बर्लिन ब्रांडेनबुर्ग विमानतळ
Jump to navigation
Jump to search
बर्लिन ब्रांडेनबुर्ग विमानतळ (आहसंवि: BER, आप्रविको: EDBB) (जर्मनःफ्लुगहाफेन बर्लिन ब्रांडेनबुर्ग विली ब्रांड्ट) हा जर्मनीची राजधानी बर्लिन शहराजवळचा प्रस्तावित विमानतळ आहे. सध्याच्या शोनेफेल्ड विमानतळास लागून असलेला हा विमानतळ २०१७ च्या अखेरपर्यंत बांधून तयार होईल. याचे बांधकाम २००६मध्ये सुरू झाले त्यावेळी हा विमानतळ २०१०मध्ये तयार होणे अपेक्षित होते.
या विमानतळास दोन धावपट्ट्या असतील तसेच नवीन प्रवासी टर्मिनलही असेल.