विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/शंका

लघुपथ: विपी:छाया, विपी:चित्र, विपी:संचिका
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुयोग्य चित्र वापरा [ चित्र हवे ] प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)







चित्रे आणि खात्याबाबत माहिती हवी आहे.[संपादन]

  • छायाचित्रे चढवताना ती विकीकॉमन्स वर चढवण्याचे काय फायदे होतात?
छायाचित्रे विकिबुक्स,विक्शनरी,विकिक्वोट इत्यादी सहप्रकल्पात त्याच नावाने सहज वापरता येतात एवढेच नाही तर इतर भाषिय विकिपीडीयातसुद्धा सहज वापरता येतात .प्रत्येक विकिप्रकल्पात चित्रे पुन्हा-पुन्हा चढवण्याचे duplicationचे काम टळते.
प्रताधिकार विषयक अधीक प्रगल्भ माहिती आणि पाठबळ देण्यात सध्यातरी तेथील सदस्य अधीक वाकबगार आहेत.
वर्गीकरणातही तेथे सहाय्य बरे पडते.
विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे या समन्वय प्रकल्पातही काही माहिती आढळू शकेल.
  • त्यासाठी इंग्रजी विकीवर सदस्यत्व असणे आवश्यक आहे का? की मला मराठी खात्यातूनच हे काम करता येईल?
आपण मराठी विकिपीडियावरचेच खाते तेथे वापरू शकता.त्या सहप्रकल्पातील Special:Preferences म्हणजेच # "(विशेष:पसंती|माझ्या पसंती) "त केवळ मराठी भाषा पुन्हा एकदा निवडून आपण सुचालन मराठी विकिपीडिया प्रमाणेच मराठीतून करू शकता.
तेथील इतर सहाय्य पानांचे पण मराठीत भाषांतर होणे आणि करणे जरूरी आहे पण संपादन (माणूस) बळा अभावी बाकी आहे.


  • माझे मराठीवरचे खाते मी हिंदी किंवा इंग्रजी विकीवर वापरु शकतो का? अशी खाती जोडता येतात का?
होय आपण मराठीवरचे खाते सर्व विकिसहप्रकल्पात वापरू शकता (पूर्वी हि सोय नव्हती पण आता आहे).माझ्या पसंतीतुमच्या एकत्रीत खात्याच्या पसंती बदला ((Manage your global account) येथे अधीक सहाय्य उपलब्ध असते

काही तांत्रीक अडचणीच्या शक्यता (तुमचे सदस्य नाव यूनिक वाटते त्यामुळे खालील अडचणी तुम्हाला येण्याची शक्यता कमी आहे.):

केवळ अपवाद काही जुन्या खात्यांना हे करणे जमत नाही कारण त्याच नावाचे खाते इतर विकिवर आधीकुणी तयार केलेले असेल तर जमत नाही. अशी अडचण मराठी विकिपीडीयाचे एक सदस्य J यांना मेटा प्रकल्पात आली कारण तीथे एक फ्रेंच विकिपीडियातून आलेले J आधीच सक्रीय होते; अशा अडचणी हिंदी, मराठी,नेपाळी विकिपीडियावरील देवनागरी सदस्य नावे एक सारखी असली आणि दोघेही तीसर्‍या विकिपीडियात गेले तर जो आधी जाईल त्याला खाते मिळत असावे.अशाबाबतीत दुसर्‍या विकिपीडियावर जाणार्‍यास नवीन खाते बनवून त्याचे मुळ विकिपीडियातील खात्यांशी एकत्रीकरण करण्याची सोय उपलब्ध असावी असे वाटते .कदाचित अभय नातू याबद्दल आधिक सांगू शकतील असे वाटते.

माहितगार १५:०५, ३० जून २०१० (UTC)

धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
सौरभदा १२:३६, ३० जून २०१० (UTC)~~