Jump to content

वुएलिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(व्ह्युएलिंग या पानावरून पुनर्निर्देशित)

वुएलिंग ही स्पेनची किफायतशीर विमानकंपनी आहे. हिचे मुख्य केंद्र बार्सिलोना येथे आहे. या कंपनीचे नाव वुएलो (विमान) या स्पॅनिश शब्दावरून आहे. हिचे मुख्यालय बार्सेलोना महानगरात असून मुख्य तळ बार्सेलोना-एल प्रात आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि रोमच्या लिओनार्दो दा विंची आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहेत.

इतिहास

[संपादन]

या विमान कंपनीची स्थापना फेब्रुवारी २००४ मध्ये झाली आणि १ जुलै २००४ रोजी बार्सेलोना ते इबिझा या शहरांदरम्यान पहिली विमानसेवा सुरू झाली. वुएलिंगने सुरुवातीला दोन एरबस ए३२० प्रकारची विमाने वापरून बार्सेलोना ते ब्रसेल्स, इबिझा, पाल्मा दे मायोर्का आणि पॅरिस शहरांदरम्यान विमानसेवा चालू केली.[]

वुएलिंगने २००५ मध्ये माद्रिद-बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तर २००७ पॅरिस आणि २००९ मध्ये सेव्हियापासून सेवा सुरू केली.

२००८ मध्ये या कंपनीत स्पॅनिश क्लिक एर समाविष्ट झाली. क्लिकएरचे आलेक्ष क्रुज हे या एकत्रीकरण झालेल्या विमान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले.[] दि.१५ जुलै २००९ रोजी या दोन विमान कंपनीचे एकत्रीकरण कायदेशीर पूर्ण झाले आणि नवीन कंपनी वुएलिंग ब्रँडने सुरू झाली.[]

सन २००९ मध्ये ५० ठिकाणी ८.२ मिल्लियन प्रवासी वाहतूक करणारी स्पेन मधील दोन क्रमांकाची ही विमान कंपनी ठरली.[]

जानेवारी २०११ मध्ये नवीन ९ विमाने खरेदी करण्याची घोषणा केली. त्यापैकि ६ विमाने एप्रिल ते जून २०११ चे दरम्यान ताब्यात आली आणि राहिलेली दोन २०११ चे शेवटी मिळाली.२१ मार्च २०१२ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी आलेक्ष क्रुज यांनी रोम हे नवीन बेस निर्माण करण्याची घोषणा केली. दि.२५ मार्च २०१२ रोजी त्याचे उद्घाटन झाले आणि तेथे एक विमान तैनात केले. रोम मध्ये आत्तापर्यंत अनेक आगमन ठिकाणे निर्माण झाली आहेत.

दि.५ डिसेंबर २०१२ रोजी या विमान कंपनीने फ्लोरेंस येथे बेस निर्माण करण्याची घोषणा केली आणि तेथे एक विमान ठेवून युरोप मधील नवीन चार ठिकाणी विमान सेवा सुरू केली. दि.२५ ऑक्टोबर २०१३ रोजी म्हणजे १० महिन्यांनंतर या कंपनीने फ्लोरेन्स ते कटणीय ही इटलीतील पहिली स्थानिक विमान सेवा सुरू केली.

नोव्हेंबर २०१३ पासून या कंपनीने सतत बार्सिलोना केंद्राचे विकासाचा मार्ग अवलंबिला. ६ नोव्हेंबर २०१३ रोजी ब्रुसेल्स येथे केंद्र सुरू करण्याची घोषणा केली आणि येथे एक विमान ठेवून पुर्वीचे चार मार्गाबरोबरच मे २०१४ पासून नवीन ७ मार्ग सुरू केले. शिवाय नोव्हेंबर २०१३ मध्ये रोम-फिउमिकीनो केंद्र निर्माण केले.

सन २०१४ चे मध्यापासून तेथून ३० विमान मार्ग अस्तित्वात आले. त्यांचे हे बार्सिलोना नंतरचे दुसरे क्रमांकाचे केंद्र ठरले. कंपनीचे संकल्पनाचे पुंनर्रजीवन करण्यासाठी आणि व्यवस्थापनातील कांही बदल घडविण्यासाठी ऑक्टोबर २०१६ मध्ये या कंपनीने ब्रुसेल्स,कटणीय,पालेर्मो ही केंद्रे बंद केली.

करार

[संपादन]

वुएलिंगचे खालील कंपन्यांशी व्यापारी करार आहेत -

विमानताफा

[संपादन]

जुलै २०१६अखेर वुएलिंगकडे खालील विमानताफा होता.[]

विमान प्रकार सध्या सेवेत मागणी प्रवासी सेरा
एरबस ए३१९-१०० १४४ १ विमान इबेरीय कडून भाड्याने घेतले
एरबस ए३२०-२०० ९४ ३२ १७४ १८० १८६
एरबस ए३२१-२०० १० - २२० -
एकूण ११० ३५ - -

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "वूईलिंग एअरलाइन्सचा इतिहास".
  2. ^ "वूईलिंग आणि स्पॅनिश क्लिक एयर यांनी विलीन होण्यास सहमति दिली". 2012-02-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-11-11 रोजी पाहिले.
  3. ^ "यूके तील हवाई परिवहन मधील एक नवीन नाव". 2017-01-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-11-11 रोजी पाहिले.
  4. ^ "वूईलिंग एअरलाइन्सची सेवा". 2013-07-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-11-11 रोजी पाहिले.
  5. ^ "वूईलिंग एअरलाइन्सचा विमानसंच तपशील".