चुंबकीय ध्रुव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चुंबकीय ध्रुव[१], अर्थात चुंबकाग्रे (इंग्लिश: Magnetic dipole , मॅग्नेटिक डायपोल;) हे चुंबकाचे असे दोन विशिष्ट भाग असतात, ज्यांतून चुंबकीय बल बाहेर पडते किंवा ज्यांच्याकडे चुंबकीय बल आत जाते.

चुंबकाच्या ध्रुवांचे स्थान, आकार या गोष्टी चुंबकाच्या एकंदर आकारावर व संरचनेवर अवलंबून असतात. लांब चुंबकपट्टीवरील ध्रुव चुंबकपट्टीच्या अगदी टोकांजवळ असतात. त्यांना उत्तरदक्षिण ध्रुव अश्या नावांनी उल्लेखले जाते. चुंबकाचे दोन ध्रुव कधीही वेगळे करता येत नाहीत.

[संपादन] पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र व चुंबकीय ध्रुव

चुंबकीय द्विध्रुवाप्रमाणे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र दर्शवणारी आकृती. यात N (उत्तर) व S (दक्षिण) म्हणून दाखवलेले ध्रुव भौगोलिक ध्रुवांनुसार असून प्रत्यक्षातील चुंबकीय ध्रुव दर्शवण्याच्या रितीनुसार ते उलटे आहेत.

चुंबकाची सुई किंवा पट्टी हवेत टांगली असता अथवा तिच्या गुरुत्वमध्याशी एखाद्या टोकदार वस्तूवर तोलली असता चुंबकाचा उत्तर ध्रुव पृथ्वीची उत्तर दिशा दाखवितो आणि चुंबकाचा दक्षिण ध्रुव पृथ्वीची दक्षिण दिशा दाखवितो. पृथ्वीचे चुंबकीय ध्रुव याविरुद्ध असतात.

[संपादन] संदर्भ

  1. (इ.स. १९८१) भौतिकशास्त्र परिभाषा कोश. भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन, पृ. ५९०. (मराठी मजकूर) 


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये