सदस्य चर्चा:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रश्न, शंका, विनंत्या आणि सूचना[संपादन]

...भीमरावांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे. त्यांना वर्गात बसण्याची परवानगी नव्हती.

या दोन वाक्यांत विरोधाभास वाटतो. विद्यार्थ्यांपासून वेगळे म्हणजे वर्गात असे ध्वनित होते. मग वर्गात बसण्याची परवानगी नसल्यास असे शक्य नाही. याचा खुलासा करावा किंवा संदर्भ द्यावा. -- अभय नातू (चर्चा) ०८:३८, ९ एप्रिल २०२० (IST)[reply]

@अभय नातू: नमस्कार, ...शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे. त्यांना वर्गात बसण्याची परवानगी नव्हती. हा विरोधाभासी वाटणारा मजकूर इंग्लिश विकिपीडिया वरुन जसाच्या तसा घेतला गेला आहे. मी त्यास एक संदर्भही (इंग्लिश विकिचा) जोडला आहे. कृपया तेही पहावे. वर्गात अन्य विद्यार्थांपासून वेगळे त्यांना अनेकदा बसावे होते, तर काही वेळा आंबेडकरांना वर्गाच्या बाहेरही बसवले गेले होते यानुसार लिहिता आले तर पहावे किंवा विरोधाभास टाळण्यासाठी "त्यांना वर्गात बसण्याची परवानगी नव्हती." हे वाक्य हटवले तरी चालेल. विश्वसनीय संदर्भ भेटल्यानंतर लेखात उचित बदल केला जाईल. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १६:४२, ९ एप्रिल २०२० (IST)[reply]

@Sandesh9822: इंग्लिश व इतर विकिपीडिया पासून मजकूर इथे जसेस तसे बिना संदर्भ जोडू नये. विकिपीडिया हे विश्वसनीय स्रोत नाही. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) १६:५९, ९ एप्रिल २०२० (IST)[reply]

@Tiven2240: तुमच्या मताशी सहमत आहे. आणि लेख निर्मितीच्या कामात तांत्रिक व अन्य सुधारणा करण्याबद्दल तुमचेही मनापासून आभार. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १७:०९, ९ एप्रिल २०२० (IST) --संदेश हिवाळेचर्चा १८:१३, ९ एप्रिल २०२० (IST)[reply]

@अभय नातू: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मुंबई विद्यापिठामध्ये तसेच कोलंबिया विद्यापिठामध्ये (दोन्ही विद्यापीठांत) शिक्षण घेण्यासाठी बडोद्याद्याच्या महाराजांनी शिष्यवृत्ती दिली होती. आपल्या या संपादनात आपण मुंबई विद्यापीठासंदर्भातील शिष्यवृत्तीचा मजकूर काढलेला आहे. कृपया, तो पुन्हा लेखात हलवावा. --संदेश हिवाळेचर्चा १०:२५, १० एप्रिल २०२० (IST)[reply]

संदर्भ त्रुट्या[संपादन]

संदेश, अनेक बदल संदर्भ क्षेत्रात केले आहेत त्याने अनेक संदर्भ त्रुटी आता दिसून येत नाही. जसे वेळ भेटेल तसे लेख सुधार करेल . धन्यवाद.--Tiven2240 (चर्चा) १८:०१, ९ एप्रिल २०२० (IST)[reply]

हो चालेल टायवीन, आभारी आहे.--संदेश हिवाळेचर्चा १८:१०, ९ एप्रिल २०२० (IST)[reply]

येथील काही संदर्भ ब्लॉगसदृश संकेतस्थळांचे आहेत, उदा. webdunia.com.
असे संदर्भ देऊ नयेत कारण ही ब्लॉग लेखकाची व्यक्तिगत मते असतात. त्यांना पुरावा म्हणता येणार नाही.
अभय नातू (चर्चा) ०९:४१, १० एप्रिल २०२० (IST)[reply]
ब्लॉगसदृश संकेतस्थळांचे संदर्भ हटवावेत.--संदेश हिवाळेचर्चा ०९:५६, १० एप्रिल २०२० (IST)[reply]

पडताळणी सूचना[संपादन]

माझ्या सूचना या विभागात मांडत आहे. तिरप्या शब्दांना वगळावे असे मला वाटते. मी कंसात कारणे दिली आहेत. पुढील संक्षिप्त रूपे वापरली आहेत.
(अविश्वकोशीय – अवि; तटस्थता (NPOV) – त; विश्वसनीय, पडताळण्याजोगे, मूळ, समकालीन संदर्भ हवेत - सं; व्यक्तिगत मत, विधाने – म; पुनरावृत्ती – पु; अनावश्यक - अ)

[१]प्रस्तावना : प्रजासत्ताक भारताचे निर्माता – अवि, त बदलले
[२]सु.जी. : सैनिकी शाळेत त्यांचे इंग्रजी शिक्षण सुरु झाले व त्यांनी इंग्रजी उत्तमरित्या आत्मसात केली. (अवि) ऐवजी - सैनिकी शाळेत त्यांनी इंग्रजी शिक्षण घेतले. बदलले
[३]बा.:

