सरोवर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
कॅस्पियन समुद्र हे जगातील सर्वात मोठे सरोवर मानले जाते.
सरोवर (किंवा तलाव) हा पृथ्वीवरील गोड्या अथवा खाऱ्या पाण्याचा मोठ्या आकाराचा साठा आहे. सरोवरे पूर्णपणे जमिनीने वेढलेली असतात व कोणत्याही समुद्राचा भाग नसतात. आकाराने सरोवरे तळ्यांपेक्षा बरीच मोठी असतात व त्यांमधील पाणी साधारणपणे संथ असते.[१][२]
अनुक्रमणिका |
उल्लेखनीय सरोवरे [संपादन]
- मिशिगन-ह्युरॉन सरोवर हे एकत्रित सरोवर जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे: १,१७,३५० वर्ग किमी. जर ही सरोवरे वेगळी धरली तर सुपिरियर सरोवर ( ८२,४१४ चौरस किमी) हे सर्वात मोठे सरोवर आहे. ३,९४,२९९ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेला कॅस्पियन समुद्र हे बऱ्याच वेळा जगातील सर्वात मोठे सरोवर मानले जाते.
- सायबेरियामधील बैकाल सरोवर हे जगातील सर्वात खोल सरोवर आहे. ह्याची कमाल खोली १,६३७ मी इतकी तर सरासरी खोली ७४९ मी आहे. तसेच हे घनफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे (२३,६०० किमी३, परंतु कॅस्पियन समुद्रापेक्षा (७८,२०० किमी३) लहान आहे.
- ६६० किमी लांबी असलेले टांजानिका सरोवर हे जगातील सर्वात लांब सरोवर आहे.
- बैकाल सरोवर हे जगातील सर्वात जुने सरोवर आहे.
- ओजोस देल सालादो हे आन्देसमधील ज्वालामुखी सरोवर हे कोणत्याही प्रकारचे जगातील सर्वात उंच सरोवर आहे (उंची: ६,३९० मीटरs ( फूट)).[३]
- तिबेटमधील मानसरोवर हे जगातील सर्वात उंच गोड्या पाण्याचे सरोवर आहे.
- ३,८१२ मी ( फूट) उंचीवर असलेले टिटिकाका सरोवर हे आन्देसमधील पेरू व बोलिव्हियाच्या सीमेवरील सरोवर जगातील सर्वात उंच जलवाहतूकयोग्य सरोवर मानले जाते. तसेच हे दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठे सरोवर आहे.
- इस्रायल व जॉर्डन देशांच्या सीमेवरील मृत समुद्र हे जगातील सर्वात कमी उंचीवरील सरोवर आहे. हे सरोवर समुद्रसपाटीच्या ४१८ मी ( फूट) खाली आहे.
- ह्युरॉन सरोवराला जगातील सर्वात लांब किनारा (२,९८० किमी) लाभला आहे.
खंडांनुसार मोठी सरोवरे [संपादन]
सर्व खंडांमधील मोठी सरोवरे (क्षेत्रफळाच्या दृष्टीने):
- आफ्रिका - व्हिक्टोरिया सरोवर
- अँटार्क्टिका - वोस्तोक सरोवर (गोठलेले)
- आशिया - बैकाल सरोवर (कॅस्पियन समुद्राला सरोवर मानले तर ते युरेशियामधील सर्वात मोठे सरोवर असेल.)
- ओशनिया - एर सरोवर
- युरोप - लदोगा सरोवर
- उत्तर अमेरिका - सुपिरियर सरोवर.
- दक्षिण अमेरिका - टिटिकाका सरोवर
स्म्दर्भ [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- सरोवरांचा डेटाबेस
- सरोवरांचे वर्गीकरण
- जगातील सर्वात रम्य सरोवरे - हफिंग्टन पोस्ट