"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ७: | ओळ ७: | ||
== सुरुवातीचे जीवन == |
== सुरुवातीचे जीवन == |
||
[[चित्र:Young Ambedkar.gif|thumb|right|तरुण डॉ. आंबेडकर<ref>{{संकेतस्थळ स्रोत|author=Frances Pritchett |दुवा=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/graphics/youth.html |शीर्षक=youth |प्रकाशक=Columbia.edu |accessdate=17 July 2010| archiveurl= http://web.archive.org/web/20100625044711/http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/graphics/youth.html| archivedate= 25 June 2010 | deadurl= no}}</ref>]] |
|||
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म [[एप्रिल १४|१४ एप्रिल]] [[इ.स. १८९१|१८९१]] रोजी सध्याच्या [[मध्य प्रदेश]] राज्यातील [[इंदूर जिल्हा|इंदूर]] जिल्ह्यामधील [[महू]] (आता [[डॉ. आंबेडकर नगर]]) या लष्करी छावणीत झाला. त्यांचे पिता [[रामजी सकपाळ]] व आई [[भीमाबाई सकपाळ|भीमाबाई]] यांचे ते १४वे अपत्य व अंतिम अपत्य होते. बाळाचे नाव 'भिवा' असे ठेवण्यात आले, तसेच हळूहळू त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. [[आंबेडकर कुटुंब|आंबेडकरांचे कुटुंब]] हे त्याकाळी [[अस्पृश्य]] गणल्या गेलेल्या [[महार]] जातीचे होते आणि महाराष्ट्रातील [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] जिल्ह्याच्या [[मंडणगड]] तालुक्यातील [[आंबडवे]] या गावचे होते. ''('आंबडवे' या गावचा ''अंबावडे'' असा चूकिचा उल्लेख अनेक ठिकाणी केला गेलेला आहे.''<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/pune-news/about-name-of-ambadve-village-1227278/|title=आंबडवे नाव योग्यच – खासदार अमर साबळे|date=2016-04-14|work=Loksatta|access-date=2018-03-14|language=mr-IN}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/kgtocollege-news/international-standard-educational-complex-at-original-village-of-dr-babasaheb-ambedkar-446635/lite/|title=डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबवडे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक संकुल – Loksatta|website=www.loksatta.com|access-date=2018-03-14}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-ambedkars-teacher-family-saving-memories-of-ambedkar-5489831-NOR.html|title=आंबेडकर गुरुजींचं कुटुंब जपतंय सामाजिक वसा, कुटुंबानं सांभाळल्या ‘त्या’ आठवणी|date=2016-12-26|work=marathibhaskar|access-date=2018-03-14|language=mr}}</ref>) भीमरावांचे आजोबा मालोजी सकपाळ हे भारतीय ब्रिटिश सैन्यात शिपाई होते; वडील रामजी सकपाळ हेही ब्रिटिश सैन्यात 'सुभेदार' व 'सैनिकी शिक्षक' या पदांवर कार्यरत होते. रामजींनी [[मराठी]] व [[इंग्रजी]] भाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते. [[इ.स. १८९६]] मध्ये ५ वर्षीय भीमरावांच्या आई [[भीमाबाई रामजी सकपाळ|भीमाबाईंचे]] मस्तकशूळ या आजाराने निधन झाले. त्यानंतर बालक भीमाचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी केले. भीमराव वयाने लहान असल्यामुळे कॅम्प दापोली येथील शाळेत त्यास प्रवेश देता न आल्याने घरीच लहानग्या भीमरावास अक्षर ओळख करून द्यावी लागली. |
|||
[[इ.स. १८९६]] मध्ये रामजींनी आपल्या परिवारासह [[दापोली]] सोडली व ते [[सातारा]] येथे एका साधारण घरात राहिले, आणि थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात ते राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. रामजींनी [[इ.स. १८९६]] च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल मध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. भीमरावाचे मूळ गाव कोकणातील [[आंबडवे]] व मूळ आडनाव ''सकपाळ'' होते. [[कोकण]]ामधील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असे व त्यात शेवटी (उपसर्ग) ''कर'' शब्द जोडण्याचा प्रघात असे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव "सकपाळ" असतांना त्यांचे वडील [[रामजी आंबेडकर]] यांनी [[सातारा|साताऱ्यातील]] गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे [[प्रतापसिंह हायस्कूल]]) मध्ये "आंबडवेकर" असे आडनाव ७ नोव्हेंबर १९०० रोजी नोंदवले. (अनेक ठिकाणी या आडनावाचाही ''अंबावडेकर'' असा चूकीचा उल्लेख केलेला आहे<ref>{{स्रोत बातमी|url=https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-ambedkars-teacher-family-saving-memories-of-ambedkar-5489831-NOR.html|title=आंबेडकर गुरुजींचं कुटुंब जपतंय सामाजिक वसा, कुटुंबानं सांभाळल्या ‘त्या’ आठवणी|date=2016-12-26|work=marathibhaskar|access-date=2018-03-14|language=mr}}</ref> साताऱ्याच्या या शाळेत भीमरावांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे [[देवरूखे ब्राह्मण]] शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले भीमरावाचे 'आंबडवेकर' हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडमिडे वाटत असे म्हणून माझे 'आंबेडकर' हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमाला सुचविले. तेव्हा त्यावर भीवाने होकार दिला आणि तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून त्यांचे आडनाव 'आंबडवेकर'चे '[[आंबेडकर]]' झाले. भीमराव आपल्या विद्यार्थी जीवनात १८-१८ तास अभ्यास करत असत.<ref>{{स्रोत पुस्तक|title=B.R. AMBEDKAR: Saviour of the Masses|last=Kapadiya|first=Payal|publisher=Wisha Wozzawriter published by Puffin|year=2012|isbn=|location=Mumbai|pages=14}}</ref> |
|||
रामजी सकपाळ यांनी [[इ.स. १८९८]] साली दुसरे लग्न केले आणि [[आंबेडकर कुटुंब|आपल्या कुटुंबासह]] [[मुंबई]]ला गेले. तेथे भीमराव हे एलफिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेत जाऊ लागले, एलफिन्स्टन हायस्कूलमधे जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/1900s.html|title=1900s|last=Pritchett|first=Frances|website=www.columbia.edu|access-date=2018-03-14}}</ref> [[कबीर पंथ]]ीय असलेल्या रामजींनी मुलांना [[हिंदू साहित्य]]ाची ओळख करून दिली. चौथीची परिक्षा पास झाल्यावर त्यांना दादा केळूस्कर गुरूजींनी स्वत: लिहिलेले '[[गौतम बुद्ध|भगवान बुद्धाचे]] चरित्र' हे पुस्तक भेट म्हणून दिले. यावेळी त्यांना पहिल्यांदाच बुद्धांच्या शिकवणूकींची माहिती कळाली.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=7-9EOFGLps0C&printsec=frontcover&dq=buddha+and+his+dhamma&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjF4r-B0-vZAhXM6Y8KHQjrAmEQ6AEILjAB#v=onepage&q=buddha%20and%20his%20dhamma&f=false|title=The Buddha and his Dhamma|publisher=Gautam Book Center|language=en}}</ref> रामजी बाबांना इतर जातींतील लोकांच्या विरोधामुळे मुलांना सरकारी शाळेत शिकवण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर करावा लागला. जरी शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे. [[इ.स. १९०७]] साली तरूण भीमरावांनी [[मुंबई विद्यापीठ]]ाची मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या पास केली. त्यावेळी एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळविणे एवढे दुर्मिळ होते की, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहिर सभा भरवण्यात आली. [[इ.स. १९०८]] मध्ये [[मुंबई विद्यापीठ]]ाच्या एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. शाळेत असतानाच [[इ.स. १९०६]] मध्ये त्यांचे लग्न [[दापोली]]च्या ९ वर्षीय रमाबाई यांच्याबरोबर झाले होते. पुढे चार वर्षांनी इ.स. १९१२ मध्ये त्यांनी त्याच मुंबई विद्यापीठाची [[राज्यशास्त्र]] आणि [[अर्थशास्त्र]] विषय घेऊन बी.ए. ची पदवी संपादन केली आनि बडोदा संस्थानात नेकरीसाठी रूजू झाले. याच वर्षी त्यांना [[यशवंत आंबेडकर|यशवंत]] हा मुलगा झाला. त्याच सुमारात [[२ फेब्रुवारी]], [[इ.स. १९१३]] मध्ये त्यांचे आजारी वडील रामजी बाबांचे मुंबईमध्ये निधन झाले. पुढे चारच महिन्यांनी बरोडा नरेशांकडून प्रति महिने २५ रूपये शिष्यवृत्ती घेऊन, अमेरीकेला [[कोलंबिया विद्यापीठ]]ात उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयाण केले. |
|||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
००:०८, ५ जानेवारी २०२० ची आवृत्ती
प्रस्तावना
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल१८९१ – ६ डिसेंबर १९५६), डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाने लोकप्रिय, हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरूद्ध होणारा सामाजिक भेदभाव रोखण्यासाठी मोहीम राबविली, तसेच महिलांच्या, कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या हक्कांचे समर्थन केले. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक आणि प्रजासत्ताक भारताचे पिता होते. भारतात आणि इतरत्र बहुतेक वेळा त्यांना 'बाबासाहेब' म्हणतात, म्हणजे मराठीत "आदरणीय पिता".
कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट पदव्या मिळवणारे आंबेडकर हे प्रतिभाशाली विद्यार्थी होते; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवरील संशोधनासाठी अभ्यासक किंवा विद्वान म्हणून नावलौकिक मिळविला. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांचे जीवन सामाजिक व राजकीय घडामोडींत व्यतित झाले; ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.
१९५०च्या दशकात बौद्ध भिक्खुंनी त्यांना बोधिसत्व ही एक उच्च बौद्ध उपाधी प्रदान केली. इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनानीच त्यांचे निधन झाले. इ.स. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर 'भारतरत्न' हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो.[१] आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकप्रिय संस्कृतित उभी राहिली आहेत.
सुरुवातीचे जीवन
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी सध्याच्या मध्य प्रदेश राज्यातील इंदूर जिल्ह्यामधील महू (आता डॉ. आंबेडकर नगर) या लष्करी छावणीत झाला. त्यांचे पिता रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे ते १४वे अपत्य व अंतिम अपत्य होते. बाळाचे नाव 'भिवा' असे ठेवण्यात आले, तसेच हळूहळू त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. आंबेडकरांचे कुटुंब हे त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार जातीचे होते आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते. ('आंबडवे' या गावचा अंबावडे असा चूकिचा उल्लेख अनेक ठिकाणी केला गेलेला आहे.[३][४][५]) भीमरावांचे आजोबा मालोजी सकपाळ हे भारतीय ब्रिटिश सैन्यात शिपाई होते; वडील रामजी सकपाळ हेही ब्रिटिश सैन्यात 'सुभेदार' व 'सैनिकी शिक्षक' या पदांवर कार्यरत होते. रामजींनी मराठी व इंग्रजी भाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते. इ.स. १८९६ मध्ये ५ वर्षीय भीमरावांच्या आई भीमाबाईंचे मस्तकशूळ या आजाराने निधन झाले. त्यानंतर बालक भीमाचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी केले. भीमराव वयाने लहान असल्यामुळे कॅम्प दापोली येथील शाळेत त्यास प्रवेश देता न आल्याने घरीच लहानग्या भीमरावास अक्षर ओळख करून द्यावी लागली.
