जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स
Appearance
(नॅशनल कॉन्फरन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स | |
---|---|
पक्षाध्यक्ष | फारूक अब्दुल्ला |
स्थापना | ११ जून १९३९ |
मुख्यालय | श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर |
लोकसभेमधील जागा | ० / ५४५
|
राज्यसभेमधील जागा | २ / २४५
|
विधानसभेमधील जागा | १५ / ८७ (जम्मू आणि काश्मीर)
|
राजकीय तत्त्वे | सौम्य फुटीरवाद काश्मीरचे एकत्रीकरण |
संकेतस्थळ | [www.jknc.in] |
जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स हा भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. १९३९ साली स्थापन झालेल्या ह्या पक्षाचे मुख्यालय श्रीनगर येथे असून त्याचा उदेश काश्मीरचा विकास हा आहे. जम्मू आणि काश्मीर राज्यामध्ये अनेक वेळा नॅशनल कॉन्फरन्सचे राज्य सरकार राहिले असून केंद्र सरकारमध्ये देखील नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांनी अनेक पदे भूषवली आहेत.
ऑक्टोबर १९३२ मध्ये शेख अब्दुल्ला ह्यांनी ऑल जम्मू अँड काश्मीर मुस्लिम कॉन्फरन्स ह्या पक्षाची स्थापना केली. १९३९ साली पक्षाचे नाव बदलून जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स असे ठेवण्यात आले. स्थापनेपासून अबदुल्ला कुटुंबाने नॅशनल कॉन्फरन्सवर वर्चस्व कायम ठेवले आहे.
पक्षाध्यक्ष
[संपादन]- १९३९ - १९८२: शेख अब्दुल्ला
- १९८२ - २००२: फारूक अब्दुल्ला
- २००२ - २००९: ओमर अब्दुल्ला
- २००९ - चालू: फारूक अब्दुल्ला