धूळपाटी/मनुष्य - संक्रमणशील जीव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रीअरविंद प्रणीत पूर्णयोगाच्या तत्त्वज्ञानामधील ही एक संकल्पना आहे.

उत्क्रांती[संपादन]

प्रकृतीची उत्क्रांती मनुष्यापाशी थांबलेली नाही. तिची वाटचाल अजूनही सुरू आहे. मानवानंतर अतिमानव (Superman) आणि त्यानंतर अतिमानसिक जीव (Supramental Being) उदयाला यायचे आहेत, असे त्यांचे तत्त्वज्ञान सांगते.

पंचकोश आणि उत्क्रांती[संपादन]

उपनिषदांनी 'पंचकोशा'ची कल्पना मांडली आहे. त्या कल्पनेनुसार अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश व आनंदमय कोश अशी एकीहून एक उच्च दर्जाची एकेक पातळी आहे, आणि उत्क्रान्तीचा हा चढता क्रम आहे.

श्रीअरविंदांना पंचकोशांची ही उत्क्रान्ति- क्रमाची कल्पना बरोबर वाटते. त्यांच्या मते ' अन्नमय कोश' हा जडद्रव्याची (Inert or Inconscient Matter) अवस्था आहे व तिच्यातून 'प्राणाचा ' (Vital, Life) उदय झाला. प्राणमय अवस्था ही जीवाची (Life of Vital being) निदर्शक अवस्था आहे. प्राणातून नंतर मनाचा ( Mind ) उदय मन' हे जाणिवेचे (Consciousness), चेतनेचे, बुद्धीचे, विचार- शीलतेचे व विवेकशीलतेचे निदर्शक तत्त्व व अवस्था आहे. सध्या मानव या पातळीवर येऊन ठेपला आहे. सध्याची विकासाची अवस्था मधली व संक्रमणाची (Transitional) अवस्था आहे. [१]

मनुष्य - एक प्रयोगशाळा[संपादन]

श्रीअरविंद लिहितात, ''आपल्या अस्तित्वाची आत्ताची रचना किंवा स्थिती ही अंतिम आहे असे मानून, विकासक्रमाच्या शक्यतेवर मर्यादा घालण्याचे काहीच कारण नाही. पशुजीवन ही एक अशी प्रयोगशाळा आहे की, ज्या प्रयोगशाळेमध्ये प्रकृतीने मनुष्यजात घडवली. मनुष्यदेखील तशीच एक प्रयोगशाळा बनू शकतो. या मनुष्यरूपी प्रयोगशाळेमध्ये अतिमानव घडविण्याचे कार्य करण्याचा प्रकृतीचा संकल्प आहे. दिव्य जीवाच्या रूपाने आत्म्याला प्रकट करण्याचा व एक दिव्य प्रकृती उदयास आणण्याचा तिचा संकल्प आहे. [२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ डॉ.ग.ना.जोशी (१९८२). श्रीअरविंदांचे तत्त्वचिंतन. पुणे: पुणे विद्यापीठ.
  2. ^ Sri Aurobindo (1998). THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO. 13. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department. p. 502.