इ.स. १८९६ मध्ये रामजींनी आपल्या परिवारासह दापोली सोडली व ते सातारा येथे एका साधारण घरात राहिले, आणि थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात ते राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल मध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. भीमरावाचे मूळ गाव कोकणातील आंबडवे व मूळ आडनाव सकपाळ होते. कोकणामधील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असे व त्यात शेवटी (उपसर्ग) कर शब्द जोडण्याचा प्रघात असे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव "सकपाळ" असतांना त्यांचे वडील रामजी आंबेडकर यांनी साताऱ्यातील गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे प्रतापसिंह हायस्कूल) मध्ये "आंबडवेकर" असे आडनाव ७ नोव्हेंबर १९०० रोजी नोंदवले. (अनेक ठिकाणी या आडनावाचाही अंबावडेकर असा चूकीचा उल्लेख केलेला आहे[६] साताऱ्याच्या या शाळेत भीमरावांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे देवरूखे ब्राह्मण शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले भीमरावाचे 'आंबडवेकर' हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडमिडे वाटत असे म्हणून माझे 'आंबेडकर' हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमाला सुचविले. तेव्हा त्यावर भीवाने होकार दिला आणि तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून त्यांचे आडनाव 'आंबडवेकर'चे 'आंबेडकर' झाले. भीमराव आपल्या विद्यार्थी जीवनात १८-१८ तास अभ्यास करत असत.[७]
रामजी सकपाळ यांनी इ.स. १८९८ साली दुसरे लग्न केले आणि आपल्या कुटुंबासह मुंबईला गेले. तेथे भीमराव हे एलफिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेत जाऊ लागले, एलफिन्स्टन हायस्कूलमधे जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते.[८] कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू साहित्याची ओळख करून दिली. चौथीची परिक्षा पास झाल्यावर त्यांना दादा केळूस्कर गुरूजींनी स्वत: लिहिलेले 'भगवान बुद्धाचे चरित्र' हे पुस्तक भेट म्हणून दिले. यावेळी त्यांना पहिल्यांदाच बुद्धांच्या शिकवणूकींची माहिती कळाली.[९] रामजी बाबांना इतर जातींतील लोकांच्या विरोधामुळे मुलांना सरकारी शाळेत शिकवण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर करावा लागला. जरी शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे. इ.स. १९०७ साली तरूण भीमरावांनी मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या पास केली. त्यावेळी एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळविणे एवढे दुर्मिळ होते की, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहिर सभा भरवण्यात आली. इ.स. १९०८ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. शाळेत असतानाच इ.स. १९०६ मध्ये त्यांचे लग्न दापोलीच्या ९ वर्षीय रमाबाई यांच्याबरोबर झाले होते. पुढे चार वर्षांनी इ.स. १९१२ मध्ये त्यांनी त्याच मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन बी.ए. ची पदवी संपादन केली आनि बडोदा संस्थानात नेकरीसाठी रूजू झाले. याच वर्षी त्यांना यशवंत हा मुलगा झाला. त्याच सुमारात २ फेब्रुवारी, इ.स. १९१३ मध्ये त्यांचे आजारी वडील रामजी बाबांचे मुंबईमध्ये निधन झाले. पुढे चारच महिन्यांनी बरोडा नरेशांकडून प्रति महिने २५ रूपये शिष्यवृत्ती घेऊन, अमेरीकेला कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयाण केले.
संदर्भ
- ^ http://ccis.nic.in/WriteReadData/CircularPortal/D2/D02est/12_6_2015_JCA-2-19032015.pdf Ambedkar Jayanti from ccis.nic.in on 19th March 2015
- ^ Frances Pritchett. http://web.archive.org/web/20100625044711/http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/graphics/youth.html. 25 June 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 July 2010 रोजी पाहिले. Unknown parameter
|deadurl=
ignored (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ "आंबडवे नाव योग्यच – खासदार अमर साबळे". Loksatta. 2016-04-14. 2018-03-14 रोजी पाहिले.
- ^ "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबवडे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक संकुल – Loksatta". www.loksatta.com. 2018-03-14 रोजी पाहिले.
- ^ "आंबेडकर गुरुजींचं कुटुंब जपतंय सामाजिक वसा, कुटुंबानं सांभाळल्या 'त्या' आठवणी". marathibhaskar. 2016-12-26. 2018-03-14 रोजी पाहिले.
- ^ "आंबेडकर गुरुजींचं कुटुंब जपतंय सामाजिक वसा, कुटुंबानं सांभाळल्या 'त्या' आठवणी". marathibhaskar. 2016-12-26. 2018-03-14 रोजी पाहिले.
- ^ Kapadiya, Payal (2012). B.R. AMBEDKAR: Saviour of the Masses. Mumbai: Wisha Wozzawriter published by Puffin. p. 14.
- ^ Pritchett, Frances. "1900s". www.columbia.edu. 2018-03-14 रोजी पाहिले.
- ^ The Buddha and his Dhamma (इंग्रजी भाषेत). Gautam Book Center.