"वि.वा. शिरवाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ २८३: | ओळ २८३: | ||
==कुसुमाग्रज यांच्या नावाचे पुरस्कार== |
==कुसुमाग्रज यांच्या नावाचे पुरस्कार== |
||
* नक्षत्राचे देणे काव्यमंच संस्थेचा कुसुमाग्रज स्मृति गौरव पुरस्कार : हा कवी प्रा. शांताराम हिवराळे यांना मिळाला होता. |
|||
* [[यशवंतराव चव्हाण]] मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्यावतीने देण्यात येणारा [[कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार]] |
* [[यशवंतराव चव्हाण]] मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्यावतीने देण्यात येणारा [[कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार]] |
||
* कुसुमाग्रज प्रतिष्ठान (नाशिक) यांच्यातर्फे देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असते. २०१३साली [[भालचंद्र नेमाडे]] यांना हा [[पुरस्कार]] प्रदान करण्यात आला होता. |
* कुसुमाग्रज प्रतिष्ठान (नाशिक) यांच्यातर्फे देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असते. २०१३साली [[भालचंद्र नेमाडे]] यांना हा [[पुरस्कार]] प्रदान करण्यात आला होता. |
||
* नशिकच्या [[यशवंतराव चव्हाण]] मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीने देण्यात येणारा [[कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार]]. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे याही पुरस्काराचे स्वरूप असते. २०१० साली कन्नड साहित्यिक जयंत कैकिणी, २०११ साली हिंदी साहित्यिक डॉ. चंद्रकांत देवतळे, २०१२ साली मल्याळी साहित्यिक के.सच्चिनानंदन आणि २०१३ साली गुजराथी कवी, नाटककार आणि समीक्षक डॉ. सितांशू यशश्चंद्र यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. |
|||
* महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने काव्य विभागासाठी दिला जाणारा कुसुमाग्रज पुरस्कार : हा, हत्ती इलो (काव्यसंग्रह-कवी अजय कांडर) आणि कल्लोळातील एकांत (काव्यसंग्रह-कवी अझीम नवाज) यांना विभागून मिळाला होता. |
|||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
११:३९, १३ मार्च २०१३ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
वि.वा. शिरवाडकर | |
---|---|
चित्र:Vi-va-shirvadkar-kusumagraj.jpg | |
जन्म नाव | वि.वा. शिरवाडकर |
जन्म | २७ फेब्रुवारी, १९१२ |
मृत्यू | १० मार्च, १९९९ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य, कवी |
वडील | वामन शिरवाडकर |
पुरस्कार |
ज्ञानपीठ पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार |
विष्णु वामन शिरवाडकर,(२७ फेब्रुवारी, १९१२-१० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे त्यांचे वर्णन करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
जीवन
कुसुमाग्रजांचा जन्म पुणे येथे इ.स १९१२ मध्ये २७ फेब्रुवारी या दिवशी झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी.ए.ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर स्वराज्य, प्रभात,नवयुग,धनुर्धारी, अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. १९३२ साली झालेल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता. १९३३ साली त्यांनी 'ध्रुव मंडळा'ची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमधे सहभाग घेतला. पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली.
१० मार्च १९९९ रोजी शिरवाडकरांचे निधन झाले.
वि.वा. शिरवाडकर यांच्या स्मरणार्त्न नाशिक येथे ’कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ नावाची संस्था उभी करण्यात आली आहे.
साहित्य
कुसुमाग्रज यांची खालील पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.
कविता संग्रह
- जीवन लहरी(१९३३)
- जाईचा कुंज (१९३६)
- विशाखा (१९४२)
- समिधा ( १९४७)
- किनारा(१९५२)
- मेघदूत(१९५६)
- मराठी माती (१९६०)
- स्वगत(१९६२)
- हिमरेषा(१९६४)
- वादळ वेल (१९६९)
- रसयात्रा (१९६९)
- छंदोमयी (१९८२)
- मुक्तायन (१९८४)
- श्रावण (१९८५)
- प्रवासी पक्षी (१९८९)
- पांथेय (१९८९)
- माधवी(१९९४)
- महावृक्ष (१९९७)
- चाफा(१९९८)
- मारवा (१९९९)
- अक्षरबाग (१९९९)
- थांब सहेली (२००२)
निबंध संग्रह
- आहे आणि नाही (पुस्तक) - लघुनिबंध संग्रह
- प्रतिसाद(पुस्तक) - लघुनिबंध संग्रह
नाटक
- दूरचे दिवे
- दिवाणी दावा
- आमचं नाव बाबुराव
- वैजयंती
- नाटक बसते आहे
- बेकेट
- आनंद
- राजमुकुट
- देवाचे घर
- एक होती वाघीण
- मुख्यमंत्री
- वीज म्हणाली धरतीला
- ऑथेल्लो
- विदूषक
- जेथे चंद्र उगवत नाही
- दुसरा पेशवा
- कौंतेय
- ययाति देवयानी
- नटसम्राट
कथासंग्रह
- फुलवाली (कथासंग्रह)
- काही वृद्ध काही तरुण (कथासंग्रह)
- सतारीचे बोल (कथासंग्रह)
- अपॉईंटमेंट (कथासंग्रह)
- बारा निवडक कथा (कथासंग्रह)
कादंबरी
आठवणीपर
- वाटेवरच्या सावल्या(पूर्वीचे नाव- विरामचिन्हे)
लेखनशैली
सामाजिक अन्याय व विषमता या विषयांवर कुसुमाग्रजांनी त्यांच्या लिखाणातून कठोर टीका केली. "साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे" या मताचा त्यांनी पुरस्कार केला. कवितांबरोबरच त्यांनी अनेक नाटकेही लिहिली. याशिवाय कादंबरी, कथा, लघुनिबंध इत्यादी साहित्यप्रकारही त्यांनी हाताळले.
साहित्यविचार
प्रा. देवानंद सोनटक्के यांच्या मतानुसार अशाप्रकारे कुसुमाग्रजांचा साहित्यविचार पूर्णतः लौकिकतावादी आहे. एका समाजमनस्क कलावंतांच्या सामाजिक चिंतनाचा आलेख त्यात उमटला आहे. कलावादाचा अतिरेक आणि सामाजिकतेचा तिरस्कार अशा द्वंद्वात अडकलेल्या मराठी साहित्यव्यवहारात त्यांनी समन्वय साधला आहे. कलाक्षेत्रात त्या त्या वेळी निर्माण झालेल्या संभ्रमावस्थेतेचे पितामहाच्या भूमिकेतून केलेले ते मार्गदर्शन आहे. कुसुमाग्रज, अहंकार, अनुभव आणि आविर्भाव ही कलेची आधारभूत तत्त्वे मानतात, त्यांचा हा विचार लेखकसापेक्ष आहे. अहंकार लेखकाच्या लेखनप्रक्रियेला प्रेरणा आणि गती देतो, हे तत्त्व लेखकसापेक्ष आहे. आविर्भाव आशयाचा आकार म्हणजे घाट ठरवितो, म्हणजे हे तत्त्व कलाकृतिसापेक्ष आहे. वर्चस्व हे तत्त्व रसिकसापेक्षआहे; तर लेखकाच्या अनुभवाची समृध्दी लेखकाच्या सामीलकीवर अवलंबून असते, हे तत्त्व समाजसापेक्ष आहे. कुसुमाग्रजांचा साहित्यविचार समाजसापेक्ष असून ते सामाजिकतेलाच परतत्त्व मानतात, विविध जातींतील लेखक लिहू लागणे यात त्यांना साहित्याची परपुष्टता, समृद्धी वाटते. [१]
कुसुमाग्रजांच्या साहित्यविचाराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे तो एकाचवेळी लेखकसापेक्ष आणि समाजसापेक्ष आहे. लेखकाच्या अनुभवाला, त्याच्या स्वातंत्र्याला आणि त्याचा व्यक्तिमत्त्वाला कुसुमाग्रज महत्त्व देतात. कलेचे आधारभूत तत्त्व ते सौंदर्य, नीती, आत्मनिष्ठा इत्यादींना मानत नाही. त्यांच्या मते "अहंकार, अनुभव आणि आविर्भाव ही साहित्याचीच नव्हे कोणत्याही मानवनिर्मित कलेची आधारभूत तत्त्वे होत.” (रूपरेषा,पृ.२३)
प्रा. देवानंद सोनटक्के यांच्या मतानुसार कलाकृतीत नावीन्य अनुभवामुळेच येते, असे कुसुमाग्रज म्हणतात. म्हणजे कुसुमाग्रजांची नावीन्याची संकल्पना आकृतिवादी नसून आशयवादी आहे.नावीन्य व अनुभव समृद्धीसाठी लेखकाने सामीलकी आणि सामाजिकतेचा स्वीकार करावा. समाजजीवनातील उपेक्षितांचे अनुभव साहित्यात यावे. त्यासाठी समाजजीवनातील व साहित्य व्यवहारातील पुरोहितशाही, जातीयता नष्ट होणे गरजेचे आहे, असे कुसुमाग्रज मानतात.
