कुलदैवत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग
aum symbol
वेद
ऋग्वेद · यजुर्वेद
सामवेद · अथर्ववेद
वेद-विभाग
संहिता · ब्राह्मणे
आरण्यके  · उपनिषदे
उपनिषदे
ऐतरेय  · बृहदारण्यक
ईश  · तैत्तरिय · छांदोग्य
केन  · मुंडक
मांडुक्य  ·प्रश्न
श्वेतश्वतर  ·नारायण
कठ
वेदांग
शिक्षा · छंद
व्याकरण · निरुक्त
ज्योतिष · कल्प
महाकाव्य
रामायण · महाभारत
इतर ग्रंथ
स्मृती · पुराणे
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई
पंचतंत्र · तंत्र
स्तोत्रे ·सूक्ते
मनाचे श्लोक · रामचरितमानस
शिक्षापत्री · वचनामृत


त्या त्या विशिष्ट कुटुंबांमध्ये, ज्याची नित्य आराधना, पूजा केली जाते, ते त्या कुटुंबाच्या कुळाचे कुळदैवत किंवा कुलदैवत समजले जाते. विवाह वा मुंज अशा महत्त्वाच्या प्रसंगी होणाऱ्या कुळाचाराच्या वेळी, वा सणावारी किंवा दैनंदिन करावयाच्या पूजेच्या वेळी, प्रत्येक वेळेस 'कुळदेवतेची' पूजा करण्याची परंपरा आहे. 'कुळदैवत' हे,'देव' वा 'देवी' यांपैकी काहीही असू शकते. बहुतेककरून, कुळाचे पूर्वज ज्या ठिकाणी पूर्वी वास्तव्यास होते, त्या प्रदेशानजीकच्या परिसरातील प्रसिद्ध दैवत हे प्रामुख्याने, त्यांचे 'कुलदैवत' असते. माहूर, व त्याचे आसपासच्या सुमारे १००-१५० किलोमीटर परिसरातील राहणाऱ्या लोकांचे 'कुलदैवत' माहूरची रेणुका, कोल्हापूर परिसरात राहणाऱ्यांचे अंबा[जोतिबा]तर दक्षिणेकडून येथे आलेल्यांचे बालाजी हे कुलदैवत असू शकते. 'कुळदैवत' हे येणाऱ्या अरिष्टांपासून कुळाचे रक्षण करते, अशी समजूत आहे. शिवाजी महाराजांची कुळदेवता तुळजापूरची भवानी होती हे तर सर्वश्रुतच आहे.आपल्या कुलदेवतेची पूजा दरवर्षी त्या त्या ठिकाणी जाऊन करतात.