Jump to content

अलप्पुळा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख अलप्पुळा जिल्ह्याविषयी आहे. अलप्पुळा शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

अलप्पुळा किंवा अलेप्पी ह्यानावाने प्रसिद्ध ठिकाण (Alappuzha / Aleppy) हा भारताच्या केरळ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र अलप्पुळा येथे आहे.

अलप्पुळा जिल्हा

[संपादन]

हा एक प्रसिद्ध पर्यटनक्षेत्र म्हणून विकसीत होत असलेला केरळ राज्यातील एक जिल्हा आहे ज्याच्या चोहीकडे जलाशय आहेत व पाण्याने व्यापलेल्या आहेत.अलप्पुळा हे बॅकवॉटर्सेसाठी अतिशय प्रसिद्ध असून तिथे होणाऱ्या वार्षिक नेहरू ट्रॉफी बोट रेस पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते.ह्या जिल्ह्याला नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभले आहे.पूर्वे कडे मोठा वेंबनाड तलाव तर पश्विमेला बारीक वाळूची किनारपट्टी आणि त्यात येऊन समुद्रात मिसळणाऱ्या नद्या,पाण्य़ाचे प्रवाह,वाळूचे दांडे,लहान झरे ,तलावांच्या श्रुंखला आणि दाट नारळाची वनराई ह्याने संपूर्ण जिल्हा मोहक दिसतो.अर्चनकोविल,पांब,मणिमाला ह्या जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत.वेंबनाड तलावाचे क्षेत्रफळ एकूण २०४ किमीआहे जे अलप्पुळा ते कोच्ची आणि तिथून कायमकुळम तलाव साधारण ५९ चौ.किमी आणि तिथून पुढे हाच तलाव कोल्लम पर्यंत विस्तारीत जातो. ह्या तलावांचा वापर जिल्ह्यांतर्गत वाहतूकीसाठी होतो. अलप्पुळा जिल्हा ख्रिस्तधर्मीयांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. चेर्तला तालूक्यातील कोक्कोमंगळम चे चर्च हे संत थॉमस ह्यांनी निर्माण केलेल्या येशू ख्रिस्तांच्या १२ अनुयायांपैकी एकाचे आहे आणि तसेच ते खूप प्राचीन आहे अशी मान्यता आहे.अलप्पुळा हे प्राचीन काळापासून एक खूप मोठे व्यापारी केंद्र आहे.ते नारळापासून निर्मित वस्तूंसाठी खूपच प्रसिद्ध आहे.

अलप्पुळा

[संपादन]

अलप्पुळा ला पूर्वेकडील व्हेनिस असेही संबोधतात त्यामुळेच ते खूपच प्रसिद्ध पर्यटनकेंद्र बनले आहे. अलप्पुळा हे नौकाशर्यत,नौकागृह,किनारे,बॅकवॉटर्स ,समुद्री वस्तू आणि नारळ निर्मित वस्तू ह्यांसाठी प्रसिद्ध आहे.

इतर प्रेक्षणीय ठिकाणं

[संपादन]

चतुःसीमा

[संपादन]

तालुके

[संपादन]

The panchayats in the district are Arookutty, Aroor, Aryad, Chennam Pallippuram, Cherthala South, Ezhupunna, Kadakkarappally, Kanjikkuzhi, Mannanchery, Mararikulam North, Mararikulam South, Kodamthuruth, Kuthiathode, Muhamma, Thaikattussery, Thanneermukkom, Thuravoor, Panavally, Pattanakkad, Perumbalam, and Vayalar.

The municipalities in the district are Alappuzha, Cherthala, Chengannur, Kayamkulam and Mavelikkara