समस्थानिके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अणुक्रमांक, अर्थात प्रोटॉनांची संख्या समान असून अणुभार मात्र भिन्न असणाऱ्या अणूंना त्या मूलद्रव्याची समस्थानिके (अन्य मराठी नावे: समस्थानीय[१]; इंग्लिश: Isotope, आयसोटोप ;) असे म्हणतात. समस्थानिकांच्या अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या समान असली, तरीही अणुकेंद्रातील न्यूट्रॉनांची संख्या भिन्न असल्यामुळे त्यांच्या अणुभारांत तफावत आढळते. उदाहरणार्थ, प्रोटियम (१ प्रोटॉन, ० न्यूट्रॉन), ड्यूटेरियम (१ प्रोटॉन, १ न्यूट्रॉन) आणि ट्रिशियम (१ प्रोटॉन, २ न्यूट्रॉन) ही हायड्रोजनची समस्थानिके आहेत. प्रोटियमलाच आपण हायड्रोजन म्हणून ओळखतो.

संदर्भ[संपादन]

  1. (इ.स. १९६९) गो.रा. परांजपे: वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा. महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ. (मराठी मजकूर) 

बाह्य दुवे[संपादन]



Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.