पंचकोश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


पंचकोश हे मानवी शरीरातील पाच कोश मानले जातात. हे कोश अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि, आनंदमय, या नांवानें प्रसिद्ध आहेत.[१]

या पांच वेष्टनांत आत्मा गुंडाळला असल्यामुळें आपल्या स्वरुपाला विसरुन जन्ममरणरुप संसार पावतो. कोशांत सांपडलेला कीटक जैसा आंतल्याआंत धडपडतो, त्याप्रमाणें आत्म्याचीही अवस्था झाल्यामुळें वरील अन्नादि आच्छादनांस कोश असें म्हणतात. व्यक्तीच्या विकासासाठी हे पाच कोश महत्वाचे मानले जातात.[१]

अन्नमय कोश[संपादन]

आतां त्या कोशाची स्वरुपें क्रमेंकरुन सांगतों. पंचीकृत भूतांपासून झालेला जो रथूल देह त्यासच अन्नमय त्यासच अन्नमय कोश म्हणतात. शारीरिक विकसनासाठी याचे महत्व आहे.आपण खात असलेल्या अन्नामुळे या कोशाचा विकास होतो.

प्राणमय कोश[संपादन]

लिंगशरीरीं असलेले जे रजोगुणात्मक पाच प्राण व पांच कर्मेद्रियें इतकी मिळून प्राणमय कोश होतो.

मनोमय कोश[संपादन]

पंचभूतच्या मत्त्वांशानें बनलेलें संशयात्मक मन व पांच ज्ञानेद्रियें मिळून मनोमय कोश समजावा.

विज्ञानमय कोश[संपादन]

ज्ञानेंद्रियांसहित निश्चयात्मिका जी बुद्धि ती विज्ञानमय कोश. याप्रमाणें प्राणादिक तीनही कोश एका लिंगशरीरांतच मावले गेले.

आनंदमय कोश[संपादन]

कारण शरीरांत जो मलिन सत्त्वांश आहे, तोच आनंदमय कोश.

याच्या वृत्ति तीन आहेत.प्रिय, मोद आणि प्रमोद.

प्रियवृत्ति म्हणजे - इष्टदर्शनापासून होणारी.

सोदवृत्ति म्हणजे - इष्टवस्तूच्या लाभापासून होणारी; आणि

प्रमोदवृत्ति इष्टविषयाच्या भागापासून उत्पन्न होणारी ती प्रमोदवृत्ति होय.

आत्मा त्या त्या कोशाच्या तादात्म्यानें त्या त्या कोशाशीं तन्मय होऊन गेला आहे.

याप्रमाणें स्थूल शरीरांत एक, सूक्ष्म शरीरांत तीन आणि कारण - शरीरांत एक असें पांच कोश झाल. या पंच काशांपासून अन्वयव्यतिरेकाचे योगानें आत्म्याचें विवेचन ( पृथक्करण ) करुन, तो सच्चिदानदरुप आहे, असा मनुष्याच्या बुद्धीस निश्चय झाला असतां तो ब्रह्मच होतो.[२] पंचकोश विकसनातून श्रेयस आणि प्रेयसाची प्राप्ती होते असे मानले जाते.[३]

अन्यव व्यतिरेकाचे योगानें असें जें आम्ही म्हटलें त्याचा अर्थ येथें सांगणें अवस्थ आहे. अन्वय म्हणजे ण्खाद्या गोष्टीचें किंवा स्थितीचें दुसर्‍याबरोबर असणें आणि व्यतिरेक म्हणजे तिच नसणें. ‘ अमुक गोष्ट असली तर अमुक असलीच पाहिजे ’ असा जो नियम त्यास अन्वय असें म्हणतात. आणि ‘ एक नसेल तर दुसरीही असणार नाहीं ’ या नियमास व्यतिरेक असें म्हणतात. हे दोन नियम लावून पाहिले असतां दोन गोष्टीचें साहचर्य किंवा कार्यकारणभाव चांगला समजतो. आतां हे नियम आत्मविवेचनास लावून दाखवितों. स्वप्नावस्थेंत स्थूल देह जो अन्नमय कोश याचें मुळींच भान नसून स्वप्न पाहणारा जो साक्षी आत्मा त्याचें भान असतें. म्हणून येथें स्थूल देहाचा व्यतिरेक असून आत्म्याचा अन्वय आहे. म्हणून आत्मा नित्य आणि स्थूल देह अनित्य असें अन्वयव्यतिरेकानें सिद्ध झालें. ॥३८॥

तसेंच, सुषुप्तीमध्यें लिंगदेहाचें मुळींच भान नाहीं म्हणून येथें लिंगदेहाचा व्यतिरेक आहे आणि अभावसाक्षित्वें करुन आत्म्याचें येथेंही स्फुरण आहे, म्हणून त्याचा येथें अन्वय आहे; म्हणून त्याचा नियमावरुन आत्मा नित्य आणि लिंगदेह अनित्य असें ठरलें.

वर आम्ही पंचकोशविवेचन करण्याचा उपक्रम करुन, अन्नमय कोशाच्या विवेचनानंतर दुसरा जो प्राणमय कोश तो येथें सांगणें योग्य असून मध्येंच लिंगदेह कोठून आणिला, अशी कोणी शंका घेईल, तर तिचें समाधान असें आहे कीं, प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय या तीनही कोशांचा समावेश एका लिंगदेहांतच होतो असें आम्हीं पूर्वीच सांगितलें आहे, तेव्हां त्या लिंगशरीराचें विवेचन केलें असतां अर्थातच गुण आणि अवस्थाभेदेंकरुन, प्राणादिक तीन कोशाचें विवेचन झाल्यासारखेंच आहे.

संदर्भ[संपादन]

  1. a b Kothari, Atul (101-01-01). Shiksha Vikalp Evam Aayam (hi मजकूर). Prabhat Prakashan. आय.एस.बी.एन. 9789353226497. 
  2. ^ Niścaladāsa (1962). Śrīvicārasāgara (hi मजकूर). 
  3. ^ Bhaṭanāgara, Sudhā (1999). Purushārtha-catushṭayah: dārśanika anuśīlana (hi मजकूर). Vidyānidhi Prakāśana.