Jump to content

एर लिंगस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एर लिंगस
आय.ए.टी.ए.
EI
आय.सी.ए.ओ.
EIN
कॉलसाईन
SHAMROCK
स्थापना १५ एप्रिल १९३६
वाहतूकतळ बेलफास्ट
कॉर्क
लंडन-हीथ्रो
गॅटविक विमानतळ
शॅनन
हब डब्लिन विमानतळ
फ्रिक्वेंट फ्लायर गोल्ड सर्कल क्लब
विमान संख्या ४७
गंतव्यस्थाने ७०
ब्रीदवाक्य Great Care. Great Fare
मुख्यालय डब्लिन, आयर्लंडचे प्रजासत्ताक
संकेतस्थळ http://www.aerlingus.com/

एर लिंगस (आयरिश: Aer Lingus) ही आयर्लंडामधील एक विमान वाहतूक कंपनी आहे. युरोप, उत्तर अमेरिका, उत्तर आफ्रिका या ठिकाणी ही कंपनी वाहतूकसेवा पुरवते. ही आयर्लंडातील सर्वांत जुनी, अस्तित्वात असलेली विमानवाहतूक कंपनी असून, रायन एर कंपनीखालोखाल सर्वांत मोठी आयरिश विमानवाहतूक कंपनी आहे. डब्लिन विमानतळ तिचे मुख्यालय असून बेलफास्ट, कॉर्क, शॅनन व लंडन हीथ्रो हे मुख्य विमानतळ आहेत.

आयरिश सरकारद्वारे स्थापन झालेल्या या कंपनीचे २००६ ते २०१५ दरम्यान खाजगीकरण झाले आणि आता ती इंटरनॅशनल एरलाइन्स ग्रुपच्या (आयएजी) पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. या विमानकंपनीचे मुख्य कार्यालय डब्लिन काउंटी मधील क्लॉघरन येथील डब्लिन विमानतळाच्या परिसरात आहे.[]

१९३६ मध्ये स्थापन झालेली एर लिंगस ३१ मार्च २००७ पर्यंत वनवर्ल्ड विमान युतीची सदस्य होती. आयएजीने ताबा घेतल्यानंतर एर लिंगस पुन्हा वनवर्ल्डमध्ये सामील होईल अशी अपेक्षा होती परंतु १५ नोव्हेंबर २०१७ रोजी एका पत्रकार परिषदेत विमानकंपनीचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीवन कॅव्हॅनॉ यांनी हे नाकारले.[] या विमानकंपनीचे वनवर्ल्ड, स्टार अलायन्स आणि स्कायटीम सदस्यांसोबत कोडशेर करार आहेत, तसेच एतिहाद एरवेझ, जेटब्लू एरवेझ आणि युनायटेड एरलाइन्स सोबत इंटरलाईन करार आहेत. एर लिंगसचा आपला व्यवसाय किफायतशीर आणि पारंपारिक अशा दोन्ही पद्धतींचे संकरण करून चालवते.[] युरोपियन मार्गांवर मिश्र सेवा [] आणि ट्रान्सअँटलांटिक मार्गांवर पूर्ण सेवा देणारी द्वि-स्तरीय उड्डाणे चालवते.

२०१५ मध्ये आयएजी ने विकत घेण्यापूर्वी रायनएरकडे एर लिंगसचे २९+% आणि आयरिश सरकारकडे २५+% समभाग होते. २ ऑक्टोबर २००६ रोजी सरकारने डब्लिन येथील आयरिश स्टॉक एक्सचेंज आणि लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये कंपनीची नोंदणी करण्याचा निर्णय घेईपर्यंत सरकारकडे ८५% हिस्सा होता. एर लिंगसच्या व्यवसायसमूहात एर लिंगस लिमिटेड, एर लिंगस बिची लिमिटेड, एर लिंगस (आयर्लंड) लिमिटेड आणि डर्नन इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आहेत.[]

२६ मे २०१५ रोजी अनेक महिन्यांच्या चर्चेनंतर, आयरिश सरकारने कंपनीतील आपला २५% हिस्सा विकण्यास संमती दिली. रायनएरकडे एर लिंगसचा ~३०% हिस्सा होता, जो त्यांनी १० जुलै २०१५ रोजी प्रति समभाग २.५५ युरो दराने आयएजी ला विकण्याचे मान्य केले.[][] ऑगस्ट २०१५ मध्ये एर लिंगसच्या भागधारकांनी अधिकृतपणे आयएजीला विकले जाण्याचे स्वीकारले. त्यानंतर २ सप्टेंबर २०१५ रोजी आयएजी ने एर लिंगसचे नियंत्रण आपल्या हातात घेतले.[]

गंतव्यस्थाने

[संपादन]
अ‍ॅम्स्टरडॅम विमानतळावर थांबलेले एर लिंगसचे एरबस ए३२०-२०० विमान

जून २०२४ च्या सुमारास एर लिंगस युरोप आणि उत्तर अमेरिका मधील ९३ गंतव्यस्थानांवर विमानसेवा चालवते; यामध्ये ऑस्ट्रिया, बेल्जियम, कॅनडा, क्रोएशिया, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, आयर्लंड, इटली, नेदरलँड्स, पोलंड, पोर्तुगाल, स्पेन, स्वित्झर्लंड, तुर्की, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स मधील ठिकाणांचा समावेश आहे.

ब्रेक्झिटशी संबंधित नियमांमुळे ऑक्टोबर २०२२ मध्ये बेल्फास्ट सिटी आणि लंडन हिथ्रो दरम्यानचे एर लिंगसची उड्डाणे एर लिंगस युकेला दिली गेली.[]

विमानताफा

[संपादन]

सप्टेंबर २०२५ च्या सुमारास एर लिंगस फक्त एरबस विमाने वापरते:[१०]

एर लिंगसचा ताफा
विमान सेवेत मागणी प्रवासी[११] नोंदी
जे वाय एकूण
एरबस ए३२०-२०० २७ १७४ १७४
एरबस ए३२० निओ १८६ १८६
एरबस ए३२१एलआर १६ १६८ १८४
एरबस ए३२१एक्सएलआर [१२] १६ १६८ १८४[१३] डिसेंबर २०२४ मध्ये वितरण सुरू झाले.[१४]
एरबस ए३३०-२०० २३ २४३ २६६
२४८ २७१
२५८ २८१
एरबस ए३३०-३०० १० ३० २८३ ३१३
२८७ ३१७
एकूण ६२

एर लिंगसच्या विमानांना आयर्लंडमधील ख्रिश्चन संतांची नावे दिली जातात.[१५]

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; "HQaddress" नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  2. Mulligan, John (15 November 2017). "Aer Lingus has 'no plans' to rejoin airline alliance". Irish Independent. 13 March 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 March 2018 रोजी पाहिले.
  3. "New type of flying at Aer Lingus". CNN. 22 March 2012. 8 July 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 December 2023 रोजी पाहिले.
  4. "Aer Lingus". 2 April 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 April 2015 रोजी पाहिले.
  5. "Aer Lingus Group stock lookup on all exchanges". Yahoo! Finance UK & Ireland. 8 March 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 April 2012 रोजी पाहिले.
  6. Kelly, Fiach; Taylor, Cliff (26 May 2015). "Cabinet agrees to sell State's 25% stake in Aer Lingus". The Irish Times. 26 May 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 June 2015 रोजी पाहिले.
  7. Martin, Ben (10 July 2015). "Ryanair to allow IAG takeover of Aer Lingus". The Daily Telegraph. 12 January 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित.साचा:Cbignore
  8. Newenham, Pamela (2 September 2015). "IAG formally takes control of Aer Lingus". The Irish Times. 9 December 2023 रोजी पाहिले.
  9. "Aer Lingus leasing in BA capacity for UK domestic route".
  10. "Global Airline Guide 2025 - Aer Lingus". Airliner World. September 2025. p. 62.
  11. "Seat Maps" (PDF). 7 October 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 June 2019 रोजी पाहिले.
  12. https://flyinginireland.com/2026/02/aircraft-register-update-january-2026/
  13. "Aer Lingus takes delivery of its first Airbus A321XLR aircraft". Airbus.com (इंग्रजी भाषेत). 10 December 2023. 19 December 2024 रोजी पाहिले.
  14. Ostrower, Jon (22 December 2023). "Aer Lingus tipped as first A321XLR operator in 2024". The Air Current (इंग्रजी भाषेत). 10 February 2024 रोजी पाहिले.
  15. "Aer Lingus' aircraft will continue to be named after saints - chief executive". Irish Independent (इंग्रजी भाषेत). 15 November 2016. 6 November 2022 रोजी पाहिले.