  • रामजींनी मराठी व इंग्रजी भाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते. (पु) बदलले
  • त्यानंतर भीमासह व अन्य मुलांची संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी कठीण परिस्थितीत केले. (अवि) ऐवजी -त्यानंतर भीमा व अन्य मुलांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी केले. परिस्थिती कठीण होती हे याआधीच्या वाक्यातून ध्वनित होते आहे ते स्पष्ट केले असल्याने तसेच ठेवले.
  • साताऱ्यात आल्यावर थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आंबेडकर कुटुंब राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल मध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. (पु) पुनरावृत्ती आढळली नाही
  • कोकणामधील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असे व त्यात शेवटी (उपसर्ग) कर शब्द जोडण्याचा प्रघात असे. त्यामुळेच (अवि, अ) त्यामुळेच ला आक्षेप आहे कि पूर्ण वाक्यास? हा प्रघात आजही दिसून येतो त्यामुळे पूर्ण वाक्यास नसावा, तरीही स्पष्ट करावे
  • त्यावर भीमरावांनी होकार दिल्यावर तशी नोंद शाळेत झाली. (अवि, अ)होकार दिल्याशिवाय असे होणे शक्य नाही. तरीही संदर्भ न मिळाल्यास काढण्यास हरकत नाही.
  • आडनाव बदल मजकुराला अधिक विश्वसनीय, समकालीन, मूळ संदर्भ हवा.साचा घातला

[४]सु.शि.:

  • एल्फिन्स्टन हायस्कूलमधे जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते. – दिलेल्या संदर्भात असा उल्लेख नाही. (सं) किंबहुना संदर्भ संकेतस्थळाचा आहे, तेथे लेखाचाही उल्लेख नाही. छापील मासिकाचा संदर्भ पडताळता येईल का?

[५]उ.शि.:

  • आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते.- मासिकाचा संदर्भ ग्राह्य असू शकत नाही. (सं)
  • आंबेडकर हे त्यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते. ( अवि, त, म)
  • आंबेडकरांनी या दरम्यान बी.ए., दोनदा एम.ए., पी.एचडी., एम.एस्सी., बार-ॲट-लॉ, आणि डी.एस्सी. या पदव्या मिळवल्या. १९५०च्या दशकात त्यांना एलएल.डी. आणि डी.लिट. या दोन सन्माननीय पदव्या सुद्धा प्रदान करण्यात आल्या.- या मजकुरासाठी अधिक ठोस, समकालीन मूळ संदर्भ हवा. २०१६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या चरित्राचा संदर्भ देणे योग्य होणार नाही.(स)

[६] मुं. वि. :

  • येथे भीमराव नियमित अभ्यास करत असे. (अवि, अ)
  • ते मुंबई विद्यापीठाची बी.ए. ची पदवी संपादन करणारे अस्पृश्य वर्गातील पहिले विद्यार्थी होते.- या मजकुरासाठी अधिक विश्वसनीय, समकालीन संदर्भ हवा. २०१६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या चरित्राचा संदर्भ देणे योग्य होणार नाही.(सं)

[७] को. वि. :

  • दरम्यानच्या काळात कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात लाला लजपतराय यांनी भीमरावांशी ओळख करुन घेतली. भीमराव आंबेडकर या ग्रंथालयात सर्वांच्या अगोदर हजर असत आणि सर्वात शेवटी बाहेर पडत असत, याची माहिती लजपतराय यांना झाली होती. त्या अनुषंगानेही त्यांची ओळख झाली. एकदा लजपतराय व आंबेडकर यांचा अर्थशास्त्र व समाजशास्त्र संबंधित विषयांवर संवाद सुरू असताना प्राध्यापक एडविन सेलिग्मन तेथे आले व तेही संवादात सहभागी झाले. प्रा. सेलिग्मन हे आंबेडकरांचे राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचे सखोल ज्ञान जानून होते. लजपतराय यांनी आंबेडकरांच्या ज्ञानाची स्तुती केली. त्याचवेळी सेलिग्मन यांनी आंबेडकरांबद्दल "भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहेत." असे म्हणले. - या मजकुरासाठी अधिक विश्वसनीय, समकालीन, मूळ संदर्भ हवा. २०१६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या चरित्राचा संदर्भ देणे योग्य होणार नाही. (अवि)(सं)

[८] लंडन..:
[९] जा. सि.:
[१०]व.:

  • बॅरिस्टर आंबेडकरांची यशस्वी वकिलांमध्ये गणना होऊ लागली. (अवि,त,म)
  • आंबेडकरांनी जे खटले लढले ते गोरगरिबांसाठी व समाजातील वंचित वर्गाकडून सामाजिक भावनेने लढले. आंबेडकरांनी माढा तालुका न्यायालयात व सोलापूर जिल्हा न्यायालयात खटले लढले. स्वातंत्रसेनानी शंकरराव मोरे व शंकरराव जेधे यांनी पुणे येथे केलेल्या भाषणात विचारवंत अण्णासाहेब भोपटकर यांच्यावर कठोर शब्दात टीका केली होती. त्यामुळे भोपटकरांनी याबाबत पुणे न्यायालयात मोरे व जेधे यांच्याविरूद्ध खटला दाखल केला. शंकरराव मोरे, शंकरराव जेधे व आंबेडकर यांच्यात तीव्र राजकीय वैमनस्य असतानाही त्यांनी आपले वकीलपत्र आंबेडकरांना दिले. या खटल्याच्या सुनावणीच्यावेळी आंबेडकरांनी भोपटकरांची भेदक उलटतपासणी केली व उत्तरे देताना भोपटकरांची दमछाक झाली. त्यांची उलटतपासणी अपूर्ण राहिल्यामुळे त्यांनी पुढील तारीख घेतली. त्यानंतर त्यांनी पुढील तारखेस खटलाच काढून घेतला. आंबेडकर यांची कुशाग्र बुद्धी व इंग्लिशवरील असामान्य प्रभुत्व यामुळे न्यायाधीश सुद्धा त्यांचा युक्तिवाद ऐकताना दंग होऊन जायचे. पुढे समाजसेवेमुळे त्यांनी वकिली व्यवसाय कमी केला. – अवैध संदर्भ(सं)(अवि)(पु)

