विषमज्वर
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. |
कोंबड्या किंवा कोंबडीच्या अंड्यांमधून पसरणाऱ्या अन्न विषबाधेचे कारण असणाऱ्या सालमोनेलिया रोगाचे आणि माणसाला होणाऱ्या मुदतीच्या तापासाठी एकाच कुलातील सालमोनेला टायफी नावाचे जिवाणू कारणीभूत असतात.. सालमोनेला टायफीमुळे उलट्या आणि अतिसार न होता सलग नसणारा, तीव्र ताप येतो.
वर्णन
[संपादन]सालमोनेला टायफी हे जिवाणू रुग्णाच्या शौच आणि मूत्रामधून बाहेर पसरतात. प्रत्यक्ष आजार न झालेल्या वाहक व्यक्तीमधून जिवाणू पसरू शकतात. टायफॉइड बरा झालेल्या रुग्ण सुद्धा जिवाणूचा वाहक असतो. टायफॉइड बरा झालेले सुमारे तीन टक्के रुग्ण सालमोनेलाचे वाहक असतात. मुदतीचा ताप आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होण्याचे कारण अस्वच्छ सवयी. सालमोनेला जिवाणूचा प्रवेश अन्न मार्गात झाल्याशिवाय टायफॉइड होत नाही.शौचानंतर हात गडबडीने धुणे किंवा हात स्वच्छ न करणे हे त्याचे एक कारण. अशा हातानी अन्नाचे वाटप करणे हा टायफॉइड होण्याचे एक कारण आहे. रोगाचा वाहक असलेल्या व्यक्तीने हाताळलेल्या अन्नामुळे टायफॉइडची साथ पसरते. एका अशा व्यक्तीस ‘टायफॉइड मेरी’ असे नाव दिले गेले आहे. याशिवाय ज्या ठिकाणी उघड्यावर शौच केले जाते त्यावर बसलेल्या माशा दुसरीकडे उघड्या अन्नावर बसून अन्न दूषित करतात. या प्रकारास शौच-मुख प्रसार असे म्हणण्याची पद्धत आहे. जगाच्या काहीं भागामध्ये अस्वच्छतेमुळे टायफॉइड हा गंभीर प्रश्न झाला आहे. दर वर्षी सुमारे १ कोटी साठ लाख व्यक्ती टायफॉइडने आजारी पडतात.
अन्नमार्गात शिरल्यानंतर सालमोनेला टायफी ह्या लंबगोल आकाराच्या जिवाणूस, मोनोन्यूक्लियर फॅगोसाइट – एककेंद्रकी भक्षक पेशी खातात. या पेशी शरीराच्या प्रतिकारयंत्रणेचा भाग आहेत. या पेशीमध्ये सालमोनेला टायफी तशाच जिवंत राहतात.या पेशीमध्येच त्यांची वाढ होते.
विषमज्वराचा प्रसार हा पाण्यातूनही होतो. या रोगाची लागण झालेल्या व्यक्तीने पोहण्याच्या तलावात उतरू नते. तसे केल्यास तलावात उतरणाऱ्या इतरांना या रोगाची लागण होण्याची शक्यता असते.
लक्षणे
[संपादन]सालमोनेलाचा पेशीमध्ये प्रवेश झाल्यापासूनचे लक्षण दिसण्यास दहा ते चौदा दिवस लागतात. अस्वस्थ वाटणे, अशक्तपणा, वाटणे, डोकेदुखी चालू होणे, बारीक थंडी वाजून ताप येणे, मळमळणे, उलट्या होणे, मलावरोध, सांधेदुखी, पोटात मुरडा होणे, कळ लागणे, रक्तमिश्रित जुलाब होणे ही काही लक्षणे आहेत. भक्षक पेशीतील मोठ्या प्रमाणात असलेल्या पेशीमधील सालमोनेला जिवाणू रक्तामधून पसरल्यानंतर त्यांच्या प्रभावाने ताप येण्यास प्रारंभ होतो. रक्तामधील मोठ्या संख्येने असलेल्या सालमोनेला जिवाणूमुळे आलेला ताप वाढत जातो. उपचार न घेतलेल्या रुग्णामध्ये अशी स्थिति चार ते आठ आठवडे राहते. टायफॉइडचे सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे छातीवर व पोटावर लालसर पुरळ येणे हे होय..
रक्तामधून सालमोनेला शरीराच्या इतर उतीमध्ये जसे पित्ताशयात आणि लहान आतड्यातील लसिका पेशी समूहात (पेअर्स पॅच) शिरतात. सालमोनेलाचे वास्तव्य पित्ताशयात असल्यास पित्ताशयाचा दाह होतो. लसिका पेशी समूहातील सालमोनेलामुळे लहान आतड्यास छिद्र पडू शकते. असे झाल्यास लहान आतड्यातील अन्न आणि द्रव उदरपोकळीत शिरल्यास उदर पोकळी आंतरावरण दाह आणि शोथ होतो. हा टायफॉइड मधील गंभीर प्रकार असून टायफॉइडमुळे होणाऱ्या मृत्यूचे कारण आहे.
