क्ष-किरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अ‍ॅना रॉंटजेन यांच्या हाताचे ऐतिहसिक हातात आंगठी असलेले क्ष-किरण छायाचित्र

(इंग्लिश भाषा:X-Rays) शास्त्रज्ञ विल्यम रॉंटजेन यांनी शाधलेली किरणे.

अनुक्रमणिका

[संपादन] क्ष-किरण

हे एक प्रकारचे विद्युतचंबकीय विकीरण असतात. यांची तरंगलांबी ०.०१ ते १० नॅनोमीटर पर्यंत असते. वारंवारिता ही ३० पेंटाहर्ट्झ ते ३० एक्साहर्ट्झ इतकी असते. क्ष-किरणांची तरंगलांबी गॅमा किरणांपेक्षा कमी व अतिनिल किरणांपेक्षा जास्त असते.

[संपादन] शोध

विल्यम रॉंटजेनने क्ष-किरणांचा शोध लावला असे मानले जाते, परंतु क्ष-किरणांवर संशोधन आधीपासून चालु होते. फक्त विल्यम रॉंटजेनने त्याची माहिती व्यवस्थितपणे विस्तृत केली. विल्यम रॉंटजेनच्या आधी जोहॉन हित्रोफ, Ivan Pulyui, नोकोला टेस्ला, फरर्नंडो सॅनफोर्ड, फिलिप लेनार्ड यांनी यावर संशोधन केले होते. १८९५ मध्ये विल्यम रॉंटजेन याने प्रयोगशाळेत अल्फा किरणांचा अभ्यास करताना असे आढळून आले की काही न वापरलेल्या फोटोग्राफिक प्लेट काहीही न करता खराब झाल्या होत्या. त्यावेळी असे निदर्शनास आले की काही किरणे न दिसता असतात व ते वस्तूंच्या आरपार जातात. त्यांचे नामकरण 'क्ष' केले गेले.

[संपादन] उपयोग

[संपादन] वैद्यकीय

क्ष-किरण प्रतिमा घेण्याची पध्दती

[संपादन] क्ष-किरण प्रतिमा

वैद्यकीय व्यवसायात हाडांचे प्रतिमा (फोटो) घेण्यास याचा उपयोग होतो. आधुनिक निदान पध्दतीमध्ये वापरले जाणारे क्ष-किरण यंत्रणांमध्ये किरणोत्साराचा वापर होतो. शरीर न फाडता आतल्या हाडाला झालेली इजा क्ष-किरण प्रतिमेने तपासता येते.

[संपादन] सीटी स्कॅन

सीटी स्कॅनच्या साहाय्याने क्ष-किरणांचा वापर करून शरीराच्या आतील अवयवांची प्रतिमा मिळवली जाऊ शकते. जिथे नेहमीची क्ष-किरण प्रतिमा मिळू शकत नाही,(उदा. मेंदू) तिथे हाडांना भेदून अवयवांचे त्रिमिती प्रतिमा सीटी स्कॅनच्या साहाय्याने मिळू शकते.

[संपादन] अँजिओग्राफी

ह्रदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये क्ष-किरणांद्वारे दिसणारे रंग सोडून रक्तवाहिन्यांची भरण क्षमता तपासली जाते. याद्वारे रक्त वाहिन्यांतील अडथळे दिसून येतात.

[संपादन] संरक्षक

विमानतळावर किंवा इतर संवेदनशील ठिकाणी स्फोटकांची तपासणी करता क्ष-किरणांचा वापर केला जातो.

[संपादन] अंतराळ संशोधन

धूमकेतूचे क्ष-किरण छायाचित्र

चंद्रा दुर्बिणीमध्ये अंतराळात क्ष-किरण प्रतिमा प्राप्त करून संशोधन केले जाते.

[संपादन] औद्योगिक

औद्योगिक वापरा मुख्यतः धातूंचे जोडांतील छिद्रे शोधण्याकरिता वापर केला जातो.

[संपादन] हानीकारक घटक

क्ष-किरणाचा शोध लागून शंभराहून अधिक वर्षे झाली त्यांच्या किरणोत्साराची हानी कमी करण्याचे तंत्र विकसित झाले. पण तरीही त्याचा धोका गर्भवतीला किवा वाढत्या वयाच्या बालकांना अजूनही आहेच.

[संपादन] बाह्यदुवे

क्ष-किरणांचा शोध

क्षकिरणांचा इतिहास

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये