"खासगाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २३: ओळ २३:
|अधिकृत_भाषा= [[मराठी]], [[हिंदी]]
|अधिकृत_भाषा= [[मराठी]], [[हिंदी]]
}}
}}
'''खासगांव''' हे [[जालना जिल्हा|जालना जिल्ह्याच्या]] [[जाफ्राबाद]] तालुक्यातील एक विकसनशील गाव आहे. जाफ्राबाद पासून हे गाव ९ कि.मी. अंतरावर आहे. वृक्ष लागवड, स्वच्छता अभियान, तसेच तंत्रज्ञानाच्या विविध योजना व उपक्रम या येथे राबवल्या गेल्या आहेत.
'''खासगांव''' हे [[जालना जिल्हा|जालना जिल्ह्याच्या]] [[जाफ्राबाद]] तालुक्यातील एक विकसनशील गाव आहे. जाफ्राबाद पासून हे गाव ९ कि.मी. अंतरावर आहे. वृक्ष लागवड, स्वच्छता अभियान, तसेच तंत्रज्ञानाच्या विविध योजना व उपक्रम या येथे राबवल्या गेल्या आहेत. स्वच्छता अभियानामध्ये या गावाने जिह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे तर स्मार्ट ग्राम (आदर्श गांव) म्हणून तालुक्यात हे गांव प्रथम स्थानावर नामांकित झाले आहे.


== लोकसंख्या ==
== लोकसंख्या ==

१०:२२, १३ मे २०१७ ची आवृत्ती

  ?खासगांव

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

२०° १५′ २०.८८″ N, ७६° ०३′ २९.५२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १,२६७.०९ चौ. किमी
जवळचे शहर जाफ्राबाद
विभाग औरंगाबाद
जिल्हा जालना
तालुका/के जाफ्राबाद
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
३,५७३ (२०११)
• ३/किमी
९०३ /
भाषा मराठी, हिंदी

खासगांव हे जालना जिल्ह्याच्या जाफ्राबाद तालुक्यातील एक विकसनशील गाव आहे. जाफ्राबाद पासून हे गाव ९ कि.मी. अंतरावर आहे. वृक्ष लागवड, स्वच्छता अभियान, तसेच तंत्रज्ञानाच्या विविध योजना व उपक्रम या येथे राबवल्या गेल्या आहेत. स्वच्छता अभियानामध्ये या गावाने जिह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे तर स्मार्ट ग्राम (आदर्श गांव) म्हणून तालुक्यात हे गांव प्रथम स्थानावर नामांकित झाले आहे.

लोकसंख्या

खासगाव येथे इ.स. २०११ च्या जनगणनेनुसार ७३८ कुटुंब असून लोकसंख्या ३,५७३ आहे. पैकी पुरूष लोकसंख्या १,८७८ तर स्त्रीयांची संख्या १,६९५ इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या ४९४ (पुरूष २८१ तर स्त्री २१३) असून ते एकूण लोकसंख्येच्या १३.८३ % आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या २१२ (५.९३%) असून त्यात १०६ पुरूष व १०६ स्त्रिया आहेत तर अनुसूचित जमातीचे १० लोक (०.२८%) असून त्यात ६ पुरूष व ४ स्त्रिया आहेत.[२]

घटक एकूण पुरुष स्त्री
कुटुंब ७३८
लोकसंख्या ३,५७३ १,८७८ १,६९५
मुले (० ते ६ ) ४९४ २८१ २१३
अनु. जाती २१२ १०६ १०६
अनु. जमाती १०
साक्षरता ७४.३७% ८६.१६% ६१.६७%
एकूण कामगार १,७५३ १,०४६ ७०७
एकूण मतदार २,७०१ १,४७६ १,२२५

साक्षरता

  • एकूण साक्षर लोकसंख्या: ७४.३७ %
  • साक्षर पुरुष लोकसंख्या: ८६.१६ %
  • साक्षर स्त्री लोकसंख्या: ६१.६७ %

ग्रामसंसद

खासगांवातील ग्रामपंचायत सदस्य संख्या ११ असून एकूण मतदार संख्या २,७०१ आहे, ज्यात १,४७६ पुरुष व १,२२५ स्त्रिया आहेत.

शैक्षणिक सुविधा

गावामध्ये अनेक शैक्षणिक केंद्रे उपलब्ध आहेत.

