प्लांट्‌स व्हर्सेस झोम्बीज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्लांट्स व्हर्सेस झोम्बीज या पानावरून पुनर्निर्देशित)
उदयोन्मुख लेख
हा लेख १ सप्टेंबर, २०१६ रोजी मराठी विकिपीडियावरील उदयोन्मुख सदर होता. २०१६चे इतर उदयोन्मुख लेख
प्लांट्‌स व्हर्सेस झोम्बीज

सामान्य झोम्बीच्या चित्राबरोबर प्लांट्‌स व्हर्सेस झोम्बीज चे आवरण (पीसी आवृत्ती)
विकासक पॉपकॅप गेम्स
प्रकाशक पॉपकॅप गेम्स
इलेक्ट्रॉनिक आर्टस (ॲन्ड्रॉइड मार्केटसाठी)
रचनाकार जॉर्ज फॅन
संगीतकार लॉरा शिगिहारा
इंजिन पॉपकॅप गेम्स फ्रेमवर्क
नवीनतम आवृत्ती १.२.०.१०७३
प्रकार टॉवर डिफेन्स[मराठी शब्द सुचवा]
खेळण्याचे प्रकार एक-खेळाडू, दोन-खेळाडू
माध्यमे/वितरण उतरवणे, सीडी

प्लांट्‌स व्हर्सेस झोम्बीज हा पॉपकॅप गेम्स यांनी तयार केलेला टॉवर डिफेन्स प्रकारचा एक दृश्य खेळ आहे. तो ओएस एक्समायक्रोसॉफ्ट विंडोजवर खेळता येतो. या खेळात एक घरमालक असून त्याच्याकडे विविध प्रति-झोम्बी प्लांट्स (झाडे) असून त्यांचा वापर करून त्याला त्याचे "मेंदू खाण्यासाठी" आलेल्या झोम्बींना पराभूत करता येते. मे ५, २००९ रोजी हा खेळ प्रथम प्रकाशित झालाव त्याच दिवशी तो स्टीमवरदेखील प्रकाशित झाला. आयओएसआयपॅडसाठी साठी तो फेब्रुवारी २०१० मध्ये प्रकाशित झाला. आयपॅडमध्ये या खेळात उच्च स्पष्टता आहे. एक्सबॉक्स लाइव्ह आर्केडसाठीही हा खेळ उपलब्ध असून तो सप्टेंबर ८, २०१० रोजी प्रकाशित झाला. पॉपकॅप गेम्स एक निटेन्डो डीएस आवृत्ती जानेवारी १८, २०११ रोजी प्रकाशित केली. को-ऑप व व्हर्सेस प्रकारांसह प्लांट्‌स व्हर्सेस झोम्बीजची प्लेस्टेशन ३ आवृत्ती फेब्रुवारी २०११ मध्ये प्रकाशित झाली. त्याची ॲन्ड्रॉइड आवृत्ती ॲमेझॉन ॲप स्टोरमध्ये मे ३१, २०११ मध्ये प्रकाशित झाली. फेब्रुवारी १६, २०१२ रोजी त्याची ब्लॅकबेरी प्लेबुकसाठीची आवृत्ती प्रकाशित झाली. विंडोज व मॅक आवृत्त्यांमध्ये नवीन गेम ऑफ द इयर आवृत्तींमध्ये झोंबाटारसारख्या अनेक नवीन सुविधांची भर पडली आहे. या खेळाला त्याच्या चिकित्सकांकडून चांगला प्रतिसाद लाभला आहे. १५ ऑगस्त २०१३ रोजी या खेळाची दुसरी आवृत्ती प्लांट्स व्हर्सेस झोम्बीज २: इट्स अबाउट टाइम ही आयओएससाठी प्रकाशित झाली.

खेळ खेळताना[संपादन]

या खेळात खेळाडूंकडे वेगवेगळ्या प्रकारची झाडे व कवक असून त्यांची प्रत्येकाची हल्ला करण्याची व टिकाव धरण्याची क्षमता वेगवेगळी असते. ही सर्व झाडे वापरून झोम्बींच्या कळपांना घरातील लोकांचे मेंदू खाण्यापासून थोपवता येते. खेळण्याचे क्षेत्र आडव्या पट्ट्यांमध्ये विभागलेले असते. एक झोम्बी घराच्या दिशेने एकाच आडव्या पट्टीतून येतो. (जर त्याने गार्लिकचा (लसूण) भाग खाल्ला तर मात्र तो वेगळ्या पट्टीत जातो.) बहुतेक झाडे एकाच आडव्या पट्टीत मारा करतात किंवा मारा थोपवून धरतात. पुढील पातळ्यांमध्ये (लेव्हल्स) खेळाडू नवीन झाडे क्रेझी डेव्हच्या आभासी दुकानातून विकत घेऊ शकतात. विकत घेण्यासाठी लागणारे आभासी पैसे झोम्बींना मारून व झेन गार्डन मधील झाडे विकून मिळू शकतात.

खेळाडू पातळी मर्यादित झाडांच्या बियांसह खेळ सुरू करतो. ही मर्यादा आभासी पैसे देऊन वाढवता येते. प्रत्येक पातळीच्या सुरुवातीला खेळाडूला आक्रमण करणाऱ्या झोम्बींचे प्रकार दाखवले जातात व त्यांच्याविरुद्ध लागणारी झाडे खेळाडूला निवडता येतात. कवक दिवसा झोपतात, त्यामुळे त्यांना "कॉफी बीन" नावाचे झाड वापरून उठवावे लागते. कवक त्यांच्या कमी सूर्यकिंमतीमुळे रात्रीच्या पातळ्यांसाठी आदर्श असतात. काही झाडे काही झोम्बींविरुद्ध वापरण्यासाठी उत्कृष्ट असतात, जसे की मॅग्नेट-श्रूम (चुंबक-कवक) हे बकेटहेड झोम्बी, लॅडर झोम्बी व फुटबॉल झोम्बी यांच्याकडील धातूच्या वस्तू (लोखंडी बादली, फुटबॉल शिरस्त्राण व शिडी) काढून घेऊन त्यांची शक्ती कमी करते.

झोम्बींचेही अनेक प्रकार असून त्यांच्या विशेषता, गती, कठीणता व आक्रमण करण्याची शक्ती वेगवेगळ्या असतात. डॉल्फिन रायडर झोम्बी हा सर्वांत गतिमान तर डॉक्टर झोम्बॉस हा सर्वांत जास्त टिकाव धरण्याची क्षमता असलेला झोम्बी आहे. काही झोम्बी त्यांच्याजवळील उपकरणांच्या सहाय्याने झाडांवरून उड्या मारु व उडू शकतात. डिगर झोम्बी हा झाडांखाली खोदत दुसऱ्या टोकाशी जाऊ शकतो. जुन्या आवृत्तीत मायकेल जॅक्सनशी साधर्म्य असलेला डान्सिंग झोम्बी असून तो जमिनीतून झोम्बी बोलावू शकतो. नव्या आवृत्तीत त्याचा चेहरामोहरा बदलण्यात आला आहे. काही विशिष्ट प्रसंगी खेळाडूला झोम्बींचा प्रचंड समुदाय चाल करून येत असल्याचे सांगितले जाते. काही झोम्बींचे "गीगा" (अधिक शक्तिशाली) प्रकार असून त्यांची टिकाव धरण्याची शक्ती जास्त असते. जसे की: फुटबॉल झोम्बी व गार्गान्ट्युअर. एक झाम्बोनी चालवणारा झोम्बी, झोम्बॉनी हाही या खेळात आहे.

खेळण्याचे प्रकार[संपादन]

व्हर्सेस मोड[संपादन]

ह्या खेळात बहुतेक प्रकार एक-खेळाडू असून "व्हर्सेस मोड" हा फक्त दोन-खेळाडू प्रकार आहे. या प्रकारात एक एक खेळाडू झाडांची तर दुसरा झोम्बींची बाजू घेऊन लढतो. काही विशिष्ट झाडे व झोम्बी खेळाडूंना प्रथमच निवडून दिलेली असतात. सूर्य वापरून झाडे तर मेंदू वापरून झोम्बी ठेवता येतात. झोम्बींकडून खेळणाऱ्या खेळाडूला झाडांकडून खेळणाऱ्या खेळाडूचा आभासी मेंदू खायचा असतो तर झाडांकडून खेळणाऱ्या खेळाडूला पहिल्यापासूनच असलेले टार्गेट झोम्बी नष्ट करावयाचे असतात.

झेन गार्डन[संपादन]

झेन गार्डन मध्ये आपण खेळताना बक्षीस म्हणून मिळालेली झाडे ठेवू शकतो. ती खेळातील झाडेच असून या प्रकारात झोम्बी मात्र नसतात. सर्व झेन गार्डनमधील झाडांना आभासीरीत्या खते, पाणी, कीटकनाशके द्यावी लागतात, परंतु त्यांच्या या गरजांकडे दुर्लक्ष केल्यास काहीही विपरीत घडत नाही.

सर्व्हायव्हल मोड[संपादन]

सर्व्हायव्हल मोड मध्ये खेळाडूला झोम्बींच्या अनेक (५ ते १०) समुदायांना तोंड द्यावे लागते. ॲडव्हेंचर मोड पूर्ण केल्याशिवाय हा प्रकार खेळता येत नाही.

ॲडव्हेंचर मोड[संपादन]

ॲडव्हेंचर मोड हा प्लांट्‌स व्हर्सेस झोम्बीजमधील प्रमुख खेळण्याचा प्रकार असून तो खेळण्यासाठी पहिल्यापासूनच उपलब्ध असतो. यात पातळ्यांचे पाच संघ असून प्रत्येक संघात दहा लघुपातळ्या असता.

मिनी-गेम्स[संपादन]

ॲडव्हेंचर मोडमध्ये प्रगती केल्यावर मिनी-गेम्स प्रकार (उप-खेळ) उपलब्ध होतो. यात एकून २० उपखेळ असून त्यातील काही पॉपकॅपच्या इअतर खेळांवर आधारित आहेत. (बीज्वेल्डइन्सॅनिक्वेरियम)

अचिव्हमेन्ट्स[संपादन]

खेळाडूला गेम ऑफ द इयर आवृत्ती व त्यानंतरच्या सर्व आवृत्त्यांमध्ये काही अचिव्हमेन्ट्स मिळवता येतात. मूळ पीसी आवृत्ती व आंतरजालावरील मोफत आवृत्ती यांत ही सुविधा उपलब्ध नाही.

सांस्कृतिक संदर्भ[संपादन]

प्लांट्‌स व्हर्सेस झोम्बीज त्याच्या पायऱ्यांच्या नावांसाठी व इतरांसाठी अनेक संदर्भ वापरते. मृत्युशिलांवरील मजकूर ("मृत", "अस्तित्व समाप्त", "फक्त विश्रांती घेत आहे" - "Expired", "Ceased to Exist", "Just Resting", इत्यादी) हा मॉन्टी पायथॉन यांच्या "डेड पॅरट स्केच" वरून घेण्यात आला आहे. उप-खेळांपैकी दोन खेळ, "झोम्बीक्वेरियम" व "बीघॉउल्ड" हे पॉपकॅपच्याच इतर दोन खेळांवर आधारित आहेत: इन्सॅनिक्वेरियमबीज्वेल्ड (अनुक्रमे). "व्हेसब्रेकर" कोड्यांमधल्या दोन पातळ्या "स्केरी पॉटर" व "एस ऑफ व्हेस" यांची नावे "हॅरी पॉटर" व "एस ऑफ बेस" यांवर आधारित आहे.

बाह्य दुवे[संपादन]