जड पाणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

जड पाणी म्हणजे असे पाणी ज्यामध्ये हायड्रोजनच्या एक किंवा दोन्ही अणूंच्याऐवजी ड्युटेरियमचे अणू वापरलेले असतात.

हायड्रोजन या मूलद्रव्याचे एकूण तीन प्रकार आहेत. निसर्गातील अनेक संयुगांचा घटक असणाऱ्या हायड्रोजनच्या अणुकेंद्रात एक प्रोटॉन असून एक इलेक्ट्रॉन त्याच्याभोवती फिरत असतो. हायड्रोजनच्या दुसऱ्या प्रकाराला ड्यूटेरिअम असे नाव आहे. ड्यूटेरिअमच्या अणुकेंद्रात एक प्रोटॉन व एक न्यूट्रॉन असे दोन कण असतात व एकच इलेकट्रॉन या अणुकेंद्राभोवती भ्रमण करतो. हायड्रोजनच्या तिसऱ्या प्रकारात अणुकेंद्रामध्ये एकंदर तीन कण असतात, एक प्रोटॉन व दोन न्यूट्रॉन. या अणुकेंद्राभोवतीसुद्धा एकच इलेक्ट्रॉन फिरत असतो. हायड्रोजनचे हे दुसरे दोन प्रकार निसर्गात सापडत नाहीत. ड्युटेरियम आणि ऑक्सिजन यांच्या संयोगातून निर्माण होणाऱ्या पाण्याला ’जड पाणी’ असे नाव आहे.