Jump to content

कर्णावती एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कर्णावती एक्सप्रेसचा फलक
कर्णावती एक्सप्रेसचा मार्ग

कर्णावती एक्सप्रेस (गुजराती: કર્ણાવતી એક્સપ્રેસ) ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही रेल्वे मुंबईला गुजरातची आर्थिक राजधानी अहमदाबाद शहरासोबत जोडते. ही गाडी मुंबई सेंट्रलअहमदाबाद स्थानकांदरम्यान रोज धावते व मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचे ४९३ किमी अंतर ७ तास व ४० मिनिटांत पूर्ण करते. कर्णावती एक्सप्रेस गाडीमध्ये केवळ दुय्यम श्रेणीचे आसनकक्ष व वातानुकूलित चेअर कार हे दोनच प्रकारचे डबे असून तिला शयनयान (sleeper) डबे जोडले जात नाहीत. मुंबई व अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या व केवळ खुर्चीयान असलेल्या एकूण ४ गाड्यांपैकी कर्णावती एक्सप्रेस ही एक असून गुजरात एक्सप्रेस, मुंबई अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेसमुंबई अहमदाबाद डबल डेकर एक्सप्रेस ह्या इतर तीन गाड्या आहेत.

मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचा रेल्वेमार्ग विद्युत असल्यामुळे डब्ल्यू.ए.पी.-४ हे विद्युत इंजिन कर्णावती एक्सप्रेसची वाहतूक करते.

तपशील

[संपादन]

वेळापत्रक

[संपादन]
गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी
१२९३३ मुंबई सेंट्रल – अहमदाबाद १३:४० २१:२५ रोज
१२९३४ अहमदाबाद – मुंबई सेंट्रल ०४:५५ १२:३५ रोज

मार्ग

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]