"आरती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{हिंदू धर्मग्रंथ}}
{{हिंदू धर्मग्रंथ}}

मनातील सर्व भावना एकवटुन 'अत्यंत आर्ततेने' गायली जाते ती '''आरती'''. [[गणपती|गणपतीस]] आद्यपूजेचा मान आहे,म्हणुन गणपतीची आरती सर्वप्रथम. त्यानंतर,[[कुलदैवत|कुलदैवताची]], त्यापाठोपाठ, [[देवी|देवीची]] व [[इष्टदेवता|इष्टदेवतेची]] आरती म्हणावी अशी परंपरा आहे.किमान 'तीन' आरत्या हव्याच अशी पध्दत आहे.त्यापेक्षा जास्त कितीही चालतात.पण त्या विषम संख्येत असाव्यात असा संकेत आहे.
धार्मिक हिंदुधर्मीयांकडून देवाबद्दलच्या मनातील सर्व भावना एकवटून 'अत्यंत आर्ततेने' गायली जाते ती '''आरती'''. [[गणपती|गणपतीस]] आद्यपूजेचा मान आहे, म्हणून गणपतीची आरती सर्वप्रथम. त्यानंतर,[[कुलदैवत|कुलदैवताची]], त्यापाठोपाठ, [[देवी|देवीची]] व [[इष्टदेवता|इष्टदेवतेची]] आरती म्हणावी अशी परंपरा आहे. पूजेच्या वेळी एकापाठोपाठ किमान 'तीन' आरत्या म्हटल्या जाव्यात अशी पद्धत आहे. अनेकदा लोक त्यापेक्षा जास्त, पण विषम संख्येत आरत्या म्हणतात.

;आरतीबद्दल काही संकेत:

==[[आरती]]करण्याची संपूर्ण कृती ==
==[[आरती]]करण्याची संपूर्ण कृती ==
ओळ २०: ओळ २२:
३. आरती म्हणतांना [[शब्दोच्चार]] [[अध्यात्मशास्त्र]]-दृष्ट्या योग्य असावा.

३. आरती म्हणतांना [[शब्दोच्चार]] [[अध्यात्मशास्त्र]]-दृष्ट्या योग्य असावा.

'''. आरती म्हणत असतांना टाळ्या वाजवाव्यात.'''
'''. आरती म्हणत असतांना टाळ्या वाजवाव्यात.'''

१. प्राथमिक अवस्थेतील : [[ताल]] धरण्यासाठी टाळ्या हळुवारपणे वाजवाव्यात.

१. प्राथमिक अवस्थेतील : [[ताल]] धरण्यासाठी टाळ्या हळुवारपणे वाजवाव्यात.

२. पुढच्या अवस्थेतील : टाळ्या न वाजवता [[अंतर्मुखता]] साधण्याचा प्रयत्न करावा.

२. पुढच्या अवस्थेतील : टाळ्या न वाजवता [[अंतर्मुखता]] साधण्याचा प्रयत्न करावा.

'''. आरती म्हणत असतांना टाळ्यांच्या जोडीला [[वाद्ये]] वाजवावीत.'''
'''. आरती म्हणत असतांना टाळ्यांच्या जोडीला [[वाद्ये]] वाजवावीत.'''

१. [[घंटा]] मंजुळ ध्वनीत वाजवावी आणि तिच्या नादामध्ये सातत्य ठेवावे.

१. [[घंटा]] मंजुळ ध्वनीत वाजवावी आणि तिच्या नादामध्ये सातत्य ठेवावे.

२. [[टाळ]], [[झांज]], [[पेटी]] आणि [[तबला]] या वाद्यांचीही तालबद्ध साथ द्यावी.

२. [[टाळ]], [[झांज]], [[पेटी]] आणि [[तबला]] या वाद्यांचीही तालबद्ध साथ द्यावी.

'''. आरती म्हणत असतांना [[देवाला]] ओवाळावे.'''
'''. आरती म्हणत असतांना [[देवाला]] ओवाळावे.'''

१. तबक देवाभोवती घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती फिरवावे.

१. तबक देवाभोवती घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती फिरवावे.

२. आरती ओवाळतांना ती देवाच्या डोक्यावरून ओवाळू नये, तर देवाच्या अनाहत ते [[आज्ञा चक्रा]]पर्यंत ओवाळावी.

२. आरती ओवाळतांना ती देवाच्या डोक्यावरून ओवाळू नये, तर देवाच्या अनाहत ते [[आज्ञा चक्रा]]पर्यंत ओवाळावी.

'''. ‘[[घालीन लोटांगण]]’ ही [[प्रार्थना]] म्हणावी.'''
'''. ‘[[घालीन लोटांगण]]’ ही [[प्रार्थना]] म्हणावी.'''

'''. यानंतर ‘कर्पूरगौरं करुणावतारं’ हा [[मंत्र]] म्हणत कापूर-आरती करावी.'''
'''. यानंतर ‘कर्पूरगौरं करुणावतारं’ हा [[मंत्र]] म्हणत कापूर-आरती करावी.'''

'''. [[कापूर]]-[[आरती]] ग्रहण करावी.'''
'''. [[कापूर]]-[[आरती]] ग्रहण करावी.'''

कापूर-आरती ग्रहण करावी, म्हणजे ज्योतीवर दोन्ही हातांचे तळवे धरून मग [[उजवा हात]] डोक्यावरून पुढून पाठी मानेपर्यंत फिरवावा. (काही कारणास्तव कापूर-आरती केली नसल्यास [[तुपाच्या]] [[निरांजनाच्या]] ज्योतीवर हात धरून आरती ग्रहण करावी.)
कापूर-आरती ग्रहण करावी, म्हणजे ज्योतीवर दोन्ही हातांचे तळवे धरून मग [[उजवा हात]] डोक्यावरून पुढून पाठी मानेपर्यंत फिरवावा. (काही कारणास्तव कापूर-आरती केली नसल्यास [[तुपाच्या]] [[निरांजनाच्या]] ज्योतीवर हात धरून आरती ग्रहण करावी.)

'''. देवाला शरणागत भावाने [[नमस्कार]] करावा.
'''. देवाला शरणागत भावाने [[नमस्कार]] करावा.

. त्यानंतर देवाला [[प्रदक्षिणा]] घालावी. ते सोयीचे नसल्यास स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालाव्यात.
. त्यानंतर देवाला [[प्रदक्षिणा]] घालावी. ते सोयीचे नसल्यास स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालाव्यात.

अं . यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणावी.
. यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणावी.

. [[मंत्रपुष्पांजली]] म्हटल्यानंतर देवतेच्या चरणांवर फूल आणि अक्षता वहाव्यात.
. [[मंत्रपुष्पांजली]] म्हटल्यानंतर देवतेच्या चरणांवर फूल आणि अक्षता वहाव्यात.

. नंतर पुढीलप्रमाणे प्रार्थना करावी.'''

अं. नंतर पुढीलप्रमाणे प्रार्थना करावी.'''

१७:५९, १९ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग
aum symbol
वेद
ऋग्वेद · यजुर्वेद
सामवेद · अथर्ववेद
वेद-विभाग
संहिता · ब्राह्मणे
आरण्यके  · उपनिषदे
उपनिषदे
ऐतरेय  · बृहदारण्यक
ईश  · तैत्तरिय · छांदोग्य
केन  · मुंडक
मांडुक्य  ·प्रश्न
श्वेतश्वतर  ·नारायण
कठ
वेदांग
शिक्षा · छंद
व्याकरण · निरुक्त
ज्योतिष · कल्प
महाकाव्य
रामायण · महाभारत
इतर ग्रंथ
स्मृती · पुराणे
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई
पंचतंत्र · तंत्र
स्तोत्रे ·सूक्ते
मनाचे श्लोक · रामचरितमानस
शिक्षापत्री · वचनामृत

धार्मिक हिंदुधर्मीयांकडून देवाबद्दलच्या मनातील सर्व भावना एकवटून 'अत्यंत आर्ततेने' गायली जाते ती आरती. गणपतीस आद्यपूजेचा मान आहे, म्हणून गणपतीची आरती सर्वप्रथम. त्यानंतर,कुलदैवताची, त्यापाठोपाठ, देवीचीइष्टदेवतेची आरती म्हणावी अशी परंपरा आहे. पूजेच्या वेळी एकापाठोपाठ किमान 'तीन' आरत्या म्हटल्या जाव्यात अशी पद्धत आहे. अनेकदा लोक त्यापेक्षा जास्त, पण विषम संख्येत आरत्या म्हणतात.

आरतीबद्दल काही संकेत

आरतीकरण्याची संपूर्ण कृती

आरती करतांना कोणकोणत्या कृती करायच्या असतात, ते पुढे दिले आहे.

अ. आरतीच्या पूर्वी तीन वेळा शंख वाजवावा.
१. शंख वाजवण्यास प्रारंभ करतांना मान वर करून, ऊर्ध्व दिशेकडे मनाची एकाग्रता साधावी.
२. शंख वाजवतांना डोळे मिटून, ‘ऊध्र्व दिशेकडून येणार्‍या ईश्वराच्या मारक लहरींना आपण आवाहन करून त्यांना जागृत करत आहोत’, असा भाव ठेवावा.
३. शंख वाजवतांना शक्यतो आधी श्वास पूर्णतः छातीत भरून घेऊन मग एका श्वासात वाजवावा.
४. शंखध्वनी करतांना तो लहानापासून मोठ्या ध्वनीकडे न्यावा आणि तिथेच सोडावा.

आ. शंखनाद झाल्यानंतर आरती म्हणायला प्रारंभ करावा.
१. ‘भगवंत प्रत्यक्ष समोर आहे आणि मी त्याची आळवणी करत आहे’, या भावाने आरती म्हणावी.
२. आरतीचा अर्थ लक्षात घेऊन आरती म्हणावी.
३. आरती म्हणतांना शब्दोच्चार अध्यात्मशास्त्र-दृष्ट्या योग्य असावा.

ॲ. आरती म्हणत असतांना टाळ्या वाजवाव्यात.
१. प्राथमिक अवस्थेतील : ताल धरण्यासाठी टाळ्या हळुवारपणे वाजवाव्यात.
२. पुढच्या अवस्थेतील : टाळ्या न वाजवता अंतर्मुखता साधण्याचा प्रयत्न करावा.

ऑ. आरती म्हणत असतांना टाळ्यांच्या जोडीला वाद्ये वाजवावीत.
१. घंटा मंजुळ ध्वनीत वाजवावी आणि तिच्या नादामध्ये सातत्य ठेवावे.
२. टाळ, झांज, पेटी आणि तबला या वाद्यांचीही तालबद्ध साथ द्यावी.

इ. आरती म्हणत असतांना देवाला ओवाळावे.
१. तबक देवाभोवती घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती फिरवावे.
२. आरती ओवाळतांना ती देवाच्या डोक्यावरून ओवाळू नये, तर देवाच्या अनाहत ते आज्ञा चक्रापर्यंत ओवाळावी.

ई. ‘घालीन लोटांगण’ ही प्रार्थना म्हणावी.
उ. यानंतर ‘कर्पूरगौरं करुणावतारं’ हा मंत्र म्हणत कापूर-आरती करावी.
ऊ. कापूर-आरती ग्रहण करावी.
कापूर-आरती ग्रहण करावी, म्हणजे ज्योतीवर दोन्ही हातांचे तळवे धरून मग उजवा हात डोक्यावरून पुढून पाठी मानेपर्यंत फिरवावा. (काही कारणास्तव कापूर-आरती केली नसल्यास तुपाच्या निरांजनाच्या ज्योतीवर हात धरून आरती ग्रहण करावी.)
ए. देवाला शरणागत भावाने नमस्कार करावा.
ऐ. त्यानंतर देवाला प्रदक्षिणा घालावी. ते सोयीचे नसल्यास स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालाव्यात.
ओ . यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणावी.
औ. मंत्रपुष्पांजली म्हटल्यानंतर देवतेच्या चरणांवर फूल आणि अक्षता वहाव्यात.
अं. नंतर पुढीलप्रमाणे प्रार्थना करावी.

आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम् ।
पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर ।।
मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर ।
यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे ।।
अपराधसहस्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया ।
दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर ।।

अर्थ : मला तुझे आवाहन आणि अर्चन, तसेच तुझी पूजा कशी करावी, हेही ज्ञात नाही. पूजा करतांना काही चूक झाली असल्यास मला क्षमा कर. हे देवा, मी मंत्रहीन, क्रियाहीन आणि भक्तीहीन आहे. मी तुझी आरती / पूजा केली आहे, ती तू परिपूर्ण करवून घे. दिवस-रात्र माझ्याकडून कळत नकळत सहस्रो अपराध घडतात. ‘मी तुझा दास आहे’, असे समजून मला क्षमा कर.
आरती कशी करावी ?

गणपतीची आरती

गणपतीची आरती ही महाराष्ट्रातील घराघरांत होणाऱ्या पूजाअर्चनांत गायल्या जाणाऱ्या आरत्यांच्या प्रारंभी म्हटली जाणारी आरती आहे. (*Add poets name, meaning in contemporary prose, religious and cultural back ground)

सुखकर्ता दुखहर्ता ,वार्ता विघ्नांची,
नुरवी; पुरवी प्रेम , कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची,
कंठी झळके माळ , मुक्ताफळांची॥१॥

जय देव ,जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मन, /(स्मरणे मात्रे मन), कामना पुरती ॥धृ॥

रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|
चंदनाची उटी , कुमकुम केशरा|
हिरेजडित मुकुट , शोभतो बरा |
रुणझुणती नूपुरे , चरणी घागरिया|
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥

लंबोदर पीतांबर , फणिवरबंधना |
सरळ सोंड ,वक्रतुंड त्रिनयना|
दास रामाचा , वाट पाहे सदना|
संकटी पावावे , निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|
जय देव जय देव, जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥

॥ उदो बोला ॥

उदो बोला उदो, अंबाबाई माउलीचा हो
उदो कारे गर्जती, काय महिमा वर्णू तिचा हो
उदो बोला उदो ॥ धृ॥

अश्विन शुद्ध पक्षी, अंबा बैसली सिंहासनी हो । प्रतिपदेपासून, घटस्थापना ती करूनी हो ।
मूलमंत्रजप करूनी, भोवते रक्षक ठेवोनी हो । ब्रम्हा विष्णु रूद्र, आईचे पूजन करती हो ॥१॥
उदो बोला उदो ....॥धृ॥

द्वितीयेचे दिवशी, मिळती चौसष्ट योगिनी हो । सकळांमध्ये श्रेष्ठ, परशुरामाची जननी हो ।
कस्तुरी मळवट, भांगी शेंदूर भरूनी हो । उदो कारे गर्जती, सकळ चामुंडा मिळुनी हो ॥२॥
उदो बोला उदो....... ॥ धृ ॥

तृतीयेचे दिवशी, अंबे श्रृंगार मांडिला हो । मळवट पातळ चोळी, कंठी हार मुक्ताफळा हो ।
कंठीचे पदके कासे, पितांबर पिवळा हो । अष्टभुजा मिरविती, अंबे सुंदर दिसे लीला हो ॥ ३॥
उदो बोला उदो ....... ॥धृ॥

