मायक्रोसॉफ्ट ऑफिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मायक्रोसॉफ्ट ऑफिस
Microsoft Office 365 Logo.jpg
MsOffMar.png
मराठी भाषेतील मायक्रोसॉफ्ट ऑफिस २००७
मायक्रोसॉफ्ट ऑफिस
मूळ लेखक मायक्रोसॉफ्ट
प्रारंभिक आवृत्ती इ.स. १९९०
सद्य आवृत्ती मायक्रोसॉफ्ट ऑफिस २०१०
प्रणालीलेखनाची भाषा सी++
संगणक प्रणाली मायक्रोसॉफ्ट विंडोज
भाषा ३५ हून अधिक
सॉफ्टवेअरचा प्रकार कार्यालयीन सॉफ्टवेर संच
परवाना प्रताधिकारित
संकेतस्थळ मायक्रोसॉफ्ट ऑफिस

मायक्रोसॉफ्ट ऑफिस (इंग्लिश: Microsoft Office) हा विविध कार्यालयीन कामकाजासाठी उपयुक्त अश्या उपयोजन सॉफ्टवेरांचा संच आहे. मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन या कंपनीने विंडोजमॅकिंटॉश ओएस एक्स या संगणकप्रणाल्यांसाठी हा सॉफ्टवेर संच बनवला व वितरला आहे. मायक्रोसॉफ्ट ऑफिसाची विंडोज प्रणाल्यांसाठी सर्वांत ताजी आवृत्ती मायक्रोसॉफ्ट ऑफिस २०१० आहे, तर मॅकिंटॉश प्रणाल्यांसाठी मायक्रोसॉफ्ट ऑफिस २०११ (मॅक) ही आवृत्ती आहे.

घटक सॉफ्टवेअर[संपादन]

मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये खालील घटक सॉफ्तवेअरे समाविष्ट आहेत:

मायक्रोसॉफ्ट वर्ड[संपादन]

हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस संचातील खासकरून 'लेखन-संपादन' कामासाठी लिहिलेले सॉफ्टवेर आहे. या सॉफ्टवेराचा .डॉक (.doc) हा फॉरमॅट संगणक लेखन दस्त‌ऐवजांमध्ये प्रमाण फॉरमॅट म्हणून गणला जाण्याइतका लोकप्रिय झाला आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड सॉफ्टवेरात मराठी लिहिण्यासाठी अनेक 'फाँट', अर्थात संगणक टंक, उपलब्ध आहेत.

मायक्रोसॉफ्ट एक्सेल[संपादन]

हे गणिते, स्तंभालेख इत्यादी करण्यासाठी, लेखा राखण्यासाठी उपयुक्त असे उपयोजन सॉफ्टवेर आहे. कार्यालयांमध्ये केल्या जाणाऱ्या गणन क्रियांसाठी हे सॉफ्टवेर लोकप्रिय ठरले आहे.

मायक्रोसॉफ्ट पावरपॉइंट[संपादन]

माहिती सादरीकरणासाठी वापरले जाणारे हे उपयोजन सॉफ्टवेर आहे.

मायक्रोसॉफ्ट आउटलूक[संपादन]

हे विपत्रांच्या देवाणघेवाणीसाठी व व्यवस्थापनासाठी उपयुक्त असलेले उपयोजन सॉफ्टवेर आहे.

बाह्य दुवे[संपादन]