कातानिया-फाँतानारोसा विमानतळ
कातानिया-फाँतानारोसा विमानतळ Aeroporto di Catania-Fontanarossa | |||
---|---|---|---|
चित्र:Catania Airport-logo.png | |||
चित्र:Aeroporto di Catania - Catania Airport.JPG | |||
आहसंवि: CTA – आप्रविको: LICC | |||
नकाशा | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
प्रचालक | एसएसी | ||
कोण्या शहरास सेवा | कातानिया, सिसिली, इटली | ||
स्थळ | कातानिया | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ३९ फू / १२ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 37°28′00″N 15°03′50″E / 37.46667°N 15.06389°Eगुणक: 37°28′00″N 15°03′50″E / 37.46667°N 15.06389°E | ||
संकेतस्थळ | |||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
मी | फू | ||
08/26 | 2,560 | 7,989 | डांबरी |
सांख्यिकी (२०२२) | |||
प्रवासी | 10,099,441 | ||
प्रवासीसंख्या बदल २०२१-२२ | ▲ 64.9% | ||
विमानोड्डाणे | 72,505 | ||
विमानोड्डाणे संख्याबदल २०२१-२२ | ▲ 43.8% | ||
स्रोत: Italian AIP at EUROCONTROL[१] Statistics from Assaeroporti[२] |
कातानिया-फाँतानारोसा विमानतळ (आहसंवि: CTA, आप्रविको: LICC) तथा व्हिन्सेंझो बेलिनी विमानतळ ( इटालियन: Aeroporto Internazionale Vincenzo Bellini di Catania-Fontanarossa ) हा इटलीच्या सिसिली प्रांतातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ कातानिया शहराच्या ४.३ किमी नैऋत्येस आहे.
याला कातानियामथ्ये जन्मलेल्या ऑपेरा संगीतकार विन्सेंझो बेलिनीचे नाव दिलेले आहे.
एस्सॅरोपोर्तीनुसार कातानिया-फाँतानारोसा २०२०मधील सिसिलीतील सर्वाधिक वर्दळीचा तर इटलीतील चौथ्या क्रमांकाचा सर्वात व्यस्त विमानतळ होता. [३] येथून केएलएम, आयटीए एरवेझ, लुफ्तांसा तसेच ईझीजेट आणि रायनएर सह अनेक कंपन्या युरोपमधील रोम, म्युनिक, ॲमस्टरडॅम आणि बर्लिन सह अनेक शहरांना विमानसेवा पुरवता. २०१६मध्ये येथून २० लाख प्रवाशांनी रोम-फियुमिसिनो विमानतळाला ये-जा केली होती.
विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने
[संपादन]कातानिया-फाँतानारोसा विमानतळावर खालील विमान कंपन्या नियमित नियोजित आणि भाड्याने सेवा देतात:
येण्याजाण्याची सुविधा
[संपादन]रेल्वे
[संपादन]कातानिया-एरोपोर्तो फाँतानारोसा हे नव्याने बांधलेले रेल्वे रेल्वे स्थान, मेसिना-सिरॅक्यूझ रेल्वे, कातानिया-पालेर्मो रेल्वे तसेच कातानिया-कॅल्ताजिरोन रेल्वेद्वारे सिसिलीभर सेवा पुरवते. येथून कातानियाच्या उपनगरी गाड्याही सुटतात. [१८] येथून १० मिनिटांत कातानिया सेंत्राले रेल्वे स्थानकाला जाता येते तर सिरॅक्यूझ किंवा ताओर्मिना स्थानकाला जाण्यासाठी एक तास लागतो. [१९]
बस
[संपादन]येथून नियमित शटल बस सेवा कॅटानिया शहराच्या मध्यवर्ती भागाला तसेच सेंत्राले रेल्वे स्थानकाला वाहतूक पुरवते. शिवाय तर बेटाच्या इतर भागांसाठी नियोजित बस सेवा देखील [२०] विमानतळावरून उपलब्ध आहेत. मुख्य बस स्थानक रेल्वे स्थानकाच्या समोर आहे आणि शहराच्या मध्यवर्ती भागापासून १० मिनिटे चालण्याच्या अंतरावर आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]- पालेर्मो विमानतळ फाल्कोन ई बोर्सेलिनो
- त्रापानी बिर्जी विमानतळ व्हिंसेंझो फ्लोरियो
- कोमिसो विमानतळ व्हिंसेंझो माग्लियोको
संदर्भ
[संपादन]- ^ "EAD Basic - Error Page". ead.eurocontrol.int. 27 December 2018 रोजी पाहिले.
- ^ "Statistiche - Assaeroporti" (PDF). assaeroporti.com.
- ^ "Home Assaeroporti | Associazione Italiana Gestori Aeroportuali". Assaeroporti (इटालियन भाषेत). 2021-03-03 रोजी पाहिले.
- ^ "Aer Lingus to fly three new sun holiday routes from Dublin विमानतळ in 2024". independent.ie.
- ^ "Dan Air: 13 rute de la Bacău cu debut în noiembrie și decembrie 2023". November 2023.
- ^ "Israir NS24 Leased Smartwings Boeing 737 Operations". AeroRoutes (इंग्रजी भाषेत). 21 March 2024. 22 March 2024 रोजी पाहिले.
- ^ "Jet2 puts 16m seats on sale for summer 2025".
- ^ "New airline replacing Air Malta to fly on March 31, 2024". 2 October 2023.
- ^ a b "Ryanair official website". 26 June 2023.साचा:Full citation needed
- ^ "Ryanair sbarca in Albania. Attacco frontale a Wizz Air". 8 June 2023.
- ^ "Ryanair apre la Catania – Heraklion". 5 December 2023.
- ^ "Ryanair NS24 Network Additions – 10DEC23".
- ^ a b "Wizz Air porta a 4 gli aerei a Catania e diventa la prima compagnia aerea. Apre 5 rotte e sbarca a Comiso". 12 May 2023.
- ^ a b "Wizz Air 1Q24 Routes Suspension Summary – 31DEC23". AeroRoutes.
- ^ "Wizz Air NS24 Turin Service Changes – 04FEB24".
- ^ Verona Villafranca विमानतळ
- ^ "Wizz Air suspendă rute din București și Cluj Napoca în octombrie 2023". 28 September 2023.
- ^ "Catania Airport Train Station". 12 January 2020.
- ^ "EN - Trenitalia". www.trenitalia.com.
- ^ "Catania Airport Bus".