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १५:४८, १० एप्रिल २०२० (IST)[reply]


@सुबोध कुलकर्णी:,
वरील पडताळणीबद्दल धन्यवाद. लवकरच यात लक्ष घालून बदल करीत आहे, किंवा बदल का करु नयेत याची कारणे देत आहे.
@Sandesh9822:
तुम्ही वरील टिपणांवर उत्तर दिल्यास हे काम अधिक लवकर होईल.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २०:५१, १० एप्रिल २०२० (IST)[reply]

@सुबोध कुलकर्णी: तुम्ही मांडलेल्या काही सूचना योग्य वाटत नाहीत. बाकी चांगल्या सूचनांचे सदैव स्वागतच असेल.

वरील तुमच्या सूचनांवरुन तुम्ही 'डॉ. ज्ञानराज काशिनाथ गायकवाड लिखित २००६ च्या (सहावी आवृत्ती २०१६) "महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर" या चरित्रग्रंथाच्या विश्वसनीयतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात. यावर तुम्हाला सांगावेसे वाटते की हे चरित्र सर्वात ठोस, उल्लेखनीय व विश्वसनीय अशा चरित्रग्रंथाचा आधार/संदर्भ घेऊन बनवण्यावर आले आहे ते म्हणजे चांगदेव खैरमोडेंचे आंबेडकर चरित्र (१९५२). खैरमोडेंच्या चरित्रापेक्षा अधिक विश्वसनीय कदाचित कोणतेही आंबेडकर चरित्र नाही (१९५४ मधील धनंजय कीरांचे सुद्धा नाही). खैरमोडे विद्यार्थी दशेपासून आंबेडकरांच्या सहवास होते, शिवाय हे चरित्र आंबेडकरांच्या हयातीत प्रसिद्ध झाले आहे. केवळ याचाच संदर्भ आधार घेऊन बनवल्या गेलेल्या २००६ च्या चरित्रावर आक्षेप नसावा.

विश्वसनीय संदर्भ दिले असतानाही समकालीन संदर्भ किंवा मूळ संदर्भाचा हट्ट धरू नये कारण एवढे खोलातले संदर्भ हुडकून काढण्यासाठी येथे मी किंवा कोणी अन्य आंबेडकरांचा गाढा अभ्यासक नाही. आपण केवळ मूळ संदर्भांचा आग्रह धरत राहिलो तर काम होणारच नाही. खैरेमोडेंच्या चरित्राचा आधार घेऊन बनवलेले चरित्र विश्वसनीय मानावे. तुम्ही स्वतः समकालीन संदर्भ उपलब्ध करुन दिले तर स्वागतच असेल (आता हेही तुमचे काम नाही असे म्हणू नये.).


[1] आंबेडकरांचा प्रजासत्ताक भारताच्या निर्मितीत मोठा वाटा आहे यात कुणालाही शंका नसावी. त्यांना "प्रजासत्ताक भारताचे निर्माता" म्हणण्यात काहीही गैर वा अविश्वकोशीय वाटत नाही. तथापि, तुम्ही फार फार तर त्यांना "प्रजासत्ताक भारताच्या निर्मात्यांपैकी एक" असे लिहू शकता.

प्रजासत्ताकाचे निर्माते असे कोणी नसावे. असल्यास त्याला निकष काय? प्रजासत्ताकाच्या संविधानाचे शिल्पकार (मुख्य लेखक) हे निर्विवाद आहे.


[2] यावर हरकत नाही.
[3] यातील काही मते स्वीकारण्यायोग्य नाहीत. ही मते मान्य केल्यास लेख अतितारठ स्वरुपाचा होईल.

  • पुनरावृत्ती दाखवावी बदल केला जाईल.
  • हरकत नाही.
  • पुनरावृत्ती दाखवावी बदल केला जाईल. बदलले
  • अमान्य; येथे उल्लेखनीय वृत्तपत्राचा विश्वसनीय संदर्भ दिला आहे.बदलले नाही
  • अमान्य; येथे उल्लेखनीय वृत्तपत्राचा विश्वसनीय संदर्भ दिला आहे.बदलले नाही
  • येथे उल्लेखनीय वृत्तपत्राचा विश्वसनीय संदर्भ दिले आहेत. तथापि, आडनाव बदल मजकुराला अधिक विश्वसनीय, समकालीन, मूळ संदर्भ आपण शोधू शकता.साचा घातला


[4] लेखातून काढू शकता. भविष्यात विश्वसनीय संदर्भ मिळाला तर पुनः जोडले जाईल.
[5]

  • अमान्य; संदर्भ दिला आहे. मासिकाचा संदर्भ ग्राह्य असू शकत नाही हे काय म्हणताय? हा संदर्भ लोकराज्य या सरकारी मासिकाचा आहे व पूर्णतः ग्राह्य आहे.
  • अमान्य; अतिशोयोक्ती वाटत असली तरी वास्तविकता हीच होती. संदर्भ दिला आहे.
  • अमान्य; याला ठोस, समकालीन व विश्वसनीय संदर्भ दिला आहे. २०१६ मध्ये प्रसिद्ध झालेले चरित्र १९५२ साली चांगदेव खैरमोडे लिखित "डॉ. भीमराव रामजी आंबेडकर" (१२ खंड) याचाच संदर्भ घेऊन बनवण्यात आले आहे. आणि खैरमोडे यांच्याएवढा ठोस, समकालीन व विश्वसनीय संदर्भ कुणाचाही नसेल. (धनंजय कीरांचाही नाही) त्यामुळे या संदर्भाला अयोग्य मानू नये.


