झांझिबार
| झांझिबार Zanzibar |
||
| टांझानियाचा स्वायत्त प्रदेश | ||
|
||
झांझिबारचे टांझानिया देशामधील स्थान |
||
| देश | ||
| राजधानी | झांझिबार शहर | |
| क्षेत्रफळ | २,६४३ वर्ग कि.मी. | |
| लोकसंख्या | १०,७०,००० | |
झांझिबार (उच्चार:zænzɨbɑr;फारसी:زنگبار - झंगीबार/जंगीबार, गंजलेला किनारा;अरबी:زنجبار - झंजिबार)हा पूर्व आफ्रिकेतील टांझानिया देशाचा एक स्वायत्त प्रदेश आहे. हा प्रदेश हिंदी महासागरातील टांझानियाच्या किनाऱ्यापासून २५-५० किमी दूर झांझिबार द्वीपकल्पावर वसला आहे. उंगुजा (ज्याला रोजच्या वापरात झांझिबार संबोधले जाते) व पेंबा ही ह्या द्वीपकल्पातील प्रमुख बेटे आहेत. झांझिबारच्या दक्षिणेला कोमोरोस व मायोत, आग्नेयेला मॉरिशस व रेयूनियों व पूर्वेला सेशेल्स ही बेटे आहेत.
इतिहास [संपादन]
येथील गुलाम, लवंग, दालचिनी, मिरे इत्यादी मसाल्याच्या पदार्थांच्या शेतीमुळे झंझिबारला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. पोर्तुगीज व अरब शोधक येथे शोध युगादरम्यान दाखल झाले. अठराव्या व एकोणिसाव्या शतकात झंझिबारवर ओस्मानी साम्राज्याची सत्ता होती. त्यानंतरच्या काळात ब्रिटिश साम्राज्याने झांझिबारवर कब्जा करून तेथे आपली विशेष वसाहत स्थापन केली. १९६३ साली झांझिबारला स्वातंत्र्य मिळाले व त्यादरम्यान झालेल्या हिंसक झांझिबार क्रांतीनंतर झांझिबारने टांझानियामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
गुणक:
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |