"विठ्ठल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ७५: ओळ ७५:
* विठ्ठल गीती गावा (संगीत - [[राम फाटक]])
* विठ्ठल गीती गावा (संगीत - [[राम फाटक]])
* विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला (गायिका - [[लता मंगेशकर]])
* विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला (गायिका - [[लता मंगेशकर]])
* विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत (कवी - [[दत्ता पाटील]], गायक - कैलाश xxxx)
* विठ्ठलाच्या पायी थरारली वीट (गायक - [[भीमसेन जोशी]], चित्रपट - देवकीनंदन गोपाला)
* विठ्ठलाच्या पायी थरारली वीट (गायक - [[भीमसेन जोशी]], चित्रपट - देवकीनंदन गोपाला)
* विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी
* विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी

२१:२६, ३० जुलै २०१५ ची आवृत्ती

पंढरपूरचा पांडुरंग
विठ्ठल-रखुमाईच्या सजविलेल्या मूर्ती

विठोबा, विठू, विठ्ठल, पांडुरंग, वा पंढरीनाथ ही हिंदू देवता मुख्यतः भारताच्या महाराष्ट्रकर्नाटक ह्या राज्यात वंदिली जाते. विठोबा हा श्रीहरी चा द्वापार युगातील दुसरा आणि दशावतारातील नववा अवतार आहे. परंतु शास्त्र-पुराणांमध्ये विठठलाला बौध्य वा बोधराज म्हटले आहे. गरुड पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे बौध्य हा विशाल भाल असलेला, तेजस्वी नेत्रांचा, मौन धारण केलेला, कटि-कर ठेवून उभा असा आहे. हे वर्णन पूर्णपणे विठ्ठ्लाला लागू पडते.. विठोबाच्या प्रतिमा ह्या कटीवर हात ठेऊन, भक्त पुंडलिकाने टाकलेल्या विटेवर उभ्या राहिलेल्या सावळ्या पुरुषाच्या वेषात दर्शवितात. त्याच्या संगे काही वेळा पत्‍नी रखुमाई उर्फ रुक्मिणी उभी असते.

विठोबा हा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे व कर्नाटकातील हरिदास संप्रदायाचे आराध्य दैवत आहे. त्याचे प्रमुख मंदिर महाराष्ट्रात कर्नाटक सीमेजवळ पंढरपूर येथे आहे. जरी हे मंदिर कधी बांधले गेले हे निश्चित माहित नसले तरी ते तेराव्या शतकापासून उभे आहे ह्याचे पुरावे आढळतात. पंढरपूरमध्ये वर्षातून चार यात्रा भरतात. त्यातील आषाढी एकादशीला भरणार्‍या यात्रेत लाखो भाविक सहभागी होतात. आलेले भाविक भीमा नदीमध्ये स्नान करतात. या नदीला येथे चंद्रभागा म्हणतात. विठोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत होय.[१]

विठोबाशी निगडित कथा

विठोबा हा देव भक्त पुंडलिकाच्या भेटीला आलेला व वारकरी संतांचा कैवारी समजला जातो. त्याचा अवतार हा गयासुर नावाच्या राक्षसाच्या समूळ नाश करण्यासाठी द्वापार युगात झाला होता. त्यावेळी गयासुर अरीने सत्यश्रेष्ठ धर्माचा नाश करण्यासाठी देव गणांना भुलवण्याचे तथा गो-ब्राम्हण हत्येचे अखंड सत्र चालवले होते. यास्तव श्री मन्महा मूळ जगत्पित्याच्या आज्ञेने श्रीहरीने बौध्य नामे अवतार घेऊन गयासुराला अग्निकुंडात जाळून भस्म केले होते . नंतर त्याचा परमभक्त जो पुंडलिक यास भेटून स्वरूप दाखविले होते आणि मातापित्याची सेवा केल्याचे फळ म्हणून मोक्षास पात्र केले होते.

संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ इत्यादी विठोबाचे थोर भक्त १३ ते १७ व्या शतकात होऊन गेले. वारकरी संतांनी विठोबाच्या स्तुतीत अनेक मराठी अभंगांची रचना केली आहे. कन्‍नड कवींनी कानडी श्लोक व आदि शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टक स्तोत्र रचिले आहे. विठोबाचे प्रमुख सण शयनी एकादशीप्रबोधिनी एकादशी आहेत.

दशावतार origional photo

मराठी विठ्ठलगाणी

विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्याने विठ्ठलावर मराठी कवींनी अनेक गीते, भक्तिगीते, चित्रपटगीते आणि नाट्यगीते लिहिली आहेत. त्यांतली काही ही -

(अपूर्ण यादी)

संदर्भ

  1. ^ http://wayback.archive.org/web/20080209014300/http://solapur.gov.in/htmldocs/rpandharpur.htm. Archived from the original on १९ ऑगस्ट २०१४. २००७-०९-३० रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

हेही पहा