Jump to content

आर्थिक व्यवहार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(व्यवहार या पानावरून पुनर्निर्देशित)

आर्थिक परिभाषेत व्यवहार म्हणजे आर्थिक आदान प्रदान होय. जेव्हा वस्तू, सेवा किंवा रक्कम एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे जाते त्यास व्यवहार असे म्हणले जाते. व्यवसायाच्या पुस्तपालनात व्यवहाराची नोंद ठेवणे आवश्यक असते. व्यवहारांची नोंद व्यवसायाच्या सामान्य खातेवहीत (इंग्लिश : जनरल लेजर ) केली जाते.

द्विनोंदी लेखा पद्धतीत प्रत्येक व्यवहाराचे परिणाम किमान दोन सामान्य खात्यावर होतात. एका खात्यावर रक्कम जमा होते तर दुसऱ्या खात्यावर रक्कम नावे होते. दोन्ही खात्यांचा एकत्रित परिणाम समान असतो.

वैशिष्ट्ये

[संपादन]

१) व्यवहार म्हणजे आर्थिक आदान प्रदान होय.

२) पैसे देण्याचे आश्वासन म्हणजे व्यवहार नव्हे. अशा आश्वासनाची नोंद लेखाकर्मात केली जात नाही.

३) भविष्यात घडू शकेल अशा व्यवहारांची नोंद लेखपाल करत नाही.

४) व्यवहारात पैशांची नोंद एका खात्यातून दुसऱ्या सामान्य खात्यामध्ये होते. एकाच खात्याने देणे व त्यानेच घेणे याला व्यवहार म्हणत नाहीत.

५) व्यवहाराची रक्कम मोजण्यायोग्य (संख्यात्मक)असावी. गुणात्मक नोंदीचे पुस्तपालन करता येत नाही.