Jump to content

अकोले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अकोले
जिल्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हा
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या १८२७८
२०११
दूरध्वनी संकेतांक ०२४२४
टपाल संकेतांक ४२२६०१
वाहन संकेतांक महा १७
निर्वाचित प्रमुख श्री बाळासाहेब काशिनाथ वडजे
(नगराध्यक्ष)
प्रशासकीय प्रमुख श्री. वाघ
(मुख्याधिकारी)
अकोले शहरातील कोल्हार-घोटी रस्त्यावरील दृष्य
हा लेख अकोले शहराविषयी आहे. अकोले तालुक्याच्या माहितीसाठी पहा, अकोले तालुका
अकोले is located in India
अकोले
अकोले
अकोले (India)


अकोले हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील एक शहर आहे.

अकोले शहर चोहीबाजूने डोंगरांनी वेढलेले आहे. सभोवताली सातारा, गर्दनी, ढग्या असे डोंगर आहेत. शहराच्या एका बाजूला अगस्ती सहकारी साखरकारखाना आहे.
शहराच्या शेजारी नवलेवाडी, धुमाळवाडी, माळीझाप, शेकइवाडी ही गावे आहेत.
अकोले शहराच्या इतिहासप्रमाणे या गावात स्वातंत्रपूर्व काळात एका छळ करणारा मामलेदाराला जिवंत जाळल्याची घटना झाली होती असे सांगतात.अकोले शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर सातारगड खंडोबा देवस्थान आहे. अतिशय निसर्गरम्य वातावरणात डोंगरावर प्राचीन मंदिर तसेच भव्य शेड, लाईट ,पाणी ,यांची व्यवस्था आहे. महाराष्ट्रातील काही लोकांचे हे कुलदैवत आहे. चंपाषष्टी व माग पौर्णिमेला यात्रा भरते.

नगरपंचायत

[संपादन]

अकोले शहरात इ.स. २०१५ मध्ये नगरपंचायत स्थापन होऊन पहिले नगराध्यक्ष म्हणुन किसन दगडु धुमाळ यांची निवड झाली.

संदर्भ

[संपादन]

http://books.google.co.in/books?id=B3Cg9H7lVkgC&lpg=PA122&dq=akole%20ahmednagar&pg=PA122#v=onepage&q=akola&f=false