मराठी गझलकार
गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधव ज्युलियन यांना दिले जाते.[ संदर्भ हवा ] यापूर्वी पंतकवी मोरोपंतांनीही हा काव्यप्रकार हाताळला होता. त्याला ते गज्जल म्हणत. मोरोपंतांनंतर माणिकप्रभूंनी मराठीत गझला लिहिल्या. मात्र, माधव ज्युलियनांनी गझल हा काव्यप्रकार मराठीत चिरप्रस्थापित केला.
मोरोपंतांच्या गज्जलेचा नमुना[संपादन]
रसने न राघवाच्या । थोडी यशांत गोडी ।।
निंदा स्तुती जनांच्या । वार्ता वधू-धनाच्या ।।
खोट्या व्यथा मनाच्या । कांही न यांत जोडी ।।
या गज्जलेच्या पहिल्या शब्दावरून ह्या वृत्ताला ‘रसना’ हे नाव मिळाले.
मराठी गझलांचे मुशायरे[संपादन]
गजलांकित प्रतिष्ठान[संपादन]
गजलांकित प्रतिष्ठान ही महाराष्ट्रातील मराठी गजलांचे मुशायरे व गजलगायन मैफिली आयोजित करणारी संस्था आहे. १४ जून २०१३ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचे संस्थापक जनार्दन केशव म्हात्रे हे आहेत. त्यांनी या संस्थेमार्फत मराठी गजल मुशायरे व गजलगायन मैफिली सुरू केल्या. ठाणे येथे १४ मार्च २०१४ रोजी सुरेश भट यांच्या स्मृतिदिनानिमित्त गजलांकित या संस्थेचा पहिला गजल मुशायरा सादर झाला. ठाणे व नजीकच्या परिसरातील रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. आतापर्यंत त्यांनी ठाण्यासह मुंबई, वाशी, सोलापूर, नवी मुंबई, कोल्हापूर, नाशिक अशा राज्यभरातील विविध ठिकाणी मुशायरे सादर केले आहेत. या यादीतील काही नावे या कार्यक्रमांतून प्रकाशझोतात येण्यास मदत झाली आहे. १ २
कोणत्याही काव्य, गीत, गजल या विधांमध्ये गायन कलेला विशेष महत्त्व आहे. गेय साहित्य रसिकांपर्यंत पोहचण्यासाठी गायन क्षेत्राचे योगदान नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. गजलांकित प्रतिष्ठान ही संस्था गजल मुशायऱ्यांच्या सोबतीने गजल गायन मैफिलींचे देखील आयोजन करीत असते.
गजल क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गजलांकित प्रतिष्ठान या संस्थेमार्फत दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मान केला जातो.
गजल विषयी चर्चा घडवून आणण्यासाठी गजलांकित प्रतिष्ठान ही संस्था गजल क्षेत्रातील अभ्यासकांना बोलावून परिसंवाद आयोजित करत असते.
मराठी गजल विषयक अधिकाधिक माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी गजलांकित प्रतिष्ठान ही संस्था गजल क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखतींचे आयोजन करत असते.
"शब्दांकित" - डोंबिवली[संपादन]
डोंबिवलीमध्ये पहिला गझल मुशायरा १७ जानेवारी २०१५ रोजी झाला आणि त्याला डोंबिवलीतील रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. ह्या प्रेमामुळे आणि आत्मविश्वासामुळे ह्या सर्वांनी हे चालू राहायला हवे आणि प्रत्येक गावात गझल मुशायरे व्हायला हवेत हा हट्ट मनाशी धरला. आणि मग सर्वानुमते एक संस्था स्थापन करण्याचा निश्चय झाला. या संस्थेचे नाव शब्दांकित ठेवण्यात आले.
१४ मार्च २०१५ ला सुरेश भट यांच्या स्मृतिदिनानिमित्त "शब्दांकित"प्रस्तुत "गझल तुझी नि माझी"चा पहिला मुशायरा सादर झाला, आणि मार्चपासून महाराष्ट्रात आणि गोव्यात अनेक ठिकाणी शब्दांकित जाऊन पोचले.
"शब्दांकित" ने कायमच वेगळ्या वाटा चालायचा प्रयत्न केला. जुने-नवे गझलकार, स्त्री गझलकार आणि ज्या गावात मुशायरा त्या गावातील स्थानिक गझलकार व्यासपीठावर एकत्र आणणे हाच "शब्दांकित" चा मूळ उद्देश होता. कोणतेही मानधन आणि प्रसंगी एक रुपयाही न घेता संस्थेने अनेक कार्यक्रम केवळ आपल्या गझलेवर असलेल्या प्रेमापोटी स्वखर्चानेसुद्धा साजरे केले आहेत . प्रत्येक रसिक श्रोता हा प्रमुख पाहुणाच असतो आणि म्हणून कोणताही कार्यक्रम हा प्रत्येक रसिक श्रोत्याला प्रमुख मानून साजरा होत असतो आणि ह्यातच "शब्दांकित"चे वेगळेपण आहे .
सुरेश भट गझलमंच[संपादन]
मराठी गझलांचे मुशायरे २०११ पासून करणारी एक संस्था म्हणजे सुरेश भट गझलमंच. सुरेश भट गझलमंच या संस्थेचे शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी मराठी गझलांच्या मुशायऱ्याची कल्पना रंगमंचावर आणली. आतापर्यंत त्यांनी पुण्यासह अंबेजोगाई, अमरावती, इचलकरंजी, गोवा, नगर,मालेगाव, मुंबई, यवतमाळ, अशा राज्यभरातील विविध ठिकाणी मुशायरे सादर केले आहेत. या यादीतील काही नावे या कार्यक्रमांतून प्रकाशझोतात आली आहेत. [१]
मराठी गझलकारांची यादी[संपादन]
- अनिल कांबळे
- अनिल विद्याधर आठलेकर (मराठी गझलसंग्रह "मनाचा वॉर्डरोब ", संग्रहात प्रथमच ५ मालवणी गझलाही समाविष्ट )
- अनिल सर्जेराव पाटील : जळगांव
- अभिजित काळे
- अभिषेक घनश्याम उदावंत
- अमोल बी शिरसाट
- अल्पना देशमुख -नायक
- डॉ. अविनाश सांगोलेकर
- इंद्रजित भिमराव उगले
- इलाही जमादार : हे औरंगाबाद येथे झालेल्या चौथ्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाचे अध्यक्ष होते.
- उ.रा. गिरी
- ओमप्रकाश ढोरे (चांदूरबाजार)
- कमलाकर आत्माराम देसले
- डॉ. कैलास सोमनाथ गायकवाड
- क्रांति साडेकर (गझल संग्रह : असेही तसेही), (काव्य संग्रह: अग्निसखा)
- खावर
- गंगाधर महांबरे
- गोपाल तुळशीराम मापारी
- गोविंद नाईक :'डोळयात आसवांच्या' हा गझलसंग्रह प्रकाशित
- जनार्दन केशव म्हात्रे : स्थित्यंतर : मराठी गजलसंग्रह प्रकाशित [१]
- दिनेश भोसले
- नितीन देशमुख : गदिमा पुरस्काराने सन्मानित; 'बिकाॅज वसंत इज कमिंग सून' हा गझलसंग्रह.
- निलेश कवडे (अकोला)
- पवन नालट (अमरावती)
- प्रफुल्ल कुलकर्णी (नांदेड)
- प्रफुल्ल भुजाडे (अमरावती)
- प्रमोद चोबितकर (वरूड)
- प्रशांत गजानन पोरे, चिंचवड
- बबन सराडकर (अमरावती)
- भाऊसाहेब पाटणकर
- मंगेश पाडगावकर
- मनोहर रणपिसे (मुंबई)
- म.भा. चव्हाण (उदय राजाराम लाड - यू.आर.एल - फाऊंडेशनतर्फे दिल्या गेलेल्या गझलगौरव पुरस्काराचे मानकरी-२०१५)
- ममता सिंधुताई सपकाळ.
- महेश जाधव
- माधव ज्युलियन
- मारोती मानेमोड (नांदेड)
- रमण रणदिवे
- राजीव मासरूळकर (औरंगाबाद )
- राधा भावे (उदय राजाराम लाड - यू.आर.एल - फाउंडेशनतर्फे दिल्या गेलेल्या गझलगौरव पुरस्काराच्या मानकरी-२०१५)
- डॉ.राम पंडित हे वाई येथे झालेल्या सहाव्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाचे अध्यक्ष होते.
- लक्ष्मण जेवणे(अमरावती)
- वा.न. सरदेसाई
- विजय कदम
- विद्यानंद हाडके (वर्धा)
- वैभव जोशी
- वैभव दिनकरराव देशमुख
- वैभव वसंतराव कुलकर्णी (वैवकु)
- शरद तुकाराम धनगर
- शिवकुमार माणिकराव डोईजोडे
- शिवाजी सुखदेव जवरे
- शुभानन चिंचकर (अरुण)
- डॉ. शेख इक्बाल ’मिन्ने’[२]
- डॉ.श्रीकृष्ण राऊत
- संगीता जोशी (उदय राजाराम लाड - यू.आर.एल - फाऊंडेशनतर्फे दिल्या गेलेल्या गझलगौरव पुरस्काराच्या मानकरी-२०१४) (गजलांकित प्रतिष्ठानतर्फे दिल्या गेलेल्या गझलरत्न पुरस्काराच्या मानकरी - २०१६)
- सतीश दराडे
- संदीप जाधव
- सुमित शेवाळे पाटोदा-बीड
- सुरेश कचरू इंगळे
- सुरेश तायडे,बुलढाणा
- सुरेश भट
- सुशांत बाळकृष्ण खुरसाले
- सुहासिनी विवेकरंजन देशमुख
- स्वप्निल संजय शेवडे
- हिमांशु कुलकर्णी ('क़तरा क़तरा ग़म' हा गझलसंग्रह)
- हेमंत दत्तू जाधव
- श्रीराम ग. पचिंद्रे
● सतिशसिंह मालवे(मुऱ्हा देवी,अमरावती)
मराठी गझलसंग्रह (आणि त्याचे कवी)[संपादन]
- असेही तसेही क्रांति साडेकर
- एल्गार (सुरेश भट)
- कारुण्य माणसाला संतत्व दान देते (डॉ.श्रीकृष्ण राऊत)
- कैदखान्याच्या छतावर (सतीश दराडे)
- गझलप्रिया (प्रशांत पोरे)
- गझलसंग्रह (मंगेश पाडगावकर)
- गुलाल आणि इतर गझला (डॉ.श्रीकृष्ण राऊत)
- डोळ्यात आसवांच्या (गोविंद नाईक)
- मराठी गझलसंग्रह (गंगाधर महांबरे)
- म्युझिका (संगीता जोशी)
- सप्तरंग (सुरेश भट)
- स्थित्यंतर (जनार्दन केशव म्हात्रे)
मराठी गझलगायक[संपादन]
- अनिल आगरकर
- अनिल खोब्रागडे
- आशा भोसले
- केतन पटवर्धन
- गोपाल कौशिक
- दत्तप्रसाद रानडे
- दत्ता हरकरे
- पद्मजा फेणाणी
- प्रभाकर धाकडे
- बबन सराडकर
- भीमराव पांचाळे
- माधव भागवत
- मिलिंद जोशी
- मो. रफिक शेख - बेळगाव
- मोरेश्वर निस्ताने
- रमेश अंधारे (यांनी दगडी मक्ता नावाची कादंबरी लिहिली आहे)
- शरद सुतवणे
- सविता महाजन
- सुधाकर कदम
- सुधाकर प्रधान
- सुनील बर्दापूरकर
गझलांना संगीत देणारे संगीतकार[संपादन]
- अवधूत गुप्ते
- अशोक पत्की
- आशिष मुजुमदार
- केतन पटवर्धन ("रे सख्या" ही गझलांची मैफिल पटवर्धन यांनी संगीतबद्ध केली होती.)
- चंद्रशेखर गाडगीळ
- भीमराव पांचाळे
- मिलिंद जोशी
- मो. रफीक शेख - बेळगाव
- श्रीधर फडके
- सुधाकर कदम
- हृदयनाथ मंगेशकर
संदर्भ व नोंदी[संपादन]
- ^ प्रदीप निफाडकर. "नव्या गझलकारांकडून आश्वासक लेखन". १३ सप्टेंबर, इ.स. २०१४ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ प्रकाश (२०१५). झेलून दुःख माझे गेला खचून रस्ता हा प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांचा गझल संग्रह २०१५ मध्ये प्रसिद्ध झाला आहे. ते गोव्यातील गझलकार आहेत. गोवा: माधव राघव प्रकाशन gova. pp. १२४ (१०५ गझल आहेत. ISBN घेतला नाही Check
|isbn=
value: invalid character (सहाय्य).