मान 'नारी शक्ती-राष्ट्रपती पुरस्कार' प्रदान सोहळा, राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली.
जन्म २५ मे, १९७५ (1975-05-25) (वय: ५०)
नायगाव देशमुख
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा सर्पमित्र
प्रसिद्ध कामे ५१,००० सापांना जीवनदान दिल्याच्या विश्वविक्रमाची नोंद
मूळ गाव बोथा
ख्याती जगातील प्रथम महिला सर्पमित्र, सर्पतज्ञ, सर्परक्षक म्हणून सुप्रसिद्ध
धर्म हिंदू
पुरस्कार

 • 

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार,
 • नारी शक्ती पुरस्कार


वनिता जगदेव बोराडे ह्या सोयरे वनचरे मल्टीप्रपोज फाउंडेशन संस्थे च्या संस्थापक अध्यक्ष असून वने, वन्यजीव, निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात संरक्षण, संवर्धन व संशोधन करणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला सर्पमित्र सर्पतज्ञ तथा सर्परक्षक व सरीसृप शास्त्रज्ञ आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी त्यांना सलग तिसऱ्यांदा नामांकन प्राप्त झाले आहे. वन्यजीव समाजसेविका म्हणून त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्था नासा ने त्यांना सदस्यत्व देऊन त्यांचा सचित्र कार्य वृत्तांत मिशन २०२६ च्या मंगळ-यानामध्ये रेखांकित केले आहे. सोबतच यावर्षी Moon Mission चंद्रयानातही त्यांच्या या कार्याबद्दल सचित्र कार्य वृत्तांत छापण्यात आला असून बोर्डिंग पास व ॲप्रिसिएशन प्रमाणपत्रही ही नासा तर्फे त्यांना प्रदान करण्यात आले आहे.

वनिता जगदेव बोराडे ह्या जगातील प्रथम महिला सर्परक्षक, सर्पमित्र व सर्पतज्ञ आहेत. त्यांनी ५१००० पेक्षा जास्त सापांना लोक वस्तीतील संकटग्रस्त भागातून पकडून जंगलात सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान देण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. यामुळे सापांचा व लोकांचा जीव वाचला आहे. वने, वन्यजीव, निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात त्या समाजसेविका म्हणून संरक्षण, संवर्धन व संशोधनासोबतच त्या शास्त्रीय वैज्ञानिक प्रबोधन कार्य करीत आहेत. भारत सरकार द्वारे त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या आधी भारतीय डाक विभागाने त्यांच्या सेवा कार्याच्या सन्मानार्थ टपाल तिकीट जारी केले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रीय सेवा सन्मान पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. महाराष्ट्र शासना तर्फे छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. पर्यावरण हेच प्राणसंजीवन हे ब्रीद घेऊन त्यांनी सोयरे वनचरे मल्टिपर्पज फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेची स्थापना केली असून विविध उपक्रम राबवित आहेत. जागतिक तापमान वाढ व प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी त्या कृतीशील जनजागरण मोहीम राबवत आहेत. जीव, जमीन, जल व जंगल यांची जैवविविधता साखळी संतुलित राखण्यासाठी त्या भारतात व भारताबाहेरही सोयरे वनचरे मल्टिपर्पज फाउंडेशन संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणात जनजागरण कार्य करीत आहेत.

वन्यजीव व सर्प संरक्षण कार्य

[संपादन]

वनिता बोराडे ह्यांचा जन्म श्री जगदेव उदैभान बोराडे ह्या शेतकरी कुटुंबात झाला. वयाच्या १० व्या वर्षापासूनच आपल्या बाल मित्र मैत्रिणींच्या सोबत शेतात रानात जंगल व नदी मध्ये त्यांना निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याची कला सहज काळात न काळात शिकता आली वडील जगदेव बोराडे हे धार्मिक व शाकाहारी होते. आपले आदिवासी बाल मित्र आणि मैत्रिणी नदी मधील खेकडे आणि मासे, झाडांवरील पक्षी तसेच मधमाश्यांच्या पोळ्यातील मध गोळा करतात, तीक्ष्ण शास्त्रांनी झाडाच्या सालींना खरचटून त्यातील डिंक गोळा करतात इतकेच काय सुंदर हरीण, ससे, मोर, रोही, रान डुकरे यांना ही मारून खातात. फक्त पोटाची भूक भागविण्यासाठी आपले आदिवासी मित्र-मैत्रीण व त्यांचे कुटुंबियन प्राणी व वनस्पती यांचा जीव घेतात ह्या गोष्टीने वानिताच्या संवेदनशील बाल मनाला खूप दुख व्हायचे. अगदी लहान वयापासूनच त्या लोकांना शुद्ध शाकाहारी जेवण उपलब्ध करून देण्याकरिता आपल्या घरातील स्वयंपाक भाजी-भाकरी, चटणी-ठेचा-लोणचे, कधी-कधी सणासुधी प्रसंगी घरी बनविलेली पुरणपोळी व गोडधोड पदार्थही आपल्या बाल मित्रांमध्ये वाटप करायची, त्यांना आवडीचा खाऊ आणि खेळणी ही द्यायची. हळू हळू त्यांची मांसाहाराची ओढ तिने वेगवेगळे उपक्रम राबवून कमी केली. गावामध्ये बाल हरिपाठ मंडळ स्थापन करून बाल भजनी मंडळ सुरू केले, वारकरी संप्रदायाची माळ त्यांच्या गळ्यात घालून त्यांना शाकाहारी बनविले. नदीमध्ये जाळे लावून पकडलेले मासे या मित्रांकडून परत घेऊन वनिता नदीमध्ये सोडून द्यायची, या जाळ्यामध्ये अडकलेले साप हे पाण साप असून त्यांनी चावा घेतला तर काहीही होत नाही असा आदिवासी लोकांचा गैरसमज असल्याने हे सापही ते पाण्यात सोडून द्यायचे त्यांचे हे पाहून पाहून वनिताही सापांना मास्यांच्या जाळ्यातून मोकळे करून हाती घेऊन जिवंत सोडून द्यायला शिकली व इथेच तिच्या सर्प संरक्षण कार्याचा शुभारंभ झाला. आदिवासी लोकांनी पकडलेले जंगली प्राणी, हरीण, मोर, ससे, त्यांना अन्न, वस्तू, खेळणी, प्रसंगी पैसे देऊन हे प्राणी परत घ्यायचे व जंगलात सोडून द्यायचे व अश्याप्रकारे वन्यजीव व सर्प संरक्षण कार्य वानितांने बाल वयातच सुरू केले. हे आजरोजी लहानपणी छंद म्हणून जोपासलेले काम वनिताने वयाच्या विविध टप्प्यावर अविरतपणे सुरू ठेवले.जगातील सर्वात जास्त विषारी आणि बिनविषारी साप पकडून जिवंत जंगलात सोडून सापांचा आणि लोकांचा प्राण वाचवून ५१००० पेक्षा जास्त सापांना वाचवून जीवदान देत विश्वविक्रम प्रस्थापित केला म्हणूनच वनिता आज जगातील पहिली महिला सर्परक्षक म्हणून ओळखली जाते. वर्ल्ड किंग- वर्ल्ड रेकॉर्ड युनियन ने वनिताला प्रमाणपत्र देऊन टोप १०० वर्ल्ड किंग २०२३ म्हणून होशीत केले या कामगिरीचा सन्मानपूर्वक समावेश वर्ल्ड किंग वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये करणात आला आहे.[]

सर्पसंरक्षण :- 

[संपादन]

भारतीय संविधानाने सापांना कायदेशीर संरक्षण दिलेले आहे. साप जैवविविधता साखळीचा महत्त्वपूर्ण घटक आहे निसर्ग आणि पर्यावरण यांच्या संतुलनासाठी तो जिवंत राहणे गरजेचे आहे, साप उपद्रवी उंदीर प्राण्यांना नियंत्रित करतो, त्यांची बेसुमार उत्पत्ती होऊ नये म्हणून त्यांना खातो व स्वतःची उपजीविका करतो यामुळे शेतीतील व गोडाऊन मधील अन्नधान्याची नासाडी वाचविता येते. उंदीर संसर्गजन्य आजार पसरवितात जसे की प्लेग त्यामुळे उंदीर आणि घुशी वर नैसर्गिक नियंत्रण सापांमुळे शक्य होते. उंदीर आणि घुशींना खाण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील शेतकरी उसाच्या शेतात मोठमोठे अजगर पाळतात, आपल्या भारत देशात सर्प विषयक वैज्ञानिक व जीवशास्त्रीय पर्यावरण पूरक उपयुक्त माहितीचा प्रचार प्रसार झाला नाही त्यामुळे अंधश्रद्धा व सापांची भीती पसरल्या गेल्यामुळे लोक सापांची नाहकच हत्या करतात प्रभावी जनप्रबोधन व वैज्ञानिक जनजागरण करून आपण सापांना वाचवू शकतो, साप संरक्षित वन्यजीव सरपटणारे प्राणी या प्रवर्गात येतात येत असून सापांची शिकार अथवा हत्या गंभीर अपराध आहे तो पर्यावरणीय निसर्गचक्राचा जैवविविधतेचा महत्त्वपूर्ण घटक तर आहेत शिवाय तो आपली राष्ट्रीय संपत्ती आह. सापांच्या नष्टप्राय होत जाणाऱ्या प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी जे हाताच्या बोटावर मोजता येतील इतके थोडेच लोक कार्य वीत आहेत या सर्वांच्या एक अग्रगण्य नाव आहे सर्पमित्र वनिता बोराडे, जगातील पहिल्या सर्प रक्षक ५१ हजार पेक्षा जास्त विषारी, बिनविषारी, निमविषारी सापांना लोकांच्या चावडीतून सुटका करून तिने वाचविले, सुरक्षित सापांना पकडून नंतर वन विभागात नोंदणी करून सर्वांना जंगलातील नैसर्गिक अधिवासात सोडून दिले या क्षेत्रात अशा प्रकारे विश्वविक्रम प्रस्थापित करणारी वनिता जगातील पहिली महिला ठरली आहे वन्यजीव संरक्षण कार्य करताना याचे सुसंबद्ध शास्त्रीय प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. वनिताला आदिवासी मागासवर्गीय ग्रामीण खेडे विभागात हे प्रशिक्षण कोण देणार? परंतु या प्रश्नाचे उत्तर वनिताला या परंपरेतच मिळाले, आदिवासी बांधवांमध्ये जे अनेक सहासी गुण आहेत, त्यामध्ये शिकार करताना ते या गुणांची परीकाष्ठा करतात अथवा पोटाला अन्न