टायफॉइडमुळे होणाऱ्या इतर परिणामामध्ये यकृत आणि प्लीहेस सूज येणे, प्लीहा फुटणे, रक्तक्षय, रक्तातील तांबड्या पेशींचे प्रमाण कमी होणे, लहान आतड्यामध्ये रक्तस्राव, सांध्यामध्ये जिवाणुसंसर्ग होणे इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.. सिलक पेशीचा अॅनिमिया असलेल्या रुग्णामध्ये रक्तक्षय आणि प्रतिकार यंत्रणा क्षीण झाल्याने स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनियाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. हृदय, मेंदूआवरण आणि मेंदूमध्ये जिवाणू संसर्ग झाल्याने कोमा आणि मृत्यू ओढवतो. उपचार न केल्यास रुग्णास बरे होण्यास कित्येक महिने लागतात.
टायफॉइड झाल्यावर रोगोपचारादरम्यान पोषणाची कमतरता झाल्याने बऱ्याच रोग्यांचे, विशेषतः स्त्रियांचे केस गळतात.
निदान
[संपादन]पोटावरील विवक्षित प्रकारच्या पुरळांवरून तज्ज्ञ डॉक्टरांना टायफॉइडचे निदान होते. सलग नसणारा ताप, अस्वच्छ ठिकाणी केलेला नजीकच्या काळातील प्रवास हे निदानाचे कारण असू शकते. रक्ताच्या कल्चर वरून टायफॉइडचे नेमके निदान होते. यासाठी रुग्णाच्या शौच, मूत्र आणि अस्थिमज्जा यांचे प्रयोगशाळेत वृद्धिमिश्रणात कल्चर करतात. ज्या रुग्णानी प्रतिजैविके घेतलेली नाहीत अशा ८०% रुग्णामध्ये रक्त कल्चर परीक्षा सकारात्मक येते.
उपचार
[संपादन]प्रतिजैविकांचा वापर टायफॉइडवर परिणामकारक आहे. इ.स. २००० पासून सेप्रिअक्सोन आणि सिप्रोफ्लॉक्सिन ही दोन औषधे टायफॉइडवर दिली जात आहेत. सालमोनेला टायफीच्या वाहक व्यक्तीवर टायफॉइडची लक्षणे दिसत नसली तरी उपचार करण्याची गरज आहे. कारण बहुतेक वेळा वाहक व्यक्तीमुळे टायफॉइडचे नवे रुग्ण होण्याची प्रक्रिया सतत चाललेली असते. वाहक व्यक्ती शोधून काढणे ही मोठी कौशल्याची बाब आहे. त्यासाठी एक किवा दोन औषधे चार ते सहा आठवडे वाहक व्यक्तीस द्यावी लागतात. अँपिसिलीन आणि अॅमॉक्सिसिलीन, अँपिसिलीन आणि प्रोबेनेसिड यांचे मिश्रण यासाठी दिले जाते. अनेकदा पित्ताशयामध्ये सालमोनेला संसर्ग झालेल्या वाहक व्यक्तीचे पित्ताशय काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. कारण दिलेली प्रतिजैविके पित्ताशयावर परिनामकारक ठरत नाहीत. रिफांपिन आणि ट्रायमिथेप्रिम सल्फामेथोक्सॅझोल उपचारामुळे पित्ताशयातील संसर्ग दूर होतो आणि पित्ताशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करण्याची वेळ येत नाही.
आहार
[संपादन]टायफॉइड झालेल्या रोग्याने आहारात साखर कमीतकमी खावी. फळे ्खाण्याऐवजी फळांचा, विशेषतः डाळिंबाचा, सफरचंदाचा रस प्यावा. घन आहार न घेता तांदळाची पेज, खिमटी (भाताचे गरगट) खावी किंवा भाज्यांची सुपे प्यावी.
पूर्वानुमान
[संपादन]बहुतेक रुग्ण उपचाराना उत्तम प्रतिसाद देतात. प्रतिजैविकांचा वापर होण्याआधी १२% टायफॉइडचे रुग्णांचा आजाराने मृत्यू होत असे. सध्या प्रतिजैविकांचा उपचार करून घेतलेल्या रुग्णापैकी फक्त १ % रुग्ण टायफॉइडने मरण पावतात. मृत्यू होण्याचे प्रमाण लहान बालकामध्ये आणि अतिवृद्धांमध्ये अधिक दिसून येते. कुपोषितामध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. रुग्ण बेशुद्ध झाल्यानंतर कोमा स्थितीत गेल्यास तो वाचण्याची शक्यता नसते.
प्रतिबंध
[संपादन]अन्नपदार्थ झाकून ठेवल्याने माशी, खराब पाणी या रोगप्रसारक माध्यमांपासून वाचता येईल. वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छ्ता, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, वैयक्तिक आरोग्य आणि योग्य त्या वेळी टायफॉइडची घेतलेली लस यामुळे टायफॉइडचा प्रतिबंध होतो. तसेच वेळोवेळी या रोगाची लागण झाल्याची तपासणी करणे आवश्यक आहे. सालमोनेला टायफी हे जिवाणू अस्तित्वास असल्याचे माहीत असलेल्या देशामध्ये प्रवास करण्याआधी टायफॉइडची लस टोचून घेणे आवश्यक आहे. अल्प मुदतीचे आणि दीर्घ मुदतीचे संरक्षण देणाऱ्या दोन्ही लसी उपलब्ध आहेत. लसीचे उत्तरपरिणाम टाळून अधिक परिणामकारक लस वनविण्याचे प्रयत्न सतत चाललेले आहेत. लसीच्या उत्तरपरिणांमाध्ये स्नायुदुखी, पोटदुखी आणि फ्लूसारखी लक्षणे दिसतात. या लसी जैविक युद्धाविरुद्धचा उपचार म्हणून वापरता येण्याची शक्यता २००४ मध्ये व्यक्त करण्यात आली आहे.