साहित्य
कुसुमाग्रज यांची खालील पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.
कविता संग्रह
- जीवन लहरी(१९३३)
- जाईचा कुंज (१९३६)
- विशाखा (१९४२)
- समिधा ( १९४७)
- किनारा(१९५२)
- मेघदूत(१९५६)
- मराठी माती (१९६०)
- स्वगत(१९६२)
- हिमरेषा(१९६४)
- वादळ वेल (१९६९)
- रसयात्रा (१९६९)
- छंदोमयी (१९८२)
- मुक्तायन (१९८४)
- श्रावण (१९८५)
- प्रवासी पक्षी (१९८९)
- पांथेय (१९८९)
- माधवी(१९९४)
- महावृक्ष (१९९७)
- चाफा(१९९८)
- मारवा (१९९९)
- अक्षरबाग (१९९९)
- थांब सहेली (२००२)
निबंध संग्रह
- आहे आणि नाही (पुस्तक) - लघुनिबंध संग्रह
- प्रतिसाद(पुस्तक) - लघुनिबंध संग्रह
नाटक
- दूरचे दिवे
- दिवाणी दावा
- आमचं नाव बाबुराव
- वैजयंती
- नाटक बसते आहे
- बेकेट
- आनंद
- राजमुकुट
- देवाचे घर
- एक होती वाघीण
- मुख्यमंत्री
- वीज म्हणाली धरतीला
- ऑथेल्लो
- विदूषक
- जेथे चंद्र उगवत नाही
- दुसरा पेशवा
- कौंतेय
- ययाति देवयानी
- नटसम्राट
कथासंग्रह
- फुलवाली (कथासंग्रह)
- काही वृद्ध काही तरुण (कथासंग्रह)
- सतारीचे बोल (कथासंग्रह)
- अपॉईंटमेंट (कथासंग्रह)
- बारा निवडक कथा (कथासंग्रह)
कादंबरी
आठवणीपर
- वाटेवरच्या सावल्या(पूर्वीचे नाव- विरामचिन्हे)
पुरस्कार
- महाराष्ट्र सरकारचे उत्कृष्ट पुस्तकासाठीचे पुरस्कार
- ’मराठी माती’ला १९६० साली
- ’स्वगत’ला १९६२ साली
- ’हिमरेषा’ला १९६२ साली
- ’नटसम्राट’ला १९७१ साली
- ’नटसम्राट’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार (१९७४)
- विशाखा कवितासंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार
- भारत सरकारचा साहित्यक्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार (... साली)
कुसुमाग्रज यांच्या नावाचे पुरस्कार
- नक्षत्राचे देणे काव्यमंच संस्थेचा कुसुमाग्रज स्मृति गौरव पुरस्कार : हा कवी प्रा. शांताराम हिवराळे यांना मिळाला होता.
- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्यावतीने देण्यात येणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार
- कुसुमाग्रज प्रतिष्ठान (नाशिक) यांच्यातर्फे देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असते. २०१३साली भालचंद्र नेमाडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
- नशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीने देण्यात येणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे याही पुरस्काराचे स्वरूप असते. २०१० साली कन्नड साहित्यिक जयंत कैकिणी, २०११ साली हिंदी साहित्यिक डॉ. चंद्रकांत देवतळे, २०१२ साली मल्याळी साहित्यिक के.सच्चिनानंदन आणि २०१३ साली गुजराथी कवी, नाटककार आणि समीक्षक डॉ. सितांशू यशश्चंद्र यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.
- महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने काव्य विभागासाठी दिला जाणारा कुसुमाग्रज पुरस्कार : हा, हत्ती इलो (काव्यसंग्रह-कवी अजय कांडर) आणि कल्लोळातील एकांत (काव्यसंग्रह-कवी अझीम नवाज) यांना विभागून मिळाला होता.
संदर्भ
- ^ २९ सप्टें. २०११ कुसुमाग्रजांचे साहित्य: राष्ट्रीय चर्चासत्र, नागपूर शोधनिबंध: प्रा. देवानंद सोनटक्के कुसुमाग्रजांचा साहित्यविचार : सामाजिक चिंतनाचा आलेख प्रा. देवानंद सोनटक्के कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर
बाह्य दुवे
- http://www.marathimati.com/MaharashtraLegends/kusumagraj.asp. Missing or empty
|title=
(सहाय्य) - http://www.kusumagraj.org/. Missing or empty
|title=
(सहाय्य) - कुसुमाग्रजांची प्रसिद्ध कणा कविता - मराठीमाती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |