मराठी गझलकार
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधव ज्युलियन यांना दिले जाते.[ संदर्भ हवा ] यापूर्वी पंतकवी मोरोपंतांनीही हा काव्यप्रकार हाताळला होता. त्याला ते गज्जल म्हणत. मोरोपंतांनंतर माणिकप्रभूंनी मराठीत गझला लिहिल्या. मात्र, माधव ज्युलियनांनी गझल हा काव्यप्रकार मराठीत चिरप्रस्थापित केला.
मोरोपंतांच्या गज्जलेचा नमुना
[संपादन]रसने न राघवाच्या । थोडी यशांत गोडी ।।
निंदा स्तुती जनांच्या । वार्ता वधू-धनाच्या ।।
खोट्या व्यथा मनाच्या । कांही न यांत जोडी ।।
या गज्जलेच्या पहिल्या शब्दावरून ह्या वृत्ताला ‘रसना’ हे नाव मिळाले.
मराठी गझलांचे मुशायरे
[संपादन]गजलांकित प्रतिष्ठान
[संपादन]गजलांकित प्रतिष्ठान ही महाराष्ट्रातील मराठी गजलांचे मुशायरे व गजलगायन मैफिली आयोजित करणारी संस्था आहे. १४ जून २०१३ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचे संस्थापक जनार्दन केशव म्हात्रे हे आहेत. त्यांनी या संस्थेमार्फत मराठी गजल मुशायरे व गजलगायन मैफिली सुरू केल्या. ठाणे येथे १४ मार्च २०१४ रोजी सुरेश भट यांच्या स्मृतिदिनानिमित्त गजलांकित या संस्थेचा पहिला गजल मुशायरा सादर झाला. ठाणे व नजीकच्या परिसरातील रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. आतापर्यंत त्यांनी ठाण्यासह मुंबई, वाशी, सोलापूर, नवी मुंबई, कोल्हापूर, नाशिक अशा राज्यभरातील विविध ठिकाणी मुशायरे सादर केले आहेत. या यादीतील काही नावे या कार्यक्रमांतून प्रकाशझोतात येण्यास मदत झाली आहे.[ संदर्भ हवा ]
गजलांकित प्रतिष्ठान ही संस्था गजल मुशायऱ्यांच्या सोबतीने गजल गायन मैफिलींचे देखील आयोजन करीत असते. गजल क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गजलांकित प्रतिष्ठान या संस्थेमार्फत दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. गजल विषयी चर्चा घडवून आणण्यासाठी गजलांकित प्रतिष्ठान ही संस्था गजल क्षेत्रातील अभ्यासकांना बोलावून परिसंवाद आयोजित करत असते. गजलांकित प्रतिष्ठान ही संस्था गजल क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखतींचे आयोजन करत असते.[ संदर्भ हवा ]
"शब्दांकित" - डोंबिवली
[संपादन]डोंबिवलीमध्ये पहिला गझल मुशायरा १७ जानेवारी २०१५ रोजी झाला आणि त्याला डोंबिवलीतील रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. ह्या प्रेमामुळे आणि आत्मविश्वासामुळे ह्या सर्वांनी हे चालू राहायला हवे आणि प्रत्येक गावात गझल मुशायरे व्हायला हवेत हा हट्ट मनाशी धरला. आणि मग सर्वानुमते एक संस्था स्थापन करण्याचा निश्चय झाला. या संस्थेचे नाव शब्दांकित ठेवण्यात आले.[ संदर्भ हवा ]
१४ मार्च २०१५ला सुरेश भट यांच्या स्मृतिदिनानिमित्त "शब्दांकित"प्रस्तुत "गझल तुझीनी माझी"चा पहिला मुशायरा सादर झाला, आणि मार्चपासून महाराष्ट्रात आणि गोव्यात अनेक ठिकाणी शब्दांकित जाऊन पोचले.[ संदर्भ हवा ]
"शब्दांकित" ने कायमच वेगळ्या वाटा चालायचा प्रयत्न केला. जुने-नवे गझलकार, स्त्री गझलकार आणि ज्या गावात मुशायरा त्या गावातील स्थानिक गझलकार व्यासपीठावर एकत्र आणणे हाच "शब्दांकित"चा मूळ उद्देश होता. कोणतेही मानधन आणि प्रसंगी एक रुपयाही न घेता संस्थेने अनेक कार्यक्रम केवळ आपल्या गझलेवर असलेल्या प्रेमापोटी स्वखर्चानेसुद्धा साजरे केले आहेत.[ संदर्भ हवा ]
सुरेश भट गझलमंच
[संपादन]मराठी गझलांचे मुशायरे २०११ पासून करणारी एक संस्था म्हणजे सुरेश भट गझलमंच. सुरेश भट गझलमंच या संस्थेचे शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी मराठी गझलांच्या मुशायऱ्याची कल्पना रंगमंचावर आणली. आतापर्यंत त्यांनी पुण्यासह अंबेजोगाई, अमरावती, इचलकरंजी, गोवा, नगर,मालेगाव, मुंबई, यवतमाळ, अशा राज्यभरातील विविध ठिकाणी मुशायरे सादर केले आहेत. या यादीतील काही नावे या कार्यक्रमांतून प्रकाशझोतात आली आहेत.
मराठी गझलकारांची यादी
[संपादन]- अनिल कांबळे
- इलाही जमादार
- उ.रा. गिरी
- क्रांति साडेकर
- बदुज्जमां खावर
- गंगाधर महांबरे
- गोविंद नाईक
- जनार्दन केशव म्हात्रे
- जयेश शंकर पवार[१]
- नितीन देशमुख
- भाऊसाहेब पाटणकर
- मंगेश पाडगावकर
- मनोहर रणपिसे
- म.भा. चव्हाण
- माधव ज्युलियन
- रमण रणदिवे
- राधा भावे
- राम पंडित
- वा.न. सरदेसाई
- विजय कदम
- श्रीकृष्ण राऊत
- संगीता जोशी
- सुरेश भट
- हिमांशु कुलकर्णी
- सुरेश तायडे
मराठी गझलसंग्रह (आणि त्याचे कवी)
[संपादन]- असेही तसेही (क्रांति साडेकर)
- एल्गार (सुरेश भट)
- कारुण्य माणसाला संतत्त्व दान देते (श्रीकृष्ण राऊत)
- गझलसंग्रह (मंगेश पाडगांवकर)
- गुलाल आणि इतर गझला (श्रीकृष्ण राऊत)
- डोळ्यात आसवांच्या (गोविंद नाईक)
- मराठी गझलसंग्रह (गंगाधर महांबरे)
- म्युझिका (संगीता जोशी)
- सप्तरंग (सुरेश भट)
- स्थित्यंतर (जनार्दन केशव म्हात्रे)
मराठी गझलगायक
[संपादन]गझलांना संगीत देणारे संगीतकार
[संपादन]- अवधूत गुप्ते
- अशोक पत्की
- चंद्रशेखर गाडगीळ
- भीमराव पांचाळे
- मिलिंद जोशी
- श्रीधर फडके
- सुधाकर कदम
- हृदयनाथ मंगेशकर
संदर्भ
[संपादन]- ^ "जगण्याची गझल करणारा गझलप्रेमी". www.mahamtb.com. 2022-06-22 रोजी पाहिले.