मिती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मिती (Dimention) म्हणजे कुठल्याही वस्तूची लांबी, रुंदी, उंची, आकारमान, परिमिती इत्यादी दर्शविण्यासाठी वापरले जाणारे मोजमाप अथवा प्रमाण होय. विज्ञानाच्या दृष्टीने द्विमिती आणि त्रिमिती अस्तित्वात आहेत. आइन्स्टाईनने Space काळ ही चौथी मिती असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. अशी चौथी मिती असल्याशिवाय अंतराळातील काळ-काम-वॆगाची गणिते सुटत नाहीत. मात्र या चौथ्या मितीबद्दल सामान्य माणूस फक्त कल्पनाच करू शकतो. [१]

या चौघांशिवाय अनेक मिती असतील, तथापि त्याचा वापर करण्याचे ज्ञान अद्याप माणसाला झालेले नाही. दृष्टी, आवाज आणि स्पर्श यातून तीन मितींचे ज्ञान होते. मानवी डोळ्यांची दृष्टी त्रिमिती आहे. स्ट्रिंग तत्त्वज्ञानानुसार अशा अनेक (दहा) मिती अस्तित्वात आहेत.

युक्लिडियन भूमिती ही सुरुवातीला फक्त द्विमिती भूमिती होती, तिचाच विस्तार होऊन करून पुढे त्रिमिती भूमिती आणि गोलाध्याय भूमिती (Spherical Geometry) विकसित झाली.

संख्याशास्त्रातील (Sample Technicsमधील) काही अडचणी सोडवण्यासाठी गणिताची बहुमिती (Multidimentional) भूमिती नावाची शाखा शिकावी लागते.

मिती म्हणजे तिथी[संपादन]

हिंदू पंचांगातील तारीख (तिथी) दाखवण्यासाठी मिती या शब्दाचा वापर होतो. कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकेत कार्यक्रम अमुक मितीला आहे असेच लिहिलेले असते. उदा० आज मिती आश्विन कृष्ण नवमी, शालिवाहन शके १९४० विलंब संवत्सरे शुक्रवार २ नोव्हेंबर २०१८ रोजी, विरार येथील जीवदानी देवीची अलंकार पूजा संपन्न झाली. किंवा, ऋणाली आणि सागर यांचा विवाह मिती षष्ठी, माघ कृष्ण पक्षे, शालिवाहन शके १९४१, शुक्रवार दि. १४/०२/२०२० रोजी सकाळी ११ वा. १६ मि. या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. या मंगल समयी वधुवरांस शुभआशीर्वाद देण्यासाठी आपली सहकुटुंब सहपरिवार उपस्थित प्रार्थनीय आहे, वगैरे.


हे ही पहा[संपादन]

अधिक माहिती[संपादन]

त्रिमितिदर्शन

  1. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/-/articleshow/6522184.cms