Jump to content

इझीजेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ईझीजेट या पानावरून पुनर्निर्देशित)

ईझी जेट ही युनायटेड किंग्डममधील विमानवाहतूक कंपनी आहे. लंडन-ल्यूटन विमानतळावरून विमानसेवा देणारी ही सगळ्यात मोठी कंपनी आहे.[] ईझी जेट ही विमान कंपनी देशांतर्गत व ३२ परदेशांत मिळून ७०० गंतव्यस्थानांना जाण्यासाठी विमान सेवा पुरवते.[]([] ईझी जेट लंडन स्टॉक मार्केटमध्ये नोंदणी असून हे समभाग एफटीएसई १००चा भाग आहेत. ३० सप्टेंबर २०१४ अखेर ईझी जेट मध्ये ८,९०० पेक्षा अधिक कर्मचारी काम करीत होते. बव्हंशी एरबस ए३१९ प्रकारच्या विमानांचा ताफा असलेल्या ईझी जेटची युरोपात २४ ठाणी आहेत. त्यात सर्वात मोठे गॅटविक येथे आहे. ईझी जेटने २०१४मध्ये साडे सहा कोटीहून अधिक प्रवाशांची वाहतूक केली होती. Ryanair रायनएर या किफायतशीर प्रवास देणाऱ्या कंपंनीनंतर ईझी जेटचा किफायतशीर सेवेत दुसरा नंबर आहे.

इतिहास

[संपादन]

ईझी जेटची स्थापना सन १९९५ मध्ये झाली. सर स्टेलिओस हाजी-लोंनौ या ग्रीक क्य्पृओत या व्यावसायिकाने सुरुवातीला दोन मोठी बोइंग 737-200 भाडे तत्त्वाने घेऊन लंडन लुटन ते ग्लासगो आणि ईडनबर्ग असी चालू केली. एप्रिल १९९६ मध्ये त्यांनी पहिले स्व-मालकीचे ईझी जेट विमान आंतरराष्ट्रीय मार्गावर ॲमस्टरडॅमकडे रवाना केले. ईझी जेटकडे विमान वाहतूक दाखला नसल्याने ऑक्टोबर १९९७ पर्यंत GB विमानमार्ग आणि नंतर एर Foyle मार्फत विमान सेवा चालू होती.

५ नोव्हेंबर २००० रोजी लंडन स्टॉक एक्सचेंज मध्ये ईझी जेट कंपनीची नोंदणी झाली. ऑक्टोबर २००४ मध्ये FL संघटनेचे मालक इकेलंदाइर आणि स्टर्लिंग यांनी ईझी जेटचे ८.४% समभाग खरेदी केले. सन २००५ पयंत FL ने हप्त्याहप्त्याने ईझी जेटचे समभाग १६.९9% पर्यंत वाढविले. युनायटेड किंग्डमची वाहतूक व्यवस्था इंधनाच्या चढ्या भावांमुळे अडचणीत आली. त्यामुळे एप्रिल २००६ मध्ये भीतीपोटी FL ने माघार घेतली आणि ईझी जेटचे गुंतवणुकीवर १४ कोटी डॉलर नफा कमवून ते समभाग ३२.५ कोटी डॉलरला विकले. नोव्हेंबर २००५ मध्ये म्हणजे १० वर्षांनंतर ईझी जेट ने रॉय वेबस्टर यांना CEO पदावरून कमी केले आणि त्या ठिकाणी RAC पीएलसी ॲन्ड्‌ऱ्यू हॅरिसन यांची CEO म्हणून नेमणूक केली. वाहतूक व्यवस्थेत गुंतवणूक करणारे ईझी जेटचे संस्थापक सर स्टेलिऑस हाजी-लोंनौ आणि कुटुंबीय यांचे जुलै २०१४ पर्यंत ईझी ग्रुप होल्डिंग लिमिटेडमध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजेच ३४.६२% समभाग होते.

ईझी जेटची सन १९९५मध्ये स्थापना झाली पण इतर संघटनांचे सामिलीकरणाने आणि ताबा मिळाल्याने विकास अतिशय जलद होत गेला. ईझी जेट ही किफायतशीर प्रवास देणारी असल्याने प्रवाशांचा ओघ वाढतच राहिला. इतर संघटित कंपन्यांबरोबर ईझी जेट स्वित्झर्लंडमध्ये २०० पेक्षा जादा विमाने चालवू लागली.

विस्तार आणि फायदा

[संपादन]

ईझी जेटची स्थापना झाल्यापासूनच अतिशय वेगाने विकास झाला सर्व युरोप खंडात आणि युनायटेड किंग्डममध्ये मागणी वाढली. यामुळे ईझी जेटने GB विमान कंपनीसह अनेक प्रतिस्पर्धी विमान कंपन्या खरेदी केल्या.

मार्च १९९८, ईझी जेटने स्विस चार्टर एर लाईनच्या TEA विमानतळाचे 3० लाख स्विस फ्रॅंक देऊन ४०% भाग खरेदी केले. या विमान मार्गाचे नाव ईझी जेट स्वित्झलंड केले आणि १ एप्रिल १९९९ रोजी विमान सेवेचे विशेष हक्क चालू केले. त्याचबरोबर मुख्य कार्यालयाचे ठिकाण जिनिव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेले.

ईझी जेटचे हे युनायटेड किंग्डमबाहेरील पहिले नवीन ठाणे झाले. सन २००२ मध्ये लंडन-स्टॅंस्टेडचे ठाणे Go ३७.४ कोटी पाऊंडांना खरेदी केले.. ईझी जेटची ब्रिस्टॉल येथे GO, ईस्ट मिडलॅंड आणि लंडन-स्टॅंस्टेड, ही तीन नवीन विमानतळ ठाणी झाली. ईझी जेटची GO विमानतळ ताब्यात आल्याने बोईंग 737-300 चीसंख्या दुप्पट झाली.[]

सन २००२ मध्ये ईझी जेटचे गॅटविक विमानतळावर ठाणे सुरू झाले. आणि त्यानंतर २००३ आणि २००७ मध्ये जर्मनी, फ्रान्स, इटली, आणि स्पेन येथे ठाणी सुरू झाली. ईझी जेटचा युरोप खंडात जम बसला. २००७ मध्ये युरोप खंडातील इतर कोणत्याही विमानसेवेपेक्षा आम्ही प्रत्येक दिवशी जादा विमानसेवा देतो, असा ईझी जेटने दावा केला.

२५ ऑक्टोबर २००७ रोजी ब्लण्ड ग्रुपच्या जीबी विमान कंपनीचे सर्व समभाग ईझी जेटने १०.३ कोटी पाऊंड देऊन खरेदी केले व हे पाऊंड लंडनमधील गॅटविक विमानतळावरील ठाण्याच्या विकासासाठी वापरले. त्याचबरोबर मॅंचेस्टर विमानतळावर एक नवीन ठाणे चालू केले.

जून २०११ मध्ये ईझी जेटने दक्षिण लंडन विमानतळावर एक ठाणे चालू केले आणि तेथून अलिकांते, ॲमस्टरडॅम, बार्सिलोना, बेलफास्ट,, फारो, मलागा, जर्सी, पालमा दे माजोरका आणि इबिझा या ठिकाणांसाठी विमानसेवा देण्याचे ठरवले.[]

मार्च २०१३ मध्ये ईझी जेट आणि त्यांचे चीफ फायनॅन्शियल ऑफिसर(CFO) ख्रिस केनेडी यांनी विमान मार्गाच्या जाहिरातीसाठी लंडन-गॅटविक ते थेट मॉस्को या विमान मार्गाचे उद्‌घाटन केले.

सन २०१४ मध्ये ईझीजेटने युरोपातील २३वे केंद्र हॅंबुर्ग येथे 3 ए 319 या विमानाची व १५ नवीन हवाई मार्गांची सोय केली. त्यापूर्वी ६ मार्ग चालू होतेच. शिवाय नेपल्स येथे एक लहानसे ठाणे उघडले. या ठाण्यात सध्या दोन विमाने ठेवणे आणि ठाण्यातून २० हवाई मार्ग चालू करणे ही योजना असावी असे वाटते.

व्यवसाय डावपेच

[संपादन]

ईझी जेटने साऊथ-वेस्ट विमान कंपनीच्या व्यवसायाच्या कामकाज पद्धती चालू करण्याचे ठरविले. त्या डावपेचात खर्च कमी करण्यासाठी एकमेकाशी जुळवून जाणारी विमाने विकणेचे नाही, सेवार्थ दिले जाणारे आहार, मोठी विमाने वापरात आणणे, विमानाचा परतीचा प्रवास ताबडतोब चालू करणे, जादा सेवेसाठी सेवा शुल्क घेणे, व्यवसायातील खर्च कमी करणे या बाबींचा समावेश होता. त्यांची विमाने १२ वर्षे जुनी तर ईझी जेटची ५ वर्षे जुनी होती.

ईझी जेटचे स्वरूप आणि चलनवलन दूरचित्रवाणीवरील ITV चॅनेलवर airline मालिकेत लंडन-ल्य़ूटन आणि त्यांच्या इतर विमानंतळांवर प्रक्षेपित केले जाते.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "ईझी जेटची सविस्तर माहिती" (इंग्लिश भाषेत). 2015-10-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ०२ सप्टेबर २०१५ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "गंतव्यस्थानांचा नकाशा" (इंग्लिश भाषेत). 2019-12-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ०२ सप्टेबर २०१५ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "ईझी जेट विमानाची माहिती" (इंग्लिश भाषेत). 2015-06-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ०२ सप्टेबर २०१५ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "ईझी जेटला खरेदीसाठी £374m" (इंग्लिश भाषेत). 2015-09-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २ सप्टेबर २०१५ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "ईझी जेटची नवीन शाखा साउथएन्ड उघडली आहे" (इंग्लिश भाषेत). ०२ सप्टेबर २०१५ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)