ओमर अब्दुल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओमर अब्दुल्ला
ओमर अब्दुल्ला

कार्यकाळ
५ जानेवारी, इ.स. २००९ – २४ डिसेंबर २०१४
राज्यपाल नरिंदर नाथ वोहरा
मागील राष्ट्रपती राजवट
पुढील मुफ्ती महंमद सईद

कार्यकाळ
२३ जुलै, इ.स. २००१ – २३ डिसेंबर, इ.स. २००२
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी
मागील कृष्णम राजू
पुढील दिग्विजय सिंग

जन्म १० मार्च, १९७० (1970-03-10) (वय: ४७)
रॉकफर्ड, इसेक्स,युनायटेड किंग्डम
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स
पत्नी पायल नाथ सिंग (विभक्त)
अपत्ये झाहिर अब्दुल्ला आणि झमीर अब्दुल्ला

ओमर अब्दुल्ला (उर्दू: عمر عبدالله; जन्म: मार्च १०, इ.स. १९७०) हे भारत देशातील राजकारणी व जम्मू आणि काश्मीर राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. तसेच ते नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या उमेदवार म्हणून इ.स. १९९८,इ.स. १९९९ आणि इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जम्मू-काश्मीर राज्यातील श्रीनगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

ओमर अब्दुल्ला ह्यांचे वडील फारुख अब्दुल्ला व दिवंगत आजोबा शेख अब्दुल्ला हे दोघेही जम्मू काश्मीरचे भूतपूर्व मुख्यमंत्री होते.

बाह्य दुवे[संपादन]