Jump to content

कॅनरी द्वीपसमूह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कॅनेरी द्वीपसमूह या पानावरून पुनर्निर्देशित)
कॅनरी द्वीपसमूह
Islas Canarias
स्पेनचा स्वायत्त संघ
ध्वज
चिन्ह

कॅनरी द्वीपसमूहचे स्पेन देशाच्या नकाशातील स्थान
कॅनरी द्वीपसमूहचे स्पेन देशामधील स्थान
देश स्पेन ध्वज स्पेन
राजधानी लास पामाससांता क्रुझ दे तेनेरीफ
क्षेत्रफळ ७,४९३ चौ. किमी (२,८९३ चौ. मैल)
लोकसंख्या २१,१७,५१९
घनता २८० /चौ. किमी (७३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ ES-CN
संकेतस्थळ http://www.gobcan.es
कॅनरी द्वीपसमूह is located in अटलांटिक महासागर
कॅनरी द्वीपसमूह
कॅनरी द्वीपसमूह
कॅनरी द्वीपसमूहाचे अटलांटिक महासागरामधील स्थान
तेनेरीफ बेटावरील तेइदे हा स्पेनमधील सर्वात उंच पर्वत आहे.

कॅनरी द्वीपसमूह (स्पॅनिश: Islas Canarias) हा अटलांटिक महासागरामधील एक द्वीपसमूहस्पेन देशाचा स्वायत्त संघ आहे. कॅनरी द्वीपसमूह उत्तर आफ्रिकेतील मोरोक्कोपश्चिम सहारा देशांच्या १०० किमी पश्चिमेस स्थित असून तो एकूण ७ बेटांचा बनला आहे. पोर्तुगालच्या असोरेसमादेईरा सोबत कॅनरी द्वीपसमूह युरोपियन संघामधील सदस्य देशांच्या सर्वात बाह्य प्रदेशांपैकी एक आहे.

तेनेरीफ हे येथील सर्वांत मोठे व सर्वाधिक लोकसंख्या असलेले बेट असून फ्वेर्तेबेंतुरा, ग्रान कनेरिया, लांथारोते, ला पामा, ला गोमेराएल हियेरो ही इतर बेटे आहेत. कॅनरी द्वीपसमूहावरील सौम्य व आल्हादकारक हवामान तसेच निसर्गसौंदर्यामुळे पर्यटन हा येथील प्रमुख व्यवसाय असून दरवर्षी सुमारे १.२ कोटी पर्यटक येथे भेट देतात.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: