गुजरातचे प्रदेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुजरातचे प्रदेश भौगोलिक स्थान आणि हवामानावर आधारित आहेत. गुजरातच्या अधिकृत राज्य संकेतस्थळावर पाच क्षेत्रांची यादी आहे. [१]

कच्छ[संपादन]

  • जिल्हे:
    • कच्छ, भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा आणि गुजरातचा सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा. जिल्ह्यात एक जवळपास अर्धे क्षेत्र बहुतेक निर्जन असलेले कच्छचे मोठे रण आणि कच्छचे छोटे रण आहे.
  • भौगोलिक स्थान - भारत-पाकिस्तान सीमेवर गुजरातचा वायव्य भाग
  • हवामान - कोरडे आणि अर्ध वाळवंट
  • भाषा / बोली - कच्छ मध्ये प्रामुख्याने बोलल्या जाणाऱ्या भाषा म्हणजे कच्छी आणि कमी प्रमाणात सिंधी आणि गुजराती. कच्छी ही सिंधीची पोटभाषा मानली जाते.

सौराष्ट्र[संपादन]

सौराष्ट्राच्या नकाशा.
  • जिल्हे :

 

  • सौराष्ट्राचे भौगोलिक स्थान - हा गुजरात राज्याचा एक भाग आहे. या प्रदेशाच्या उत्तरेस कच्छचे रण आणि कच्छचे आखात, पश्चिमेस अरबी समुद्र व दक्षिणेस खंबायतचे आखात .
  • हवामान - कोरडे व इथली माती जास्त आर्द्र आणि काळी आहे.
  • भाषा / बोली - काठियावाडी ज्यात गुजरातीपेक्षा भिन्न शब्दांचा मोठा संच आहे. गुजराती भाषेतीपेक्षा सामान्य भिन्नता म्हणजे बहुतेक वेळा गुजरातीतल्या "आ" ऐवजी "ई" उच्चारला जातो.

उत्तर गुजरात[संपादन]

गुजरातचा नकाशा, उत्तर गुजरातमधील जिल्हे देखील दर्शवितो.
  • जिल्हे : 
  • गुजरातचा उत्तर भाग - भौगोलिक स्थान.
  • हवामान - येथील हवा कोरडी आहे परंतु माती सुपीक आहे आणि मातीत ओलावा कमी असून अलीकडील सिंचन प्रकल्पांमुळे शेतीला मोठा फायदा झाला आहे.
  • भाषा / पोटभाषा - अगदी अपवाद वगळता गुजराती भाषेसारखीच.

मध्य गुजरात[संपादन]

  • जिल्हे : 
  • पंचमहाल जिल्हा-भौगोलिक स्थान - गुजरातच्या मध्यभागी.
  • हवामान - उत्तर गुजरातसारखेच. परंतु येथील जमीन जेथे सुपीक आहे तेथे शेतीची जमीन अगदी कमी आहे. अधिक जंगले.
  • भाषा / बोली - गुजरातीचा आधार मानल्या जाणाऱ्या इथल्या भाषेवर इतर भाषांचा प्रभाव पडला आहे. पूर्वेकडील भागातील भाषा गुजरातीपेक्षा अगदी वेगळी आहे, त्यात लक्षणीय भिन्न शब्द आहेत, जंगलाशी संबंधित शब्दांचा मोठा संच आहे.

दक्षिण गुजरात[संपादन]

  • जिल्हे: 
  • भौगोलिक स्थान - गुजरातचा दक्षिण भाग.
  • हवामान - अर्ध कोरडे ते कमी आर्द्रता. सिंचन प्रकल्पांमुळे माती सुपीक आहे.
  • भाषा / पोटभाषा - तथाकथित दक्षिण गुजराती बोली, ज्यात गुजरातीपेक्षा सामान्य फरक आहे ते म्हणजे "ने" ऐवजी "नी" उच्चरला जातो. या प्रदेशात प्रत्येक आदिवासींच्या समुदायात स्वतंत्र पोटभाषा आहे. शहरी भागांमध्ये मराठी आणि हिंदी भाषा मोठ्या प्रमाणात बोलल्या जातात.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "ALL ABOUT GUJARAT Major Cities and Places". Government of Gujarat. 27 March 2017 रोजी पाहिले.

[[ वर्ग :गुजरात राज्य ]]