[6]

  • नियमित अभ्यास करत होते ही सामान्य बाब आहे. मात्र हटवली तरी हरकत नाही. बदलले
  • हरकत नाही.संदर्भ मागितला. ही माहिती पडताळण्याजोगी आहे. एखाद्या वाचकास ती सापडण्याची शक्यता आहे.


[7]

  • या मजकुरासाठी दोन विश्वसनीय संदर्भ दिले आहे. २००६ च्या चरित्राचा संदर्भ ग्रंथ चांगदेव खैरमोडे लिखित आंबेडकर चरित्र आहे व यापेक्षा अधिक ठोस, समकालीन, व मूळ संदर्भ अन्य नाही.


[८] लंडन..: ??
[९] जा. सि.: ??
[१०]

संदेश, आंबेडकर यांच्यावरचा लेख विश्वसनीय असायला हवा. त्यासाठी स्रोत संदर्भ देणे आवश्यक आहे. हा माझा हट्ट नाही. या ज्ञानकोशाचा नियम आहे. आपल्या मजकुराला आपणच उचित संदर्भ द्यायचे आहेत. ते काम दुसऱ्यावर ढकलणे योग्य नाही असे मला वाटते. विश्वसनीय स्रोत संदर्भ येथे उपलब्ध आहेत - Writings and speeches of B. R. Ambedkar; B. R. Ambedkar content. ही शासनाची अधिकृत संकेतस्थळे आहेत.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १३:५२, ११ एप्रिल २०२० (IST)[reply]

या ज्ञानकोशाचा नियम आहे हे नियम कुठे आहेत कृपया याची माहिती द्यावी. दुवे दिल्याबद्दल धन्यवाद व आपण एकदा त्याचे अटी पहा व विकिपीडिया समाजाला एक आश्वासन द्या की हे शासनाचे स्रोत विश्वसनीय आहेत. संदेश यांनी लिहिलेले आंबेडकर लेखात आतापर्यंत ५०० स्रोत आहेत त्याचे ज्ञानकोशनिय सिद्ध करण्यासाठी. परंतु आपण तयार केलेले लेखात किती स्रोत जोडले याची चर्चा नक्की आपल्याला चर्चापानावर करू. महात्मा गांधींच्या शब्दात " एन औन्स ऑफ प्रॅक्टिस इस वर्थ मोर देन टन्स ऑफ प्रिचिंग." धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) १४:२६, ११ एप्रिल २०२० (IST)[reply]
सुबोध कुलकर्णी, लेखासाठी स्रोत संदर्भ देणे आवश्यक असते हे मला चांगले ठाऊक आहे म्हणूनच मी या लेखातील प्रत्येक मजकूराला उचित संदर्भ जोडलेले आहेत. (मी अलीकडे लिहिलेले सर्व लेख पाहिले तरी प्रत्येक लेखाला संदर्भ जोडलेले असल्याचेही तुम्हाला दिसून येईल.) याचे स्मरण असावे की हा लेख आंबेडकरांच्या जीवनावर आहे, त्यांच्या विचारांवर/लेखनावर नव्हे. कारण वर दोन दुवे (Dr. BAWS) देऊन तुम्ही ज्याला विश्वसनीय स्रोत संदर्भ म्हणत आहात ते केवळ "आंबेडकरांचे लेखन व भाषणे" यांचे खंड आहेत. ती जीवनचरित्रे नाहीत. काही ठिकाणी त्यांचा उपयोग निश्चितच होऊ शकतो. मी मजकुराला उचित संदर्भ दिले असतानाही पुन्हा अतिरिक्त संदर्भ जोडण्याचे काम माझ्यावर लादू नये, कारण हे माझे काम/जबाबदारी नाही. तुमची हरेक इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी माझी नाही, ते तुमचे काम आहे. उपदेशक या भूमिकेतून बाहेर पडून आपण स्वतः लेखामध्ये (तुम्हाला पटतात ते) उचित संदर्भ जोडण्याचे काम हाती घ्यावे असे मला वाटते. --संदेश हिवाळेचर्चा १४:४४, ११ एप्रिल २०२० (IST)[reply]

[११]जा.ल. व अ.नि.:
भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे मोठे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्याच वेळी जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत. त्यांचे विचार, सिद्धांत आणि प्रत्यक्ष चळवळ या माध्यमातून त्यांनी भरीव कार्य केले आहे. जगाच्या इतिहासात असे योगदान करणाऱ्या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये बाबासाहेबांचे स्थान आहे. सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषतः वर्ग, जात, धर्म, लिंग ह्यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार ह्या बाबतीत आंबेडकर पथप्रदर्शक होते. त्यांनी वेगवेगळ्या जातीतल्या लोकांमधली दरी मिटण्यासाठी तीन महत्वाच्या मार्गांचा उल्लेख केला होता - लग्न, खानपान आणि सांस्कृतिक मिलाप.
- हा मजकूर अवि आहे. तसेच क्र. ७५ व ७६ या दिलेल्या संदर्भ स्रोतातून जसाच्या तसा घेतला आहे. @अभय नातू: हे प्रताधिकार उल्लंघन आहे याची नोंद घ्यावी.

  • आंबेडकरांना बालपणापासून अस्पृश्येचा सामना करावा लागला. (पु)
  • हे आत्मचरित्रपर पुस्तक कोलंबिया विद्यापीठात ‘पाठ्यपुस्तक’ म्हणून वापरले जाते. – असा उल्लेख दिलेल्या स्रोतात कुठेही नाही.

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १३:५२, ११ एप्रिल २०२० (IST)[reply]


@सुबोध कुलकर्णी:, तुम्हाला असे मजकूर हवे असतात ज्यांचा संदर्भ जोडलेल्या बातमीच्या मजकूराशी काहीएक संबंध असणार नाही म्हणजेच बातमीतील एकही शब्द लेखातील मजकूराशी मॅच झाला तर तो मजकूरच तुमच्या दृष्टीने प्रताधिकार भंग ठरतो (आंबेडकर जयंती लेखात केवळ चार-पाच शब्द (५%) copivio साचात सापडले तर तुम्ही त्यास प्रताधिकार भंग ठरवले). तसेच आजकाल १% ते ५% मजकूर (१ ते ५ शब्द) जरी copivio साचा सापडलेतरी तुम्ही त्यास प्रताधिकार भंग ठरवून मोकळे होता, मात्र त्यातील महत्त्वाचा भाग कोणता व किती याशी तुम्हाला काही देणंघेणं नसतं. आपण (लेखातील मजकूर) ज्याला प्रताधिकार उल्लंघन म्हणत आहात तो एक महत्त्वाचा मजकूर असून त्याला संदर्भ सुद्धा दिला आहे. तो मजकूर आंबेडकरांच्या कार्याचा सार आहे, त्यात काटछाट किंवा त्याला संक्षिप्त करता येऊ शकत नाही, नाहीतर तो अपूर्ण अवस्थेत राहिल. यामुळे मी तो त्या बातमीतील केवळ एक छोटासा भाग (दोन/तीन वाक्य) लेखात वापरला आहे. संपूर्ण बातमी कॉपीपेस्ट केली नाही. याला प्रताधिकार भंग ठरवू नये, कारण तो मजकूर विचारपूर्वक वापरलेला आहे. आपण बातमीचे संदर्भ कशासाठी वापरत असतो? जर आपण छोटे छोटे मजकूर प्रताधिकार भंग ठरवत बसलो तर विकिपीडिया वरचे लेख रिकामेच राहतील. कारण येथे सर्वजण पुस्तकांचे संदर्भ वापरणारे विद्वान मंडळी नाही.
  • आंबेडकरांना बालपणापासून अस्पृश्येचा सामना करावा लागला. - येथे या वाक्यात आंबेडकर जातिनिर्मूलन का करु इच्छित होते हे प्रतित होते त्यामुळे हे वाक्य त्या विभागात महत्त्वाचे ठरते. संदर्भ दिला आहे
  • हे आत्मचरित्रपर पुस्तक कोलंबिया विद्यापीठात ‘पाठ्यपुस्तक’ म्हणून वापरले जाते. याचे संदर्भ पुन्हा नीट पहावेत, उल्लेख सापडेल. नाहक वेळ दडवू नये.--संदेश हिवाळेचर्चा १९:४४, ११ एप्रिल २०२० (IST)[reply]


@अभय नातू:, वर प्रताधिकारभंगाचे एक उदाहरण दिले आहे. आपण हाही अहवाल पहावा - संभाव्य प्रताधिकार उल्लंघन
आपण प्रचालक म्हणून उचित भूमिका घेऊन योग्य ते कारवाई कराल ही आशा, धन्यवाद!
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:४७, ११ एप्रिल २०२० (IST)[reply]