चतुर्थीचे दिवशी, विश्वव्यापक जननी हो,। उपासका पाहसी, अंबे प्रसन्न अंतकरणी हो ।
पूर्णकृपे तारिसी, जगन्माते मनमोहिनी हो । भक्तांच्या माऊली, सुर ते येती लोटांगणी हो ।।४॥
उदो बोला उदो अंबाबाई...... ॥धृ॥

पंचमीचे दिवशी, व्रत ते उपांगललिता हो । अर्घ्य पाद्य पूजने, तुजला भवानी स्तविती हो ।
रात्रीचे समयी, करिती जागरण, हरिकथा हो । आनंदे प्रेम ते, आले सद्भावे क्रीडता हो ।।५॥
उदो बोला उदो....... ॥धृ॥

षष्ठीचे दिवशी, भक्ता आनंद वर्तला हो । घेऊनी दिवट्या हस्ती, हर्षे गोंधळ घातला हो ।
कवडी एक अर्पिता, देसी हार मुक्ताफळा हो । जोगवा मागता प्रसन्न झाली भक्तकुळा हो ।।६॥
उदो बोला उदो...... ॥धृ॥

सप्तमीचे दिवशी, सप्तश्रृंग गडावरी हो । तेथे तू नांदसी, भोवती पुष्पे नानापरी हो ।
जाई जुई शेवंती, पूजा रेखीयली बरवी हो । भक्त संकटी पडता, झेलूनी घेसी वरचे वरी हो ।।७॥
उदो बोला उदो....... ॥धृ॥

अष्टमीचे दिवशी, अष्टभुजा नारायणी हो । सह्य्राद्री पर्वती, पाहिली उभी जगत् जननी हो ।
मन माझे मोहीले, शरण आलो तुजलागुनी हो । स्तनपान देऊनी, सुखी केले अंतःकरणी हो ।।८॥
उदो बोला उदो .......॥धृ॥

नवमीचे दिवशी, नव दिवसांचे पारणे हो । सप्तशती जप, होमहवने सद्भक्ती करुनी हो ।
षड्रस अन्ने नैवेद्यासी, अर्पियली भोजनी हो । आचार्य ब्राह्मणा, तृप्त केले कृपेकरुनी हो ।।९॥
उदो बोला उदो....... ॥धृ॥

दशमीचे दिवशी, अंबा निघे सिमोल्लंघनी हो । सिंहारूढ करी दारुण, शस्त्रे अंबे त्वा घेऊनी हो ।
शुंभ निशुंभादिक राक्षसा, किती मारिसी रणी हो । विप्रा रामदासा, आश्रय दिधला तव चरणी हो ।।१०॥
उदो बोला उदो....... ॥धृ॥ [१]

॥ श्री देवीची आरती ॥

[२] दुर्गे दुर्गटभारी, तुजविण संसारी । अनाथनाथे अंबे, करुणा विस्तारी ॥
वारी वारी, जन्म मरणांतें वारी । हारी पडलो आता, संकट निवारी ॥१॥

जय देवी जय देवी, जय महिषासुरमथिनी । सुरवर ईश्वर वरदे, तारक संजीवनी, जय देवी जय देवी ॥धृ॥

त्रिभुवनी भुवनी पाहता, तुज ऐसे नाही । चारी श्रमले परंतु, न बोलवे काही ॥
साही विवाद करता ,पडले प्रवाही । ते तू भक्तांलागी,ते तु दासालागी, पावसी लवलाही ॥२॥

जय देवी जय देवी, जय महिषासुरमथिनी । सुरवर ईश्वर वरदे, तारक संजीवनी, जय देवी जय देवी ॥धृ॥

प्रसन्नवदने, प्रसन्न होशी निजदासा । क्लेशापासुन सोडी, तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवाचून, कोण पुरवील आशा । नरहरि तल्लीन झाला, पदपंकजलेशा ॥३॥

जय देवी जय देवी, जय महिषासुरमथिनी । सुरवर ईश्वर वरदे, तारक संजीवनी, जय देवी जय देवी ॥धृ॥

।। श्री शंकराची आरती ।।

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा । लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा॥१॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा, आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा । जय देव जय देव ॥धृ॥

कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा । विभुतीचे उधळण शितकंठ नीळा, ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा ॥२॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा, आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा । जय देव जय देव ॥धृ॥

देवी दैत्यी सागरमंथन पै केले, त्यामाजी अवचित हळहळ जे उठले । ते त्वा असुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥३॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा, आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा । जय देव जय देव ॥धृ॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी । शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुलटिळक रामदासा अंतरी॥४॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा, आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा जय देव जय देव ॥धृ॥

- संत रामदास [३]

II श्री दत्ताची आरती II

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती, दत्त हा जाणा | त्रिगुणी अवतार, त्रैलोक्यराणा |

नेती नेति शब्द, न ये अनुमाना | सुरवर मुनिजन योगी, समाधि न ये ध्याना ||१||

जय देव जय देव, जय श्रीगुरूदत्ता | आरती ओवाळीतां, हरली भवचिंता ||धृ०||

सबाह्मा अभ्यंतरी, तूं एक दत्त | अभाग्यासी कैंची, न कळे ही मात |

पराही परतली, तेथें कैचा हेत | जन्ममरणाचा, पुरलासे अन्त || जय० ||२||

दत्त येउनियां, उभा ठाकला | साष्टांगे नमुनी, प्रणिपात केला |

प्रसन्न होऊनी, आशीर्वाद दिधला | जन्ममरणाचा, फेरा चुकविला || जय० ||३||

दत्त दत्त ऍसीं, लागले ध्यान | हरपलें मन, झालें उन्मन |

मीं तू पणाची, झाली बोळवण | एका जनार्दनी, श्रीदत्तध्यान || जय देव जय देव जय० ||४||

॥ श्री विठोबाची आरती ॥

युगे अठ्ठावीस, विटेवरीं उभा | वामांगी रखुमाई, दिसे दिव्य शोभा |

पुंडलिकाचे भेटि, परब्रह्म आहे गा | चरणी वाहे भीमा, उध्दारी जगा ||१||

जय देव जय देव, जय श्री पांडुरंगा | रखुमाईवल्लभा, राहींच्या वल्लभा, पावें जिवलगा ||धृ०||

तुळसीमाळा गळां, कर ठेवूनि कटीं | कांसे पीतांबर, कस्तुरी लल्लाटी |

देव सुरवर, नित्य येतीं भेटी | गरुड हनुमंत, पुढे उभे राहती || जय० ||२||

धन्य वेणूनाद, अनुक्षेत्रपाळा | सुवर्णाची कमळे, वनमाळा गळां |

राहे रखुंमाई, राणीया सकळा | ओवाळिती राजा, विठोबा सावळा || जय० ||३||

ओवाळूं आरत्या, कुरवंट्या येती | चंद्रभागेमाजी, सोडुनिंया देती |

दिंड्या पताका, वैष्णव नाचती | पंढरीचा महिमा, वर्णावा किती || जय० ||४||

आषाढी कार्तिकी, भक्तजन येती | चंद्रभागेमध्ये, स्नानें जे करिती |

दर्शनहेळामात्रे तयां होय मुक्ती | केशवासी नामदेव, भावें ओवाळिती || जय देव जय देव जय० ||५||

|| श्री ज्ञानदेवाची आरती ||

आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा | सेविती साधुसंत | मनु वेधला माझा |
आरती ज्ञानराजा ||धृ०||

लोपलें ज्ञान जगीं | हित नेणती कोणी | अवतार पांडुरंग |
नाम ठेविलें ज्ञानी || १ ||

कनकाचे ताट करीं | उभ्या गोपिका नारी | नारद तुंबरही |
साम गायन करी || २ ||

प्रगट गुह्य बोले | विश्व ब्रह्याचे केलें | रामा जनार्दनी |
पायीं मस्तक ठेविलें || ३ ||

|| ‌आरती एकनाथाची ||

आरती एकनाथा महाराजा समर्था | त्रिभुवनि तुचि थोर जगद्गुरु जगन्नाथा ||ध्रु||

एकनाथ नाम सार वेद शास्त्राचे गुज | सन्सार दु:ख नासे महामन्त्राचे बीज ||१||

एकनाथ नाम घेता सुख वातले चित्ता | अनन्त गोपालदासा धनी न पुरे गाता ||२||

मल्हारीची आरती

[४]

पंचानन हय वाहन सूर भूषित निळा

खंडा मंडित दंडित दानव अवळीला

मणी मल्ल मर्दूनी तो धूसर पिवळा

करी कंकण बाशिंगे सुमनांच्या माळा

जयदेव जयदेव जय शिव मल्हारी

वारी दुर्जन असुरा भाव दुस्तर तारी ll १ ll

सुरवर सत्वर वर दे मजलागी देवा

नाना नामे गाईल हि तुमची सेवा

अघटीत गुण गावया वाटतसे हेवा

फणीवर शिणला तेथे नर पामर केवा

जयदेव जयदेव जय शिव मल्हारी

वारी दुर्जन असुरा भाव दुस्तर तारी ll २ ll

रघुवरस्मरणी शंकर हृदयी निवाला

तो हा मल्लांतक अवतार झाला

यालागी आवडे भावे वर्णिला

रामी रामदास जिवलग भेटला

जयदेव जयदेव जय शिव मल्हारी

वारी दुर्जन असुरा भाव दुस्तर तारी ll ३ ll

।। देवी मंगल चंडिके ।।

रक्ष रक्ष जन्मदाता,देवी मंगल चंडिके। हारिके विपदां,हर्ष मंगल कारिके॥

हर्ष मंगल दक्षेच,हर्ष मंगल दायिके । शुभे मंगल दक्षेच,शुभे मंगल चंडिके ॥

मंगल मंगल दक्षेच,सर्व मंगल मांगल्ये। सदा मंगलदे देवी,सर्वेषां मंगलाल्ये॥

पुज्ये मंगळवारेच, मंगलाभिष्ठ्य देवते । पुज्ये मंगळ भुपस्य, मनुवंशस्य संतति ॥

मंगलाधिष्ठितां देवी, मंगलनांच मंगले । संसार मंगलधारे, मोक्ष मंगल दायीनी ॥

सारेच मंगलधारे, पारेच सर्व कर्मणा । प्रति मंगळवारेच, पूज्य मंगल सुखप्रदे ॥

घालीन लोटांगण

घालिन लोटांगण वंदीन चरण |
डोळ्यांनी पाहिन रूप तुझे |
प्रेमे अलिंगन आनंदे पुजिन |
भावे ओवाळीन म्हणे नामा ||१||

त्वमेव माता च पिता त्वमेवच, त्वमेव बंधुश्र्च सखा त्वमेव |
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव ||२||

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा, बुध्दयात्मना वा प्रकृतिस्वभावात |
करोमि यद्यत्सकलं परस्मै, नारायणायेति समर्पयामि ||३||

अच्युतं केशवं रामनारायणं, कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् |
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचंद्रं भजे ||४||

हरे राम हरे राम, राम राम हरे हरे |
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ||५||

|| मंत्र पुष्पांजली ||

ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्| ते हं नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा:| ॐ राजाधिराजाय प्रसह्ये साहिने | नमो वयं वैश्रवणाय कुर्महे| स मे कामान्कामकामाय मह्यम्| कामेश्वरो वैश्रवणो ददातु| कुबेराय वैश्रवणाय | महाराजाय नम:| ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायी| स्यात्सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंता या एकराळिति| तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्गृहे| आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इति|

संदर्भ

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

[५] [६] [७]