मिळणार नाही. अनवाणी पावलांनी डोंगरदऱ्यांत घनघोर दाटीच्या वृक्षवल्लीच्या जंगलात दिवसा सुद्धा जिथे झाडाझुडपामुळे-वेलींच्या उंच झाडीमुळे सूर्यकिरणे जमिनीपर्यंत पोहोचतच नाहीत व अंधार पसरतो या अंधार वाटेने सुद्धा ते आदिवासी निडरपणे काट्याकुपाट्याची परवा न करता सराईतपणे चपळाईने चालतात वेळप्रसंगी धावतात, जंगलभ्रमंती जणू त्यांच्या जीवनाच्या उपक्रमाचा एक भाग असतो गिर्यारोहण तर सततची प्रक्रिया अशातच उड्या घेणे भराभर झाडावर चढणे हे सारे कसब साहसी कृत्य जीवनाचा दररोज चा भाग आहे म्हणूनच वनिता आज अभिमानाने सांगते की मी हे सर्व कौशल्य संरक्षण प्रशिक्षण कळत नकळत आदिवासी  बालमित्रांकडून शिकले, बालसवंगडी व त्यांचा परिवार यांचे मला बालपणी जे सानिध्य मिळाले सोबत लाभली त्यामुळेच त्यांचे बघून बघून मी हे सहजच शिकत गेले, मी सुद्धा एक परिपूर्ण आदिवासी बालिका झाली, म्हणूनच मी आज या नैसर्गिक कलांचा वारसा माझ्या आधुनिक जीवनातही जपत आहे मी सध्या झाडावर चढू शकते, नदी डोहात पोहू शकते, अनवाणी पायाने जंगल भ्रमंती करू शकते, ससे-हरिण यांचा पाठलाग करणे घोरपडी-साप यांना बिळातून बाहेर काढणे, मध गोळा करणे हे सारे काही मी दररोज माझ्या आदिवासी बाल सवंगड्यांकडून शिकली आहे. आज विहिरीत उतरणे, झाडावर साप पकडणे, जमिनीतील-बिळातील साप खोदून बाहेर काढणे ह्या सर्व कला मी सहज करू शकते, आज जिथे सापांपासून लोकांना व लोकांपासून सापांना धोका असेल, तिथे मी दोघांचा जीव वाचावा त्यांना मदत व्हावी या उद्देशाने धावून जाते सापांचा व लोकांचा जीव वाचविणे हेच माझे मुख्य कार्य आहे यामुळे बऱ्याचदा माझा जीव मला धोक्यात घालावा लागतो परंतु मी स्वइच्छेने हा धोका पत्कारते कारण यामुके वन्यजीव संरक्षण घेऊन पर्यावरण व निसर्ग यांचे संतुलन राहते. वन्यजीव संरक्षण संवर्धन करण्यासोबतच आज मी या क्षेत्रात जे जे यश संपादन केले आहे या सर्वांचे श्रेय माझ्या बालपणीच्या सर्व आदिवासी बांधवांना जाते मानवाच्या बेसुमार उद्योगीकरणाचा सर्वप्रथम फटका हा निकोप पर्यावरणाला बसतो, पर्यावरणाचे प्रदूषण झाल्याने आज त्सुनामी, भूकंप, वनवे, जागतिक तापमान वाढ, वादळे या सोबतच संसर्गजन्य विषाणूग्रस्त आजार हे सारे मानवाच्या मुळावर उठले असून हे असेच सुरू राहिले तर मानवी अस्तित्त्व धोक्यात येईल.

एवढी मोठी सद्यस्थिती पर्यावरणाची हानी होत आहे. संरक्षण,संवर्धन व संशोधन या तीनही स्तरावर पर्यावरणाचे कार्यकर्त्यांना जल, जमीन, जीव, जंगल, आकाश, वायुमंडल हे आपण निर्माण करू शकत नाही. नद्या, पर्वते, खनिजे यांचे आपण संवर्धन केले नाही तर हा नैसर्गिक उत्पादन स्वरूप संपुष्टात येईल व याची पुनर्निर्मिती शक्य नसल्याने आज संवर्धन करणे हे आधुनिक काळाची गरज आहे. असंख्य वनस्पती, प्राणी, पक्षी हे पाण्याचे गोड जलस्रोत, अनियंत्रित व बेसुमार वापरामुळे नष्टप्राय होत आहेत. पाण्याचे संवर्धन होणे, जलसाठे निर्माण करणे, भूजल पातळी अबाधित राखणे, नद्या जोड प्रकल्प राबवून वाहत जाणारे गोडे पाणी जमिनीत जिरवणे, यासाठी आपण जर प्रयत्न करत राहिलो नाही तर भविष्यात वन्यप्राण्यासोबतच मानवाच्या ही पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आणि पर्यावरण तज्ञ व शास्त्रज्ञ यांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की भविष्यातील तिसरे महायुद्ध हे फक्त पिण्याच्या पाण्यासाठी होईल म्हणून निसर्गाचा असमतोल वाचविणे निसर्ग नियंत्रित संतुलित राखणे त्याचे संरक्षण संवर्धन करणे हे आज संशोधनाच्या दृष्टीने जरी आव्हानात्मक काम असेल तरी आपल्या पुढच्या पिढ्या सुरक्षित करण्यासाठी नितांत आवश्यक आहे यामुळेच जल, जमीन, जीव, जंगल, वन्यप्राणी आणि मानव या सर्वांचे सौख्य, सर्वांचे अस्तित्त्व अबाधित राहील म्हणूनच यासाठी आजच प्रतिबंधात्मक उपाय करणे; म्हणजेच संवर्धन करणे आहे. सापांच्या नष्टप्राय होत जाणाऱ्या प्रजातींचे संवर्धन करण्यासाठी कृत्रिम अंडे उगवण केंद्र सुरू करून त्यांचे प्रजाती या माध्यमातून जतन करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत, प्रौढ मादी सापांचे व त्यांच्या पिल्लांचे व्यवस्थित संवर्धन व्हावे म्हणून विशेष काळजी केल्या जाते. सापांवर उपचार करून त्यांच्या प्रजाती वाचवण्यासाठी पशुवैद्यकीय चिकित्सालय या सर्वांच्या मार्फत त्यांच्या नोंदी ठेवणे, त्यांची चिकित्सा करून त्यांचे आजार नियंत्रित करणे, दुर्मिळ सापांच्या जातींच्या संरक्षण साठी स्थानिक आदिवासी शोधून त्या अधिवासात त्यांच्या पुनर्प्रजनासाठी वातावरणाची आणि तापमानाची काळजी राखणे या सर्व गोष्टी सोयरे वनचरे संवर्धन केंद्रामार्फत राबविल्या जात आहेत यासाठी सर्प शास्त्रज्ञांची सर्प अभ्यासकांची सोबतच वन्यप्राणी आणि वैद्यकीय काळजी करणाऱ्या अधिकाऱ्यांची मोठी चमुच सोयरे वनचरे फाउंडेशन ने कार्यरत केली असून वन्यप्राणी तथा पशु अनाथालय स्थापन केली आहे. यामध्ये अपघातग्रस्त प्राणी, जखमी आणि बेवारस वन्यजीव या सर्वांची तात्पुरती देखभाल करण्यासाठी पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या निगराणीची चमू अविरत कार्यरत आहे आणि यासाठी वन्यप्राणी रक्षक रुग्णवाहिका सातत्याने फिरतीवर ठेवून जिथे कुठे वन्यप्राण्यांच्या अपघात झाले असतील तेथून त्यांना ताबडतोब या पशुअनाथालयापर्यंत घेऊन येण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यरत करण्यात आलेली आहे.

सर्प जनजागृती प्रचार प्रसार अभियान / सर्पमाहिती वैद्यानिक कार्यशाळा []

[संपादन]

संपूर्ण भारत देशात सापांच्या, विषारी, बिनविषारी, निमविषारी अश्या तीन प्रकारच्या प्रजातींमध्ये विविध प्रकारचे एकूण ३६२ साप आढळतात, याव्यतिरिक्त समुद्री साप ही किनारपट्टी वर आढळून येतात, दरवर्षी भारत देशात लाखो लोक सर्पदंशाने लाखो लोक मृत होतात. यामध्ये चुकीच्या पद्धतीने होणारे गावठी उपचार, अंधश्रद्धा युक्त प्रायोगिक प्रथमोपचार, अतिविलंबाने होणारे वैद्यकीय उपचार तसेच ज्याभागात सर्पदंश जास्त होतात त्या भागात निष्णात सर्पदंशतज्ञ डॉक्टरांचा अभाव ही जशी प्रमुख करणे आहेत, याच जोडीला सापाबद्दल असणारी प्रचंड भीती, अज्ञान आणि खूप खोलवर मनात बिंबविलेल्या अंधश्रद्धांचा प्रभाव कारणीभूत आहे. मागील हजारो वर्षांपासून सापांविषयी चुकीच्या माहितीचा प्रचार प्रसार काही देवाधीकांच्या कथा, कहाण्या, धार्मिक-प्रथा तथा धर्मग्रंथांमधून कादंबऱ्या, नाटक, चित्रपट ते आधुनिक मनोरंजांच्या दृकश्राव्य माध्यमांमधून निव्वळ मनोरंजनाच्या नावाखाली बेसुमार अवैद्यानिक, अंधश्रद्धा मूलक माहितीचा, भडीमार समाज मनावर करण्यात आल्याने लोकांमध्ये चुकीचे गैरसमज आणि अंधश्रद्धा फोफावल्या आहेत. यांचा संपूर्ण बिमोड करून लोकांमध्ये वैद्यानिक माहितीचा प्रचारप्रसार करणे अनिवार्य आहे. सर्पदंशामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून सर्प जनजागृतीचा प्रचार प्रसार करीत सापांविषयी शिक्षण प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करून सर्प माहितीचे वैद्यानिक प्रबोधन करण्यासाठी सोयरे वनचरे फौंडेशन संपूर्ण भारतात विविध राज्यांमध्ये सर्प जनजागृती यात्रा आणि कार्यशाळांचे आयोजन करून अभियान राबवत आहे. याद्वारे शालेय विद्यार्थी, ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर, विविध सरकारी विभागांतर्गत काम करणारे, कृषी, आरोग्य, महसूल, गृह तथा पोलीस विभाग पर्यटन आणि आणि वनविभाग यांच्या कर्मचारीवृद यांनाही शिक्षण प्रशिक्षण देण्यात येते, यामुळेच आता सापांना अवास्तव घाबरण्यापेक्षा, मारण्यापेक्षा किंवा अवास्तव त्यांची भीती बाळगून त्यांची हत्या न करता त्यांना वाचविण्यासाठी आता लोकांची मानसिकता तयार होत आहे, साप हा माणसांचा शत्रू नसून मित्र आहे ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण केली जात आहे. प्रशिक्षणा दरम्यान लहान लहान मुले ही सहज सापांना हाताळतांना दिसतात, तेव्हा मोठी माणसे आश्चर्यचकित होतातत्यांच्या मनावर परिणाम होतो कि आपण विनाकरण या सापांची भीती बाळगून त्यांची हत्या करीत होतो त्यांचे मनापारीवर्तन झाल्याने ते आता मला सापांची खरी माहिती झाली आहे, मी कधीच सापाला मारणार नाही अशी मनोमन प्रतिज्ञा करतात. मग सापांना वाचवायचे कसे ? तर सापांविषयी सत्य वैज्ञानिक माहिती त्यांना कार्याशालेतून देण्यात येते, प्रतिबंधात्मक उपाय समजाविण्यात येतात, सापांना सुरक्षितरित्या पकडून नैसर्गिक अधिवास्तात सोडून देण्याचे प्रशिक्षण ही देण्यात येते, सर्पदंश प्रथोमोपचार ही शिकविले जातात. सापांविषयी कायदेशीर प्रबोधन करून भारतीय संविधानाने सापांना कायदेशीर संरक्षण दिले असून सापांची हत्या करणे, त्यांचे दात, दात, विष काढून व्यापार करणे, शिकार करून त्यांचा छळ करून त्यांची कातडी सोलून त्यांची हाड, मांस, त्वचा विकणे हे सर्व गैरकृत्य असून बेकायदेशीर आहे. सापांची हत्या करणे गंभीर गुन्हा आहे. सापांना वाचवा त्यांना जीवदान द्या, साप हा निसर्ग पर्यावरण, यांचा महत्वपूर्ण घटक असून जैवविविधता साखळीत तो निसर्ग संतुलनाचे महत्वपूर्ण कार्य करतो. सर्प भारतीय साप हे संरक्षित सरपटणारे वन्यजीव असून त्यांना कायदेशीर संरक्षण आहे. सर्प माहिती कार्यशाळेत विविध प्रचार प्रसार साहित्य जसे कि, भिंतीपत्रके, सचित्र माहिती पुस्तके, सापाविषयी वैज्ञानिक माहिती देणारे सखोल पुस्तके, सर्प माहितीची वैज्ञानिक दिनदर्शिका आणि दृक-श्राव्य माहितीपट, लघुपट या सर्वांची निर्मिती करणे हे सर्व प्रचार प्रसार साहित्य सर्प माहिती अभियान राबवून संपूर्ण देशातील विविध राज्यांमधील गावोगाव पोहोचविणे हे महत्त् कार्य सोयरे वनचरे फौंडेशन द्वारा भारतात आणि भारता बाहेर सर्पमित्र वनिता बोराडे करीत आहेत. त्या विविध राष्ट्रीय अंतराष्ट्रीय पर्यावरणवादी तथा प्राणीरक्षक संस्था संघटनांच्या आजीवन सदस्य असून त्यांचे प्रतिनिधित्व करीत आहेत, त्यांचे साप आणि वन्यजीव संरक्षण आणि जनजागरण कार्य आज संपूर्ण जगासमोर आज आदर्श उदाहरण आहे.

सर्पदंश प्रतिबंधात्मक उपाय आणि नव-संशोधन

[संपादन]

भारतामध्ये दरवर्षी अडीच लाख ते साडे सात लाख लोक (2.5 ते 7.5 %) केवळ सर्पदंशामुळे मुत्युमुखी पडतात. सापांविषयीची भिती, अंधश्रद्धा, गैरसमजुती तसेच वैज्ञानिक माहितींचा अभाव व उपचार साधन सामुग्रीची अत्यल्पता प्रतिबंधात्मक व प्रथमोपचारात्मक बाबींचा प्रचार प्रसार लोकाभिमुख न झाल्याने हे सर्पदंश मुत्युचे प्रमाण जागतिक तुलनेत भारतात सर्वाधिक आहे. आपल्या देशात जगातील सर्वात जास्त बिनविषारी साप आढळतात. तरी सुद्धा केवळ अज्ञानामुळे व पारंपारिक आणि गावठी उपचारामुळे लोक दवाखान्यात जाऊन वैद्यकिय उपचार घेताना काही प्रमाणातच दिसून येतात. धार्मिक व घरगुती उपचारात अतिविलंब झाल्याने दवाखान्यात दाखल झालेले रुग्ण डॉक्टरांना उपचार करून वाचविणे शक्य होत नाही. या हतबल परिस्थितीमुळे नुसता साप दिसताक्षणी लोकांना दरदरून घाम फुटतो आणि प्रचंड भीतीमुळे जिवाचा थरकाप होतो.सुईच्या टोकाप्रमाणे तीक्ष्ण दात आणि पाण्याच्या थेंबाप्रमाणे असणारे विष हे हत्तीसारख्या प्राण्यांचाही तडकाफडकी जीव घेते, तिथे मानवाची काय गोष्ट! विषारी सर्पदंश म्हणजे साक्षात मुत्यू !! यमाशी दोन हात ! जीवन मरणाची प्राणांतिक झुंज आणि यामध्यमातून दुर्दैवाने विजयी होतो तो सापच ! अख्खी मानव जात या विषारी सर्पदंशाने हादरून सोडली आहे. या पृष्ठभुमीवर सर्पमित्र वनिता बोराडे यांचे अँटीस्नेक व्हेनमची प्रोव्हॅक्सीन हे संशोधन महत्वपूर्ण ठरते. सर्पसंरक्षण संवर्धन व प्रबोधनासोबतच सर्पसंशोधन करून वनिता बोराडे ही प्रतिसर्प विषाची पूर्वप्रति लस ही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गरोदर माता व शिशु यांच्या लसीकरणासाठी संशोधित करीत आहे. या सर्पविष प्रतिबंधात्मक लसीमुळे सर्पदंशबाधीत रुग्णांना रोग प्रतिकारशक्ती मातेच्या गर्भातच प्राप्त झाल्याने सर्पदंश उपचारासाठी 96 तास (चार दिवसाचा) वेळ मिळणार आहे.[] त्यामुळे सर्पदंशाने कोणाचाही तडकाफडकी (तात्काळ) मुत्यू होणार नाही.

जगामध्ये सर्वाधिक विषारी साप हे ऑस्ट्रेलिया देशात असून, तेथे सर्पदंश मृत्यूचे प्रमाण हे जगात सर्वात कमी आहे; मात्र भारतात बिनविषारी साप जगात सर्वात जास्त असूनही आपल्या येथे सर्पदंश मृत्यू जागतिक तुलनेत सर्वाधिक आहेत. कारण सर्पसंशोधन क्षेत्रात सरीसृप शास्त्रज्ञांना संर्पदंश उपचारावर प्रभावीपणे यश मिळविता आले नाही. योग्य औषधाचा अभाव आणि रुग्णांसाठी त्याचे नियोजन बारगळल्याने सर्पदंश मृत्यू हे सातत्याने वाढत आहेत. वनिता बोराडे यांनी दृढ संकल्प करून ही उणीव भरून काढण्यासाठी अथक परीश्रम चालविले आहे. ग्रामिण भागात वास्तव्य, जेमतेम दहावीपर्यंतचे शिक्षण आणि साधनसामुग्रीचा तुटवडा, तज्ज्ञ मार्गदर्शक व प्रायोगिक पातळीवर सहकार्य होईल, असे कोणतेही पाठबळ नसताना केवळ आपली जिद्द, निरिक्षण, अनुभव व यातून प्राप्त झालेले ज्ञान यांच्या जोरावर वनिता बोराडे यांनी जगातून सर्पदंश मृत्यूची भीती भविष्यात कायमची दूर करण्याचा विडा उचलला आहे. प्राथमिक संशोधन करून याचे रितसर पेटंट त्यांच्या सोयरे वनचरे संस्थेच्या माध्यमातून स्वतःच्या नावावर नोंदविले आहे. या संशोधनाचे प्राथमिक चाचणी नमुने, भारतीय औषध आणि आयुर्विज्ञान संस्था यांच्याकडे पाठवून जागतिक आरोग्य संघटनेलाही ते परवानगीसाठी प्रस्तावित केले आहे. या कार्यासाठी आवश्यक असलेली जैव-वैज्ञानिक प्रयोगशाळेची मागणी त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे. याचा रितसर प्रस्ताव उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उच्च व तंत्रशिक्षणसंचलायाकडे सुपूर्द केला. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , सुप्रसिद्ध समाजसेवक विजय वरुडकर हेदेखिल उपस्थित होते. सर्पप्रतीलसीची पूर्व प्रतीलस ही जगासाठी नवी आशादायी, हमखास प्राणदायी व नवसंजीवन देणारी साबित होणार आहे. वनिता बोराडे यांच्या या संशोधनाला आज जागतिक मान्यता मिळाली असल्याने महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मागील सलग चार वर्षापासून त्यांना शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन प्राप्त झाले आहे, ही बाब भारतासह आशिया खंडासाठीही अभिमानास्पद आहे. केवळ साप पकडून सोडण्यापेक्षा जे प्रबोधन आणि जनजागरण आपण करतो, त्याला संशोधनाची जोड देत याही क्षेत्रामध्ये वनिता बोराडे यांनी आपल्या सर्पसंशोधन कार्याचा ठसा उमटविला आहे.

पुरस्कार / सन्मान

[संपादन]
  • 79 व्या स्वतंत्रदिन महोत्सव निमित्त महामहीम राष्ट्रपती श्रीमती. द्रौपदी मुर्मू यांच्याशी भेट प्रसंगी
    ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्पमित्र वनिता बोराडे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सन्मानित करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
  • वन्यजीव संरक्षणासाठीच्या त्यांच्या योगदानास राष्ट्रपतींनी आदर्श ठरवत सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले[].
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी त्यांना सलग तिसऱ्यांदा नामांकन प्राप्त झाले आहे.
  • भारतातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार पद्मश्री पुरस्कार २०२१ साठी नामांकन प्राप्त.
  • नारी शक्ती पुरस्कार[]
  • युनायटेड नेशनन्स विश्वशांती परिषदेच्या सदस्य.
  • वर्ल्ड कॉस्टुटिशन अँड पारल्मेंट असोशियन यु.नो. अमेरीका यांच्याकडून आजीव सदस्यत्व.
  • गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, लिमका बुक ऑफ रेकार्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड कडून यांच्याकडून ५१,००० सापांना जीवदान देण्याच्या विश्वविक्रमाची अधिकृत नोंद.[]
  • भारतीय डाक विभागाकडून सन्मानार्थ टपाल टिकीट जारी.[]
  • सामाजिक वनीकरण,वन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडून प्रतिष्ठेचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्रदान.
  • आजीव सदस्य पिपल फॉर ॲनिमल, नवी दिल्ली.
  • जगातील पहिल्या महिला सर्परक्षक, सर्पतज्ञ, सर्ममित्र म्हणून घोषित.[]
  • संस्थापक अध्यक्ष सोयरे वनचरे मल्टिपर्पज फाऊंडेशन बोथा.
  • आजीव सदस्य महा एन्जीओ फेडेशन पुणे.
  • आजीव सभासद / महिला राज्य सचिव आखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य.
  • जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ.
  • राष्ट्रीय सेवा सम्मान २०२१:- महामहिम राज्यपाल श्री.भगतसिंग कोश्यारी (महाराष्ट्र राज्य) यांनी जागतिक महिला दिनाच्या अवचित्यावर वने,वन्यजीव,निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात केलेल्या सेवाभावी कार्याच्या सन्मानार्थ राजभवन मुंबई येथे "राष्ट्रीय सेवा सम्मान पुरस्कार" देऊन महाराष्ट्र शासनाकडुन शासकीय सत्कार केला.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Home - Worldkings - World Records Union". worldkings.org. 2024-07-15 रोजी पाहिले.
  2. ^ a b सामान्य संदर्भ
  3. ^ "७५ व्या स्वतंत्रदिनानिमित्त सर्पमित्र वनिता बोराडे यांना राष्ट्रपतीचे निमंत्रण".
  4. ^ "राष्ट्रपति ने सांप को रेसक्‍यू करने वाली देश की पहली महिला बचावकर्ता वनिता जगदेव को दिया नारी शक्ति सम्‍मान". oneindia.com. ९ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "FIRST WOMAN SNAKE RESCUER" (इंग्रजी भाषेत). 2021-02-02 रोजी पाहिले.
  6. ^ "सर्पमित्र वनिता बोराडे यांच्या सन्मानार्थ डाक विभागाने जारी केले टपाल तिकीट". सामना. 2020-02-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-04 रोजी पाहिले.
  7. ^ "51 हजार सांपों से है इस महिला की दोस्ती, करती है इनके साथ सैर". आज तक (हिंदी भाषेत).
  8. ^ "सर्पमित्र वनिता बोराडे यांना राष्ट्रीय सेवा सम्मान पुरस्कार". तरुण भारत. 2021-09-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १७ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.