@सुबोध कुलकर्णी: यांनी वर दिलेला संभाव्य प्रताधिकार उल्लंघन अहवाल पाहिला तर असे दिसून येईल पहिल्या एका बातमीचा ७०% मजकूर प्रताधिकार भंग आहे. कदाचित कुलकर्णी यांनी खरेच मोठा प्रताधिकार भंग शोधून काढला याचा त्यांना आनंद होत असावा. पण वास्तविकता ही की या मजकूरात आंबेडकरांची जशीच्या तशी विधाने आलेली आहेत, त्यांना बदलता येऊ शकत नाही आणि प्रताधिकार भंग ही ठरवता येऊ शकत नाही. आणि बाकीच्या बातम्यातील मजकूरांबद्दल बोलायचे झाले तर त्यात आवश्यक तो भाग गाळून, विधायक बदल करुन केवळ विश्वकोशीय स्वरुपाचा आवश्यक मजकूर लेखात वापरला आहे. वेगवेगळ्या बातमीतील मजकूराच्या आशयावरुन त्यातील कमी-अधिक भाग लेखात वापरण्यासाठी महत्त्वाचा ठरत असतो, व असेल भाग आवश्यक ते बदल करुन लेखात वापरले आहेत. ते प्रताधिकार भंग अजिबात नाहीत. ते लेखात असणे इष्ट आहे. एखाद्या विद्यार्थांला शेकडा ९५% मिळाले, तरी ५% कमी पडले म्हणून त्यास 'ढ' मानावे, असेच नियम मला येथे कुलकर्णी यांचे दिसत आहेत. कुलकर्णी यांना बातमीतील एक वाक्य सुद्धा लेखात असणे प्रताधिकार भंग वाटते, असे लक्षण प्रत्यक्ष कामाशी संबंध नसलेल्या उपदेशक व्यक्तीचे असते. --संदेश हिवाळेचर्चा २१:३४, ११ एप्रिल २०२० (IST)[reply]
@सुबोध कुलकर्णी: कधी NPOV तर कधी प्रताधिकार उल्लंघन सारखे निराधार आरोप आपण करत आहेत. हे शब्द आपलेच आहेत ना की कुठून तरी कॉपी पेस्ट केलेत? वर मी विचारलेल्या प्रशांचे उत्तर देण्याचे कृपया कष्ट घ्यावे. --Tiven2240 (चर्चा) २२:१८, ११ एप्रिल २०२० (IST)[reply]
सर्वप्रथम, येथील चर्चेवर काहीसे वैतागून गेले काही दिवस येथून विराम घेतला होता. आता परत हे काम हाती घेत आहे.
वरील खोलातील चर्चेची पाहणी करत आहे पण त्याआधी निर्विवाद असलेले उतारे मुख्य लेखात हलवित आहे.
त्याही आधी इतर संपादनांची पाहणी करीत आहे.
त्याला समांतर पुढील पडताळणी चालू ठेवावी ही सर्वांना विनंती.
अभय नातू (चर्चा) ०७:४४, १४ एप्रिल २०२० (IST)[reply]
निर्विवाद असल्याच्या खुणा असलेले उतारे मुख्य लेखात हलविले आहेत. आंबेडकर जयंतीनिमित्ताने इतके तरी काम आपल्या सगळ्यांना करता आले याबद्दल आनंद वाटतो.
सगळ्यांचे अभिनंदन, धन्यवाद व पुढील काम सुरू ठेवण्याची विनंती.
अभय नातू (चर्चा) ०८:५०, १४ एप्रिल २०२० (IST)[reply]
@अभय नातू: आंबेडकर गुरुजींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आंबेडकर आडनाव दिले याला पुढील धनंजय कीर यांच्या चरित्राचा संदर्भ जोडावा — [१]

--संदेश हिवाळेचर्चा १०:५१, १४ एप्रिल २०२० (IST)[reply]

@अभय नातू: आंबेडकर जयंतीनिमित्ताने इतके तरी काम झाले याबद्दल आनंद आहे. खास करुन तुमचे धन्यवाद व पुढील काम गतीने सुरू ठेवून पूर्ण करण्याची नम्र व आग्रहाची विनंती.--संदेश हिवाळेचर्चा ११:०८, १४ एप्रिल २०२० (IST)[reply]

@अभय नातू: आपण आपल्या परीने उर्वरित मजकूर पडताळ्याचे कार्य सुर ठेवावे ही नम्र विनंती. हे काम करताना काही अडथळे आणले जाईलच पण म्हणून निरुत्साह होऊन काम थांबवू नये. आपल्या विशेष प्रयत्नांनीच २०-२५% काम पूर्ण झाले आहे. इतरांच्या छोट्या मोठ्या मुद्यांमुळे/अडथळ्यांमुळे विचलित न होता आपण प्रचालकीय पदाचा यथायोग्य वापर करुन उर्वरित काम तडीस न्यावे, ही विनंती. येथे उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्यावर मी मत दिले आहे, नवे संदर्भही दिले आहे. तुमच्याशिवाय/तुमच्यासह इतर (असक्रिय) प्रचालक हे काम करणार याची शक्यता कमीच आहे, त्यामुळे तुम्ही माघार घेतली तर काम कायमचेच मागे पडून जाईल. मी येथे केवळ परावलंबी आहे, फक्त विनवणीच करु शकतो. इतरांच्या शुल्लक मतांचाही गंभीरपणे विचार करत बसलो तर आपले हे काम पूर्ण होण्याच्या प्रचंड दूर असेल. कुलकर्णी काही मुद्दे मांडतात व त्यावर मी मते मांडतो, या दोन्हीपैकी तुम्हाला जे जे योग्य वाटेल त्यानुसार उचित बदल करावा. तुम्हाला अधिकार आहेत. हा अंतिम बदल मान्य असेल. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १९:०६, १८ एप्रिल २०२० (IST)[reply]

@Sandesh9822:,
इतर पाने, गुणवत्ता व सततची संपादने यांवरही लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
हे काम अद्यापही माझ्या रडारवर आहे. फक्त एक विराम घेतला इतकेच. थोडे थोडे का होईना, हे काम करण्याचा मनसुबा आहेच.
तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०२:२५, १९ एप्रिल २०२० (IST)[reply]

आठवण[संपादन]

@अभय नातू: तुमच्यावर असंख्य कामांची जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे. मात्र हे काम सुद्धा लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे, यासाठी खूपच जास्त वेळ जात आहे. कृपया, मला पुन्हा पुन्हा निराश करु नये. --संदेश हिवाळेचर्चा २१:२७, ४ मे २०२० (IST)[reply]

जेव्हाकेव्हा वेळ मिळेल त्या प्रसंगी त्यातील थोडा तरी वेळ यावर खर्च करेन हे आश्वासन देतो. -- अभय नातू (चर्चा) ०२:५९, ९ मे २०२० (IST)[reply]

@अभय नातू: कृपया, सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर/१ या लेखावर काम थांबवावे, कारण त्याचे पुनर्लेखन झालेले नाही, त्यावर काम व्हायचे अजून बाकी आहे. आपण सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर यावर काम करावे.

"उच्च शिक्षण" विभागातील केवळ "लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन" ह्या उपविभागाची पडताळणी बाकी आहे, याचे काम पूर्ण झाले की संपूर्ण "उच्च शिक्षण" विभागाचे काम पूर्ण होईल.

खाली मी मोठे विभाग, छोटे विभाग अशी विभागणी केली आहे; आपल्या पसंतीनुसार व वेळेनुसार पडताळणी करावी, विनंती. मूबलब वा काहीसा अधिक वेळ असेल तर मोठा निभाग उरकून घ्यावा, तसेच कधी कमी वेळ असेल तर लहान विभागावर काम करावे. शेवटी अत्यंत लहान विभाग दिले आहेत ज्यांना सहज व लवकर हलवले जायला हवे.

मोठे विभाग
  1. जातीअंताचा लढा व अस्पृश्यता निर्मूलन
  2. गोलमेज परिषदांमधील सहभाग
  3. संविधानाची निर्मिती
  4. प्रभाव आणि वारसा
लहान विभाग
  1. झाले.उच्च शिक्षण -> लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन
  2. राजकीय कारकीर्द
  3. पुणे करार
  4. शैक्षणिक कार्य
  5. कायदा व न्यायमंत्री
  6. हिंदू कोड बिल
  7. अर्थशास्त्रीय कार्य व नियोजन
  8. बुद्ध जयंतीचे प्रणेते
  9. बौद्ध धर्माचा स्वीकार
  10. महापरिनिर्वाण
  11. वैयक्तिक जीवन
  12. पत्रकारिता
  13. लोकप्रिय संस्कृतीमध्ये
इतर (अत्यंत छोटी कामे; यावर शक्य तितक्या लवकर हलवावे)
  1. झाले. हे सुद्धा पहा
  2. बाह्य दुवे
  3. वर्ग
  4. आणि इतर...

--संदेश हिवाळेचर्चा ११:१६, १७ मे २०२० (IST)[reply]

सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर/१ यातील (केवळ) वकिली विभागाची पुनपडताळणी करुन तेथील मजकूर मुख्य लेखात हलवावा, ही विनंती. --संदेश हिवाळेचर्चा १२:२४, १७ मे २०२० (IST)[reply]

ही विभागणी केल्याबद्दल धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २३:२५, १७ मे २०२० (IST)[reply]

@अभय नातू: कृपया, यावर काम करावे. हा लेख पूर्ण झाल्यानंतरही मला त्यात लहान सहान कामे करावी लागणार आहेत. तसेच इतरही माहिती जोडावी लागणार आहे. मात्र दीर्घकाळापासून लेख अपूर्ण अवास्थेत असल्याने यात नवीन लिहायला मन होत नाही. हे काम लवकर पूर्ण झाले तर हे व इतरही कामात लक्ष घातला येईल. --संदेश हिवाळेचर्चा ०९:३५, २२ मे २०२० (IST)[reply]

@अभय नातू: तुम्ही येथे पडताळणी केलेला मजकूर खालील आहे. कृपया, यास वकिली विभाग हलवावे.

शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील व्यापारी चंदुलाला सरूपचंद शहा यांच्याविरुद्ध १९३०च्या इंडियन पिनल कोडच्या कायद्याखाली बेकायदा शस्त्रे आणि स्फोटके बाळगल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असताना शहा यांचे वकील प्रभाकर रेगे यांनी या गुन्ह्यातून तुम्हाला सोडवणे आपणास शक्य नसल्याचे सांगितला व दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये राहणाऱ्या डॉ. आंबेडकरांना भेटण्याचे सांगतले. पुढची तारीख कोणती आहे हे विचारुन डॉ. आंबेडकरांनी त्यांचे वकीलपत्र स्वीकारले. त्यांनी ठाणे येथे सत्र न्यायालयात शस्त्र कायद्याप्रकरणी न्यायाधीशांसमोर दोनच मिनिटे युक्तिवाद केला. या युक्तिवादानंतर न्यायाधीशांकडून चंदुलाल शेठ यांना आरोपातून निर्दोष सोडवण्यात आले. यासाठी आंबेडकरांनी फक्त ठाणे-दादर रेल्वेचे तिकीट हेच मानधन घतेले होते.[२] सन १९३० ते १९३८ या कालावधीत शहापूर येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात वकील म्हणून अनेक खटले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवले. वाशिंद येथील नाना मलबारी यांच्या घरी डॉ. आंबेडकर आले असताना ते ज्या लाकडी खुर्चीवर बसले होते ती खुर्ची त्यांनी आजपर्यंत जपून ठेवली आहे. आता ती खुर्ची कासने येथील विहारात मलबारी यांनी दान केलेली आहे.[३]

