Jump to content

कनू कलसारिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. कनू कलसारिया हे एक भारतीय राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. १९९७ ते २०१२ पर्यंत ते १० व्या, ११ व्या आणि १२ व्या गुजरात विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे सदस्य होते. त्यांनी २०११ मध्ये महुवाजवळील निरमा सिमेंटच्या प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा आंदोलन केले व ज्यामुळे प्रकल्पाची पर्यावरण मंजूरी रद्द करण्यात आली. त्यांनी सद्भावना मंच लॉंच केला आणि गुजरात विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे निवडणूक लढवली परंतु २०१२ मध्ये ते अयशस्वी ठरले. त्यांनी २०१४ साली आम आदमी पार्टीत प्रवेश केला. ते पक्षाच्या राजकीय कामकाज समिती सदस्य आहेत.