  • जि. प. केंद्रिय प्राथमिक शाळा, खासगांव (प्राथमिक) (विद्यार्थी संख्या - ४४)
  • जिल्हा परिषद प्रशाला, खासगांव (माध्यमिक) (विद्यार्थी संख्या - २२०)
  • अभिजीत कला व वाणिज्य महाविद्यालय, खासगांव
  • जिजाऊ इंग्लिश स्कूल, खासगांव

याशिवाय ही काही वस्ती शाळा गावात आहेत.

आरोग्य केंद्र

गावात अनेक वैद्यकिय व आरोग्य केंद्रे उपलब्ध आहेत.

  • प्राथमिक आरोग्य केंद्र — १
  • प्राथमिक आरोग्य उपकेंद्र — १
  • पशुवैद्यकिय दवाखाना — १
  • अंगणवाडी — ५

पिण्याचे पाणी

  1. सार्वजनिक विहिरी — ३
  2. खाजगी विहिरी — १९५
  3. बोअर वेल — २५
  4. हातपंप — ७
  5. पाण्याची टाकी — ३
  6. नळ योजना — २
  7. स्टँडपोस्ट — ११
  8. नळ कनेक्शन — ५४४
  9. वाटर फिल्टर — १

गावात वाटर फिल्टर बसवल्यामुळे शुद्ध पाणी उपलब्ध आहे. हे पाणी ५ रूपयामध्ये १५ लिटर तसेच १ रू मध्ये १ लीटर अशी व्यवस्था येथे केलेली आहे.

नद्या

गावातून दोन नद्या वाहतात — सितान्हानीतरी (मोठी नदी) आणि लेंडी नदी

गावांतून जाणाऱ्या या दोन्ही नद्यांची खोली वाढवून त्यात ठिकठिकाणी सिमेंट बांधारे (कट्टा) घालून पाणी अडवा-पाणी जिरवा ची योजगा राबवलेली आहे. यामुळे पाण्याचे पाणी व शेतीसाठीचे पाणी यांचे प्रमाण व उपलब्धता वाढली आहे.

स्वच्छता

खासगांव हे स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर आहे. गावात कुठेही उघडी गटारव्यवस्था उपलब्ध नाहीत. रोज सकाळी येणारी ग्रामपंचायतीची कचरा गाडी उपलब्ध आहे.

हगनदारी मुक्त

गावात जवळजवळ ९९% जणांनी शौचालये बांधलेली असून हे गाव हगनदारी मुक्त आहे.

संपर्क व दळणवळण

खासगांव येथे डाक घराची सुविधा उपलब्ध असून त्याचा पिन कोड ४३१ २०६ आहे. गावात दूरध्वनी उपलब्ध असून मोबाईल टॉवर ही उभारण्यात आले आहे. गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. गावात शासकीय बस सेवा तसेच ऑटोरिक्षा, टॅक्सी व व्हॅन उपलब्ध आहे.

बाजार

गावात रेशन दुकान उपलब्ध आहे. गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध असून तो गुरूवार या दिवशी असतो. गावच्या बाजारात गाय, बैल, म्हैस, शेळी इत्यादी पशूंची खरेदी विक्री सुद्धा केली जाते.

लोकजीवन

खासगावांत विविध जाती - धर्माचे लोक राहतात. त्यात प्रामुख्याने मराठा, गोंधळी, मुस्लिम, धनगर, माळी, बौद्ध हे समाज आहेत. तसेच वडार, चांभार, मांग इत्यादी समाज सुद्धा अल्प प्रमाणात आहेत.

धार्मिक स्थळे

गावात अनेक धार्मिक स्थळे आहेत. त्यात हनुमान मंदिर, दुर्गा देवी मंदिर, दत्त संस्थान, बौद्ध विहार व दोन मस्जिदी ही प्रमुख धर्मस्थळे आहेत.

आरोग्य

गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात पाच अंगणवाड्या (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहेत. गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे.

गावात कपड्डीचे क्रिंडागण उपलब्ध आहे. गावात खेळ / करमणूक केंद्र उपलब्ध नाही. सर्वात जवळील खेळ / करमणूक केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.

साने गुरूजी सार्वजनिक ग्रंथालय उपलब्ध आहे. गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध आहे. गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध आहे. गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध आहे.

वीज

प्रतिदिवस १८ तासांचा वीजपुरवठा घरगुती वापरासाठी, शेतीसाठी व व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे.

उत्पादन

खडकदेवळा ह्या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्त्वाच्या उतरत्या क्रमाने): कापूस, गहू, बाजरी, ज्वारी, मका, भुईमूग, तूर, मूग

संदर्भ

हे ही पहा

बाह्य दुवे