--संदेश हिवाळेचर्चा ०२:३२, २४ मे २०२० (IST)[reply]

@अभय नातू: वरील मजकूर वकिली विभागात हलवल्याबद्दल आभारी आहे. मात्र हे करताना या विभागात आधी असलेला (व पडताळणी झालेला) मजकूरही हटवला गेला आहे, (येथे) कृपया तो ही पूर्ववत आणावा. धन्यवाद. @Tiven2240: आपणही हा सुधार करु शकता. --संदेश हिवाळेचर्चा १०:४४, २४ मे २०२० (IST)[reply]

@अभय नातू: कृपया चुकून वगळला गेलेला मजकूर (वकिली विभाग) पुनर्स्थापित करावा. --संदेश हिवाळेचर्चा १६:२५, २६ मे २०२० (IST)[reply]

टायवीन, मजकूर पुनर्स्थापित केल्याबद्दल धन्यवाद.--संदेश हिवाळेचर्चा १३:०६, २७ मे २०२० (IST)[reply]

@अभय नातू: "लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन" या पडताळणी झालेल्या उपविभागात आपण काही 'संदर्भ हवा' साचे जोडले होते, मी तेथे संदर्भ जोडले आहेत. कृपया, हा संदर्भासह असलेला उपविभाग पुन्हा मुख्य लेखात हलवावा. @Tiven2240: आपणही हे करु शकता. --संदेश हिवाळेचर्चा १३:०६, २७ मे २०२० (IST)[reply]

झाले. -- अभय नातू (चर्चा) ०७:२६, २८ मे २०२० (IST)[reply]

@अभय नातू: मी कृपया उर्वरित विभागांची पडताळणी सुरु करावी. मी वर विभागांचे लहान व मोठे वर्गीकरण केले आहे. छोट्या वर्गांपासून सुरुवात केली तर हे काम पूर्ण होणे सहज शक्य आहे, आपल्याकडे मनुष्यबळ कमी आहे, तसेच प्रचालक ही कमी सक्रिय आहेत, त्यामुळे यास अधिक विलंब होतोय याची मला कल्पना आहे. पण तरीही हे एक महत्त्वाचे पूर्ण करायचे काम मानून पूर्ण लवकर करायला करावे. धन्यवाद. @Tiven2240: आपण सुद्धा काही लहान विभागांची पडताळणी करण्यास सक्षम आहात, त्यामुळे सुकार्य करावे ही विनंती.--संदेश हिवाळेचर्चा १३:२९, २९ मे २०२० (IST)[reply]

एल्फिन्स्टन हायस्कूल[संपादन]

वि.सू. : एल्फिन्स्टन हायस्कूल हे एल्फिन्स्टन रस्त्यावर (परेलमध्ये) नव्हते, ते धोबी तलावापाशी होते. नंतरच्या काळात ती शाळा 'एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल' या नावाने ओळकली जाऊ लागली. आज २०२० सालीही ती शाळा तशीच आहे. ... ज (चर्चा) १७:४७, १३ जुलै २०२० (IST)

सूचना - माझ्या माहितीप्रमाणे महूचे नाव अधिकृतरीत्या आंबेडकरनगर झालेले नाही. MHOW = Military Headqurters Of War. हे नाव बदलता येईल असे वाटत नाही. (चर्चा)

@: en:Dr. Ambedkar Nagar २००३ मध्ये राज्य सरकार द्वारे महू चे नाव बदलण्यात आले आहे.--संदेश हिवाळेचर्चा

राज्य सरकारने नाव बदलले तरी ते केंद्र सरकारने मान्य करून तसे गॅझॆटमध्ये प्रसिद्ध केल्याशिवाय अधिकृत होत नाही. याबाबतीत ते सर्व झाले असावे! महूच्या लोकांनी हा बदल स्वीकारलेला नाही. पहा : नगर” में 15 साल बाद भी जनता की जुबान पर “महू” कायम. महाराष्ट्र सरकारने पुण्याच्या डेक्कन जिमखान्याचे नाव बदलून संंभाजीनगर केले, औरंगाबादचे संंभाजीनगर केले, गोव्यातील वास्को शहराचे संभाजीनगर झाले, पण जनता ही बदलेली नावे वापरीत नाही (हा थोर माणसांचा अपमान आहे!)

छत्रपती शाहूजी महाराज नगर (अमेथी)->गौरीगंज, हापुड जिल्हा->पंचशीलनगर जिल्हा, बहजोई जिल्हा->भीमनगर जिल्हा, हाथरस->महामायानगर, कानपूर देहात जिल्हा->रमाबाई नगर जिल्हा, शामली जिल्हा-प्रबुद्धनगर जिल्हा, इलाहाबाद->प्रयागराज ही आणखी काही उदाहरणे. .... (चर्चा) १७:२४, १३ जुलै २०२० (IST)[reply]

@अभय नातू: कृपया राहिलेले काम पूर्ण करावे. --संदेश हिवाळेचर्चा ०९:५६, २१ जानेवारी २०२१ (IST)[reply]

  1. ^ कीर, धनंजय (प्रथमावृत्ती: १४ एप्रिल १९६६; पाचवी आवृत्ती: १४ एप्रिल २००६). डॉ. बाबासाहेब आंबेडकर. मुंबई: पॉप्युलर प्रकाशन. pp. ६० ते ६३. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ http://prahaar.in/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B2/
  3. ^ http://prahaar.in/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B2/