आघूर्ण
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
आघूर्ण[१], अर्थात मोटन[२] (इंग्लिश: Torque , टॉर्क ;) म्हणजे एखाद्या वस्तूला अक्षाभोवती किंवा बिजागरीभोवती फिरवणारी बलाची प्रवृत्ती होय. सहसा नुसते बल एखाद्या वस्तूस ढकलते किंवा ओढते; तर आघूर्ण वस्तूला पिळते.
गणितीय सूत्रानुसार बल आणि परिबलभुजा, म्हणजे वस्तूचा अक्षापासून बल लावलेल्या बिंदूपर्यंतचे अपसरण, यांचा सदिश गुणाकार म्हणजे आघूर्न होय. सदिश गुणाकारामुळे अर्थातच ही राशी सदिश असते.
यांमध्ये
- τ हे सदिश आघूर्ण असून τ हे आघूर्णाचे परिमाण आहे,
- r हा अपसरण सदिश आहे (आघूर्ण मापण्याच्या बिंदूपासून बल लावलेल्या बिंदूपर्यंतचा सदिश), and r हे त्या अपसरणाचे परिमाण आहे,
- F हा बल सदिश असून, and F त्या बलाचे परिमाण आहे,
- × सदिश गुणाकाराचे चिन्ह आहे,
- θ हा बल सदिश व अपसरण सदिश यांमधील कोन आहे.
[संपादन] संदर्भ
- ↑ (इ.स. १९८१) भौतिकशास्त्र परिभाषा कोश. भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन, पृ. १०५६. (मराठी मजकूर)
- ↑ (इ.स. १९८८) यंत्र अभियांत्रिकी परिभाषा कोश. भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन, पृ. ४४३. (मराठी मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |

