Jump to content

सदस्य चर्चा:Maihudon/जुनी चर्चा ३

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

औरंगाबाद

[संपादन]

औरंगाबाद या लेखात माहितीचौकटीत महानगरपालिका आयुक्त यांचे नाव व राजकिय या उपमथळ्या खाली असलेले नाव वेगवेगळे आहे. कृपया आवश्यक ती दुरुस्ती करावी हि विनंती.

V.narsikar ०६:२२, १३ नोव्हेंबर २००९ (UTC)

१४:२९, १३ नोव्हेंबर २००९ (UTC)

मला एक प्रश्न पडला आहे कि Divisional commissioner आणि महानगर पालिका आयुक्त एकच आहेत का Divisional commissioner म्हणजे collector.
Divisional commissioner -विभागीय आयूक्त (हे वेगळे पद आहे मराठवाडा , विदर्भ असे मिळून विभागातील राज्यशास्सनाच्या प्रशासनाच्या यंत्रणेतील विभागईय स्तरावरचे अत्यंत महत्वपूर्ण पण सहसा माध्यम प्रसिद्धी पासून् दूर रहात आलेले पद collector. पेक्षा सिनीयर))
collector.-जिल्हाधीकारी
Municipal Commissioner - महानगर पालिका आयुक्त ( कन्फूजनचे कारण एकाच व्यक्तिकडे काही वेळा एका पेक्षा अधीक पदांच्या जाबाबदार्‍या असतात.)
चुकभूल देणे घेणे माहितगार १६:३२, १३ नोव्हेंबर २००९ (UTC)

(१)राज्याचे विभाग:राज्य शासनाने राज्याच्या Administration साठी ह्या divisions केलेल्या असतात.नागपूर विभाग,पुणे विभाग,.........इत्यादी. विभागीय आयुक्त (Divisional Commissioner) हे त्या त्या विभागाचे प्रमुख असतात. जसे-नागपूर विभाग: या विभागांतर्गत नागपूर,वर्धा,यवतमाळ,भंडारा,चंद्रपूर, गडचिरोली हे जिल्हे येतात. त्या त्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी(collector) हे त्या त्या जिल्ह्यांचे प्रमुख(Boss) असतात. या सर्व 'जिल्हाधिकार्‍यांचे' प्रमुख (Boss)म्हणजे त्या विभागाचे विभागीय आयुक्त.

(२)महानगर पालिका आयुक्त(Municipal Commissioner) हे वेगळे. प्रत्येक गावाच्या /महानगराच्या देखभालीसाठी Local bodies असतात(स्थानिक स्वराज्य संस्था). नगर परिषद/नगरपालिका/महानगर पालिका इत्यादी. कोणती स्वराज्य संस्था(नगर परिषद/नगरपालिका की महानगर पालिका) हे त्या गावाच्या/नगराच्या लोकसंख्येवर अवलंबुन असते. त्यांचे काम गावाची/नगराची/महानगराची देखभाल हे असते. स्वच्छता राखणे,दिवाबत्ती,नागरिकांचे आरोग्य,पाणीपुरवठा,नगराचे/गावाचे नियोजन इत्यादी. मुंबई/पुणे/ठाणे/नागपूर........ ही महानगरे होत.या महानगराच्या गठित महानगर पालिकेचे आयुक्त हे महानगर पालिका आयुक्त एखाद्या छोट्या गावात त्याच्या लोकसंख्येच्या आधारावर नगर परिषद असु शकते.त्या नगरपरिषदेचे मुख्य हे मुख्याधिकारी असतात.



या सरकारी संकेतस्थळावर,(सरकारी गतीने थोडे हळु उघडते.धीर धरावयास हवा.) 'विभागीय आयुक्त' बद्दल अधिक माहिती हवी असल्यास मिळु शकते.

खुलासा न झाल्यास पुन्हा सांगा.मग विस्तृत माहिती देइल. V.narsikar ०७:२२, १३ नोव्हेंबर २००९ (UTC)


१७:०१, १३ नोव्हेंबर २००९ (UTC)

व्वारे डॉन आ गया डॉन ! (व्वारे शेर आ गया शेर ! च्या धर्तीवर)

वि. नरसीकर (चर्चा) ०८:१५, २३ फेब्रुवारी २०१० (UTC)

२०१० भारतीय प्रीमियर लीग

[संपादन]

मनोजच्या म्हणण्यात मुद्दा आहे खरा. विशेषनामे सहसा भाषांतरित करू नये असा येथील शिरस्ता आहे. पण पूर्वी केलेली पाने पाहिल्यास भारतीय प्रिमीयर लीग नावही ठीक वाटते.

अभय नातू ०६:४०, १२ मार्च २०१० (UTC)


सूचना:

तुमच्याकरिता कुणी वाफाळलेला चहाचा कप भरला आहे .


कृपया ब्रिटिश व मेट्रिक पद्धतींची तुलना‎ हा लेख बघा. या लेखातील साचे मला मराठीत बनवुन हवे आहेत. ईंग्रजी साचे वापरलेत तर इंग्रजी आकडे दिसतात.यात आपण सवडीनुसार मदत करु शकाल काय्? आधीच धन्यवाद देतो.यातील काही साचे काल आपण बनविलेले दिसले.

वि. नरसीकर (चर्चा) ०२:२६, २० एप्रिल २०१० (UTC)

२०१० इंडियन प्रीमियर लीग

[संपादन]

आपण २०१० इंडियन प्रीमियर लीग या लेखावर बरीच मेहनत घेत आहात त्यामुळे तो लेख सर्वांगसुंदर होत आहे. वि. नरसीकर (चर्चा) ०६:४३, २० एप्रिल २०१० (UTC)

धन्यवाद. बघतो व कळवितो. वि. नरसीकर (चर्चा) ०९:१३, २० एप्रिल २०१० (UTC)

पूर्वीच अभिनंदन

[संपादन]

आपली प्रचंड गतीनी २०,००१व्या लेखाकडे वाटचाल सुरु आहे.तो टप्पा आपण लवकरच गाठाल.आपले पूर्वीच अभिनंदन करतो.आपले योगदान मराठी विकिपिडियासाठी बहुमुल्य आहे असे मी वैयक्तिकरित्या समजतो.बढे चलो! माझ्या हार्दिक शुभेच्छा पूर्वीच देतो.

वि. नरसीकर (चर्चा) ०३:५५, २० मे २०१० (UTC)

लेख पहावा

[संपादन]

नमस्कार, तुम्ही केदार जाधव नावाचा नवा लेख दि. २६-मार्च-२०१० ला तयार केल्याचे दिसले. त्यात काही माहिती नसल्याने आणि मराठी लेखावरून इंग्रजी लेखाकडे दुवा जोडला असल्याने तिकडे वळलो पण तो लेख तेथून काढला असल्याचे दिसले. मराठीतील लेखास वर्ग नसल्याने याविषयी तुम्ही काही करू शकाल, जास्तीची माहिती लिहू शकाल असे वाटल्याने कळविले आहे. Gypsypkd ०८:२३, २९ मे २०१० (UTC)

माहितीचौकट

[संपादन]

साचा:माहितीचौकट विमानतळ तत्परतेने करुन दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

वि. नरसीकर (चर्चा) ०६:११, ७ जून २०१० (UTC)

आभार

[संपादन]

आज विकिवर माझे एक वर्ष पूर्ण झाले.सात हजार संपादनांचा टप्पा गाठत आहे. आज/उद्या तो पूर्ण होईल. दररोज सुमारे १९.०१९ संपादनांच्या सरासरीने या ३६५ दिवसात संपादने पूर्ण केली आहेत.आपले,माहितगार, अभय व संकल्प यांचे वारंवार मार्गदर्शन लाभले त्यानेच हे शक्य झाले. साचा प्रकारात पारंगतता नव्हती. ते काम नुकतेच सुरु केले आहे.जमेल काही दिवसांनी.आपण वेगवेगळ्या साच्यात वारंवार मदतही केली. वेळोवेळी केलेल्या सहाय्याबद्दल व माझ्याप्रती दाखविलेल्या सदिच्छेबदल आपणा सर्व विकिकरांना मनःपूर्वक धन्यवाद.आपला लोभ आहेच. कायम ठेवावा ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा) ०६:४०, ९ जून २०१० (UTC)


थोडी तसदी देतो.साचा:भारतातील विमानतळ यात 'देशांतर्गत विमान वाहतुक' मधील Navbar मध्ये 'दाखवा' क्लिक केल्यावर नको असलेली अक्षरे येत आहेत.

साचा:Tnavbar-collapsible या पानावर झालेल्या गडबडीमुळे तसे दिसत असावे असा माझा कयास आहे.कृपया यावर आपला निष्णात हात फिरवुन ती त्रुटी आपल्या सवडीने दुर करावी ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा) ०६:५५, ९ जून २०१० (UTC)

स्पॅनिश j, पूर्व युरोपीय č

[संपादन]

नमस्कार,

सर्वप्रथम, तुम्ही तयार केलेले विश्वचषकात खेळणार्‍याफुटबॉल खेळाडूंच्या लेखांबद्दल कौतुक! असे निमित्त साधून झपाट्याने लेख वाढवण्याची संधी घ्यावी.

या लेखांतील शीर्षकांमध्ये माझ्या माहितीनुसार मी बदल/स्थानांतरण करीत आहे. त्यातील एक-दोन गोष्टी तुमच्या नजरेत आणून द्याव्याशा वाटल्या.

१. हिस्पॅनिक (स्पॅनिश, पोर्तुगीझ, इ) भाषांतील नावांत jचा उच्चार असा होतो -- Jose = होजे, Rojas = रोहास, इ.

२. पूर्व युरोपीय भाषांमध्ये (स्लोव्हेनियन, पोलिश, चेक, इ.) दोन c आहेत. जेव्हा c/C अक्षर वापरलेले असते तेव्हा त्याचा उच्चार स होतो. जेव्हा č अक्षर वापरलेले असते तेव्हा त्याचा उच्चार च होतो -- Brečko = ब्रेच्को, Ivanovič = इव्होनोविच, इ.

क.लो.अ.

अभय नातू २०:०७, १३ जून २०१० (UTC)

वर्गांची चुकीची नावे

[संपादन]

नमस्कार डॉन!

आपण सध्या फुटबॉल खेळाडूंचे काही वर्ग बनवून लेख त्या-त्या वर्गांत हलवल्याचे पाहिले (वर्ग:इंग्लंडचे फुटबॉल खेळाडु, वर्ग:देशानुसार फुटबॉल खेळाडु); परंतु त्यांत 'खेळाडू' असे शुद्धलेखन हवे. त्यामुळे वर्ग:देशानुसार फुटबॉल खेळाडू, वर्ग:इंग्लंडचे फुटबॉल खेळाडू या नावांचे वर्ग बनवून वर्गीकरण दुरुस्त करावे, अशी विनंती. संदर्भासाठी वर्ग:फुटबॉल खेळाडू या वर्गाचे लेखन व त्यातील अगोदरपासून अस्तित्वात असलेल्या वर्गांचे लेखन लक्षात घ्यावे. धन्यवाद!

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:०४, १४ जून २०१० (UTC)

लेखांना स्थानांतरित करता येते; पण वर्गांना स्थानांतरित करण्याची सुविधा मीडियाविकि या विकिपीडियाच्या पायाभूत सॉफ्टवेअरात नाही. सर्व लेखांचे योग्य लेखात वर्गीकरण करणे, हाच एकमेव आणि योग्य मार्ग उरतो. तूर्तास, बर्‍याच लेखांचे वर्गीकरण दुरुस्त करावयाचे असल्यास, तुम्ही एक घडीव पद्धत अवलंबू शकता : चुकीचा वर्गाचे वर्गीकरण योग्य नावाच्या/शुद्धलेखनाच्या वर्गात करा; त्यानंतर हळूहळू सर्व लेख चुकीच्या वर्गातून योग्य वर्गात हलवून सरतेशेवटी चुकीचा वर्ग उडवायला त्या वर्गावर साचा:पानकाढा विनंती चिकटवून ठेवा.
काही शंका असल्यास जरूर विचारा.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:३८, १५ जून २०१० (UTC)
वर्ग:विंबल्डन ओपन वर्ग बनवल्याचे पाहिले. हा वर्ग वर्ग:विंबल्डन खुली टेनिस स्पर्धा अशा नावाने बनवणे अधिक योग्य (व सोपे मराठी :) ) होईल, असे माझे मत आहे. मराठी वृत्तपत्रांमध्ये 'विंबल्डन खुली', 'फ्रेंच खुली' असे शब्दप्रयोग वापरात असल्याचे स्मरते. कृपया एकदा पडताळणी करून योग्य वाटल्यास बदल करावेत.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १२:३६, २४ जून २०१० (UTC)

फुटबॉल खेळाडू

[संपादन]

फिफा विश्वचषकातील खेळाडूंच्या याद्या असलेल्या लेखांत योग्य वाटले ते बदल केले आहेत.

अभय नातू २१:३५, १४ जून २०१० (UTC)

गौरव

[संपादन]
मराठी विकिपीडिया ज्ञानकोशात क्रीडाविषयक लेखांत मुबलक भर घातल्याबद्दल मी तुम्हाला हे गौरवचिह्न बहाल करीत आहे.
विशेषतः २०१० फिफा विश्वचषकाशी संबंधित माहितीत भरघोस वाढ केल्याबद्दल -- अभय नातू


अभिनंदन

[संपादन]

नमस्कार Maihudon,(माफ करा आपले नाव न कळल्याने तसेच लिहित आहे ,औरंगाबादचे का? आपण ,मी पण होतो पूर्वी,G.E.C.A.मध्ये ) विकिपीडियावर फिरता फिरता सहज लक्ष फुटबॉलवरील लेखांकडे गेले,आणि पहातो तर काय मॅच बाय मॅच ,सगळं काही लेटेस्ट अपडेटेड,खरच आपल्या कामाचे कौतुक करावेसे वाटले म्हणून ह्या ४ ओळी पाठवित आहे ,बाकी कामाचा उत्साह दांडगा आहे तो तसाच राहूद्या आणि अधिक जोमाने काम करण्यास शुभेच्छा.क.लो.अ.चे.प्रसन्नकुमार १२:५२, १६ जून २०१० (UTC)

साच्यांतील त्रुटींबद्दल

[संपादन]

नमस्कार डॉन! शुक्रवारापर्यंत तांत्रिक दोष शोधण्या/दुरुस्त करण्याच्या कामासाठी योग्य वेळ मिळेल की नाही, याबद्दल खात्री नाही. या शनिवारी थोडे काम करीन म्हणतो. तुम्हांला त्याबद्दल माहिती कळवेन.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:५४, २१ जून २०१० (UTC)

नमस्कार

[संपादन]

नमस्कार, मी चावडीवर आणि कौल विभागात प्रचालकपदासाठी विनंती केली आहे कृपया आपली प्रतीक्रिया कळवावी.धन्यवाद.செ.प्रसन्नकुमार ०४:४३, १२ जुलै २०१० (UTC)

शत‌शः आभार

[संपादन]

मी साचाःconvert बद्दल माझ्या मनाने काढलेले निष्कर्ष पूर्णतः चुकीचे होते. माझे concepts clear केल्याबद्दल आभार.तसेच short list व full list च्या संपादनासाठी कुठे जायचे तो दुवा उपलब्ध केल्यास बरे राहील.मी तेथे जायचा बराच प्रयत्न केला परंतु तो अपयशी राहीला.पुन्हा थोडा त्रास देत आहे.

दुसरे असे की, या प्रकारच्या साच्यांच्या अभ्यासासाठी Basic concepts असणारे एखादे पुस्तक किंवा संकेतस्थळ सुचवु शकाल काय?थोडा बघेन म्हणतो.

वि. नरसीकर (चर्चा) ०७:४०, १५ जुलै २०१० (UTC)

अलिकदील बदल मथळ्यातील नोंदी

[संपादन]

अलिकडीलबदल मथळ्यात सदस्यांना काही विशीष्ट गोष्टी सुलभकरण्याच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण बदल केले आहेत.आपले मत प्रार्थनीय आहेच

त्या शिवाय साचा:अलीकडील बदल लेख विनंत्या येथे मासिक सदर ,उदयोन्मूख लेख आणि प्रकल्प बावन्नकशीतील नोंदी संबधीत प्रकल्पाच्या सहमतीने, सहमती असलेले पुरेशी लेख नावे नसल्यास स्वतः प्रचालकांनी निर्णय घावयाचे अभिप्रेत आहे.

नवेलेख हवे/ भाषांतर हवे:/मराठी शब्द सुचवा हे तीन प्रकार शक्यतो साचा चर्चा:अलीकडील बदल लेख विनंत्या येथील सहमती नुसार घ्यावयाचे आहेत.

साचा:अलीकडील बदल लेख विनंत्या पान अती महत्वपूर्ण असल्यामूळे केवळ प्रचालकांकरिता सुरक्षीत केले आहे तर साचाचे चर्चा पान प्रवेशीत सदस्यांकरिता अर्ध सुरक्षीत केले आहे.

माहितगार ०७:५२, १६ जुलै २०१० (UTC)

दालन:क्रीडा

[संपादन]
दालनांमुळे मराठी विकिपीडिया वाचकाभिमूख होण्यास हातभार लागेल असे वाटते, आपल्या सवडीनुसार दालन:क्रीडा करिता काही करता आले तर पहावे असे नम्र विनंती आहे..
सोबतच वर विकिपीडियात अपेक्षीत usability initiative/vector रूप बदल सुसह्य व्हावेत या दृष्टीने [ ट्रांस्लेट विकित translatewikiवर] बरीच भाषांतरे पार पाडली आहेत. आपल्या सवडीनुसार जर usability initiative/vector काही भाषांतरे तपासता आली अथवा सुधारता आलीतर सहाय्य हवे आहे.
माहितगार ०८:२६, २८ जुलै २०१० (UTC)

मुत्तैया मुरळिदरन विषयी

[संपादन]

नमस्कार,मैहुडॉन,मी मुत्तैया मुरळिदरन च्या चर्चेत अधिक माहिती दिली आहे ती अवश्य पहावी:चर्चा:मुथिया मुरलीधरनचे.प्र.कुमार १२:०१, ३० जुलै २०१० (UTC)


साचे त्रूटी दूर करण्यात सहाय्य हवे

[संपादन]
आपण शब्दांचे विशीष्ट अर्थाकडे निर्देश करण्या करिता साचा:विअप, साचा:विशिष्ट अर्थ पहा , साचा:विशीष्ट अर्थ पहा या पैकी कोणताही एक साचा वापरता यावा अशी योजना केली आहे. म्हण्जे स्मृतीशेष{{विअप}} वगळा ,स्मृतीशेष{{विशिष्ट अर्थ पहा}} वगळा, स्मृतीशेष{{विशीष्ट अर्थ पहा}} वगळा असे लिहिले असता स्मृतीशेष[विशिष्ट अर्थ पहा]वगळा ,स्मृतीशेष[विशिष्ट अर्थ पहा] वगळा, स्मृतीशेष[विशिष्ट अर्थ पहा] वगळा असे दिसेल.
कदाचित हा साचा इतर साचात बदल करून घेतल्यामुळे वर्ग पानांवर वापरता येत नाही असे दिसते. तशी लगेच आवशयकता नाही पण असे का होते आणि टाळता आले तर बरे एवढेच.
आपण केलेल्या बदलांचा निश्चितपणे फायदाच होणार, पण मी वर माडलेली अडचण काहिशी वेगळी आहे वर्ग:विशिष्ट किंवा नवी शब्दसंज्ञा पान पहावे, या पानावर मी स्मृतीशेष{{विअप}} वगळा लावले आहे. स्मृतीशेष नंतर त्याच्या माथ्यावर केवळ महिरपी कंसच दिसतो त्यातील "विशीष्ट अर्थ पहा" हा शब्द समुह दिसेनासा होतो आणि नंतर वगळा हा श्ब्द दिसतो. माहितगार ०५:०२, १० ऑगस्ट २०१० (UTC)
वर्ग:भौतिकशास्त्र लेखात येणारे पारिभाषिक शब्द वर्ग:भौतिकशास्त्र/प्रतिशब्द पानावर नमुद केले आहेत तेथेच उपयोगाचा प्रयत्न करून पाहिला तेव्हा हा प्रॉब्लेम लक्षात आला होता.अशा आवश्यकता खूप कमी येणार आहेत त्यामुळे घाई नाही. माहितगार १०:५७, १० ऑगस्ट २०१० (UTC)

लेखात प्रयुक्त संज्ञा

[संपादन]

शब्दाचा विशेष संदर्भ/अर्थ छटा

[संपादन]
प्रयूक्त शब्द विशेष संदर्भ/अर्थ छटा
स्मृतीशेष cookies

इंग्रजी मराठी संज्ञा

[संपादन]
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी

साचा

[संपादन]
  • नमस्कार, मी q:साचा:व्यक्ती हा साचा (कॉपी करून) तयार केला. या पुढे हा साचा तेथील प्रत्येक लेखात लावायचा आहे. व्यक्ती असे {{}} कंसात लिहिले असता साचा दिसतो पण त्या समोर (असलेले पर्याय) कसे लिहावे हे कळले नाही. साचा प्रत्यक्ष वापरण्यासाठी काय करावे? तसेच तेथे अन्य दोन तीन नवीन साचे तयार केले आहेत तेही एकदा पहावे, विशेषतः त्यातील रंगसंगती जमली आहे का? Gypsypkd ११:१९, ९ ऑगस्ट २०१० (UTC)
  • नमस्कार, तुम्ही तातडीने साच्यावर काम केल्याचे पाहून खूप आनंद झाला. त्यात थोडा बदल करता आला तर पहा, जे लागू आहे तेच पर्याय दिसावे. मराठी विकितील माहिती चौकट साहित्यीक मध्ये आहे तसे. तसे झाले तर जी माहिती उपलब्द्ध असेल तीच लिहिता येईल आणि तेवढीच माहिती दिसेल. माझ्या विनंतीला तातडीने प्रतिसाद दिल्याबद्दल आभार. Gypsypkd ०४:५९, १० ऑगस्ट २०१० (UTC)
  • मी गेल्या १०-१५ मिनिटांपासून तुम्ही संपादीत करीत असलेली सर्व कामे पाहत होतो. तुमच्या कामाचा झपाटा पाहून थक्क झालो. नवीन साचा लिहून / लावून पाहिला. साचा लावल्यावर लेखाचे नाव दिसते, त्याखाली उर्वरीत माहिती लिहिण्यासाठी काय करावे? सगळी माहिती लेखात कॉपी पेस्ट करावयाची आहे का? तुम्ही एक उदाहरण म्हणून q:आशा भोसले या लेखात तसे केलेत तर बरे होईल. Gypsypkd ०८:३५, १० ऑगस्ट २०१० (UTC)
  • कृपया q:सदस्य चर्चा:Maihudon पहा. तातडीने मदत केल्याबद्दल आभारी आहे. Gypsypkd ०९:५१, १० ऑगस्ट २०१० (UTC)
सहज जमले तर , आपण विकिक्वोटवर साचा व्यक्तीवर काम करतच आहात, विकिक्वोटवर विकिपीडीयातील त्याच नावाच्या लेखाचा निर्देश करणारा q:साचा:विकिपीडिया आहे. विकिक्वोटवरील बहूसंख्य लेखातून व्यक्ती साचा वापरला जाण्याची शक्यता असल्यामुळे व्यक्ती साचातच q:साचा:विकिपीडिया ने मिळणारी सोय आंतर्भूत करता आलीतर कदाचित संपादकांकरिता ते अधिक सोईचे ठरेल.माहितगार १०:२३, १० ऑगस्ट २०१० (UTC)
छान झाले आहे , धन्यवाद आणि शुभेच्छा माहितगार १०:४९, १० ऑगस्ट २०१० (UTC)

लेखांमध्ये व साच्यांमध्ये मराठी मजकूरच भरावा

[संपादन]

नमस्कार! आपण खेळांविषयीच्या लेखांमध्ये माहितीचौकटी घालताना, (बहुधा इंग्लिश विकिपीडीयावरून आणलेली) थोडी इंग्लिश माहिती देवनागरी मराठीत न बदलता, तसेच ठेवत असल्याचे जाणवले (उदाहरणादाखल संदर्भ : रिकार्दो ओसोरियो लेखातील तुमचे ताजे संपादन). शक्यतो मराठी विकिपीडीयावरील लेखांमध्ये परभाषक नावे/लेखने कारणाशिवाय ठेवू नयेत. विशेषकरून लेखांमधील दृश्य नोंद मराठीत ठेवावी. ज्या माहितीच्या/नावांच्या मराठीतील अनुवादाविषयी खात्री नसेल, ती माहिती तूर्तास लेखात भरली नाहीत, तरी काही हरकत नाही. लेख उत्तरोत्तर जसे वाढत जातील, तसतशी ही माहितीही भरली जायची शक्यता आहे. मात्र आता मध्ये-मध्ये भरलेली इंग्लिश माहिती मराठीत कधी अनुवादली जाईल, याबद्दल काहीही सांगता येणार नाही (तुम्ही नमुन्यादाखल काही क्रीडाविषयक लेखांची इतिहासपाने पाहिलीत, तर असे दिसेल की, २००६/२००७ साली शेवटचे संपादन केलेले लेख एकदम २०१० साली संपादले गेले आहेत.). खेरीज मराठी विकिपीडियावर येणारा पाहुणा वाचक लेखातील माहिती मराठीत वाचायला येतो; इंग्लिश भाषेतून माहिती मिळवू पाहणारे लोक मराठी विकिपीडियावर न फिरकता, त्यांहून हजारपटींनी समॄद्ध असलेल्या इंग्लिश विकिपीडीयावरच थेट जातील, या गोष्टीचे आपण मराठी विकिकरांनी भान ठेवले पाहिजे. तात्पर्य : मराठी विकिपीडियावरील माहिती १००% देवनागरी मराठी वाचकाला समजेल अश्या पद्धतीने लिहिण्याची बांधीलकी आपण बाळगली पाहिजे.

अजून एक उपमुद्दा : तसेच मराठीतर भाषेतील संकेतस्थळाचा दुवा नोंदवताना त्या-त्या भाषेच्या मजकुराबद्दल वाचकांना पूर्वकल्पना देण्यासाठी त्या भाषेचे नाव कंसात नोंदवावे. या संकेतामागचे प्रयोजन असे की, मराठी विकिपीडियावर गृहित भाषा मराठी व गृहित लिपी देवनागरी असल्याने, अन्य भाषक मजकुराबद्दल त्या-त्या ठिकाणी स्पष्ट नोंद ठेवावी. उदाहरणादाखल आइंडहोवन लेखातील बाह्य दुव्यांवरील ताजे संपादन तपासावे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:२४, १६ ऑगस्ट २०१० (UTC)

धन्यवाद! मी आता इथून या साच्याचा उपयोग करत जाईन.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:४९, १९ ऑगस्ट २०१० (UTC)

एक विनंती

[संपादन]
आपण मराठी विकिपीडियातील अनुभवी आणि जाणते सदस्य आहात.मराठी विकिपीडियास नेहमीच प्रचालन कार्याची निकड असते त्यातही नवीन युजेबिलिटी इनिशिएटीव्ह अंतर्गत व्हेक्टर स्किन इंप्लिमेंटेशन हि येऊ घातले आहे. मराठी विकिपीडियावर हे काम तसेच इतर विवीध प्रचालकीय विशेषतः .जे एस आणि . css पानांच्या अनुषंगाने सुगमपणे चालण्याकरिता आपले योगदान महत्वाचे असु शकेल असा विश्वास आहे , म्हणून माझी विनंती योग्य वाटल्यास प्रचालकपदाकरिता आपण आपली विनंती कौल पानावर माडावी अशी इच्छा आहे.
या जबाबदारी बद्दल नरसिकरांनी सुद्धा विचार करावा असे मला वाटते तशी विनंती मी त्यांनासुद्धा करणार आहे आणि विकिपीडीया चावडीवर नविन प्रचालक सुचवणी विभागत हा मुद्दा मी मांडला आहे त्यास आता पर्यंत संकल्पजींचे अनुमोदन सुद्धा प्राप्त झाले आहे माहितगार ०८:२८, १७ ऑगस्ट २०१० (UTC)
सध्या प्रचालकांची संख्या ८ नाही, ७ निश्चित आहे. पण या सात पैकी कौस्तुभ सध्या सक्रीय दिसत नाहीत, श्रीहरींनी बर्‍याच दिवसांनी हजेरी लावण्यापुरतेच संपादन केले आहे, कोल्हापुरी आणि सुभाष राऊत यांचे योगदान मह्त्वपूर्ण असलेतरई मोजकेच या सज्ञेतच मोडते, अभय नातूंवरही रियल लाईफ कामांचा ताण वाढला आहे त्यामुळे वेळ देत असले देऊ इच्छित असलेतरी पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत हि वस्तुस्थिती आहे , राहता मी राहिलोतर व्यवसायिक कारणाने एकतर् येते दोन चार महिने माझे काम कमी होणे अपेक्षीत आहे त्या शिवाय मी माझे मर्यादीत सहाय्य हे क्ष्त्र निवडले आणि विकिच्या इतर सहप्रकल्प कार्यायतील कामातही वेळ द्यावयाचा आहे, राहता केवळ संकल्प रहात्तात,त्यांचा अधीकतम वेळ समोर दिसणारे वर्गीकरणाचा डोंगर आणि अशुद्ध लेखनाचे प्रश्न सोडवण्यात खर्च होतो, म्हणजे कुणी कामकरित नाही असे नव्हेतर सांगण्याचा मुद्दा असा कि संख्या मोठी दिसते आहे तेवढी ती मोठी नाही विकिपीडियाच्या सर्व पैलुंशी परिचित अधिक प्रचालक हातांची निश्चित गरज आहे..उलट इतर विकिंच्या मानाने आपला विकि प्रचालकपदाची बढती देण्यात बर्‍यापैकी कंझर्वेटीव्ह आहे असे म्हणावयास हरकत नाही.
शुद्धलेखन असेल तर बरे पडते हे खरेच पण तो प्रचालक अधिकारांकरिता मुलभूत क्रायटेरिया तेवढा मर्यादीत नाही, जसे कि छायाचित्रे वगळण्याचे मोठे काम बाकी आहे त्या शिवाय .आपण म्हणता तसे सध्या साच्यामध्ये येणार्‍या अडचणी तसेच विविध ब्राउजर्स मध्ये येणारे formating errors हि कामेहि पहाणे बरेच महत्वाचे आणि मागे पडत चालले आहे.त्यामुळे विकिपीडिया:कौल/प्रचालक येथे विनंती नोंदवण्याचा जरूर विचार करावा असे वाटते. माहितगार ०५:४७, १८ ऑगस्ट २०१० (UTC)

प्रचालकपद- ८ प्रचालक

[संपादन]

नमस्कार! आपण मांडलेले मुद्दे योग्य आहेत,पण ८ प्रचालकांपैकी किती लोकं सतत येत असतात? नेमके ३-४. आधी popularity नसल्यामुळे कमी सदस्य यायचे. सध्या सतत ओघ सुरु आहे. ते देखील नवोदित. ते रुळेपर्यंत चुकांचे/त्रुटींचे प्रमाण अधिक राहते. त्यामुळे अनेक कामे मागे पडलेली दिसत आहेत. मला वाटते, माहितगारांची विनंती रास्त आहे.त्याचा जरुर होकारार्थी विचार करावयास हवा.आपण सर्वे तसेही कामे करतच असतो.जमेल तसे योगदान करीतच असतो.पण इंग्रजी विकिच्या quality च्या आपण किती जवळ आहोत? फार दुरच ना ! ती नव्हे तर त्या क्वालीटी जवळ-जवळ पोचण्याचे उद्दीष्ट्य आपण ठेवावयास हवे. चला तर हो म्हणा.मी ही आहेच मागे मागे.येवढा गोवर्धन उचलायचा तर अधिक संख्येने मदत हवी नं !

वि. नरसीकर (चर्चा) ०६:४५, १८ ऑगस्ट २०१० (UTC)

आभार

[संपादन]

समर्थन कौल दिल्याबद्दल मनःपुर्वक आभार. वि. नरसीकर (चर्चा) ०५:३७, १९ ऑगस्ट २०१० (UTC)

स्टेडियम

[संपादन]

साचा :Infobox stadium यात : Expanded=विस्तारित आणि Architect=वास्तुशास्त्रज्ञ असे बदल कृपया करावेत ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा) ०३:४०, २० ऑगस्ट २०१० (UTC)

transliteration problem

[संपादन]

Yes, most of the Indian wikipedias may find themseves in this problem by 1st of Sept 2010. Malyalam Wikipedia is first to go over to new change I had an email discussion with one of their user , That I am giving for your ref. below but I think that is not sufficieant since there is one discussion here at usability discussion which shows malyalam wiki also was having the same problem. I think we will need to study and discuss this issue further. I am sure your technical background and intrest will help us माहितगार १४:०४, २७ ऑगस्ट २०१० (UTC)

Here you can obsrve Mediawiki Contributions at Malyalam Wikipedia by their Sysop Praveenp . contributions at usibility wiki
Please do try Usability:What's new, questions and answers#Why don't the scripts (monobook.js) and styles (monobook.css) work any more?
Following is discussion with one of the Malyalam Wikipedia user Mr. Shiju on email
Thanks for reminder, giving priority to translations at translate wiki for usability intiative dead line , not many translations remaining need to finish those first. Before I forget second most important thing about vector implementation what did ml wiki do to retain tranliteration facility. I suppose this is very important aspect to all Indian language wikis so may be you can forward the reply through mailing list too.
Will catch on this aspect positively by Mondya or so .
Thanks and Regards
Mahitgar

Mahitgar,

You don't need to do anything special for vector. Transliteration will work. You can check this by changing your skin to Vector.

But there is a small issue with the control box (देवनागरी) that was near search box. In the new interface, we don't have space to place it. So we have included the tip about this inside the search box itself, which roughly says Press CTRL+ M for Malayalam. See Malayalam Wiki to see how it look like.

The control box will work in other places (for example, main edit window) without any issues.

I suppose this is very important aspect to all Indian language wikis so may be you can forward the reply through mailing list too.


Thank you Shiju

"

mailing list

[संपादन]
Please do join this mailing list of usability wiki , We need to ask the same query on email too on this list so we will get more clear info. माहितगार १४:१४, २७ ऑगस्ट २०१० (UTC)

विकिपीडिया चर्चा:Input System#transliteration problem

[संपादन]
सर्वांच्या सोईकरिता चर्चा विकिपीडिया चर्चा:Input System#transliteration problem येथे हलवली आणि मेलींग लीस्टवरील षीजू अलेख आणि हिंदी विक्पीडीयाचे मयूर कुमार यांची चर्चा आणि मयूरकुमारांचे हिंदी विकितील योगदान पानाचा दुवाही दिला आहे. माहितगार ०६:०१, १ सप्टेंबर २०१० (UTC)

भाषांतर

[संपादन]

A क्रीडा is a physical activity or skill carried out under a publicly agreed set of rules, and with a recreational purpose: for competition, for self-enjoyment, to attain excellence, for the development of skill, or some combination of these. The difference of purpose is what characterises क्रीडा, combined with the notion of individual (or team) skill or prowess.

क्रिडा ही एक अशी शारिरीक गतिविधी किंवा कुशलता आहे जी लोकांनी सर्वमान्य केलेल्या नियमांद्वारे चालते व त्याचा उद्देश मनोरंजन करणे हा आहे:स्पर्धेसाठी,स्वयं-मनोरंजनासाठी,श्रेष्ठता गाठण्यासाठी,कुशलता विकसित करण्यासाठी किंवा या सर्वांची सरमिसळ.क्रीडेच्या उद्देशांमधील फरक वा गुणदोष हे यातील प्रत्येक व्यक्तिपरत्वे (किंवा संघापरत्वे) कुशलता किंवा हेतू मनात ठेउन करण्यामुळे उद्भवु शकतात.

Sport in Focus=क्रीडेवर एक प्रकाशझोत वि. नरसीकर (चर्चा) १३:२७, ३ सप्टेंबर २०१० (UTC)

क्रीडा दालन

[संपादन]
क्रीडा दालन प्रगती पथावर चांगले विकसीत होत आहे . शुभेच्छा ! माहितगार १४:३५, ३ सप्टेंबर २०१० (UTC)
दुजोरा. अभय नातू १५:०४, ३ सप्टेंबर २०१० (UTC)

क्रीडा दालन समन्यवयन

[संपादन]

नमस्कार! क्रीडा दालनाच्या पानावर अथवा विकिपीडिया:क्रीडा येथे समन्यवयनासाठी उपविभाग करून त्यात लेखनशैलीबद्दल मार्गदर्शन, उपयुक्त साचे या गोष्टी नोंदवाव्यात. बरेचसे साचे तुम्हांला महीत आहेतच. साचा:माहितीचौकट खेळाडू या सर्वसाधारण साच्याचाही उल्लेख आवर्जून करावासा वाटतो.

बाकी, दालन आकर्षक केल्याबद्दल अभिनंदन! त्यातील 'हे आपणांस माहीत आहे काय?' ही चौकट मराठीत ठेवता आल्यास उत्तम होईल!

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:१८, १० सप्टेंबर २०१० (UTC)

विकिपीडियाचा नवा चेहरा मोहरा

[संपादन]

विकिपीडियाचा नवा चेहरा मोहरा व्हेक्टर बद्दल प्रेस रिलीज पाठविण्याचा मानस आहे. विकिपीडिया:माध्यम प्रसिद्धी मजकुर येथे प्रेस रिलिजमध्ये सुयोग्य सुधारणा करण्यात सहकार्य हवे आहे.माहितगार ०७:५२, ६ सप्टेंबर २०१० (UTC)

सांगकाम्या

[संपादन]

माझा सांगकाम्या झोपला आहे (सॉफ्टवेर डिलीट झाले) पण परत नवीन तयार करीत आहे.

अभय नातू ०४:१६, ८ सप्टेंबर २०१० (UTC)

काम सुरू केले आहे - महिला टेनिस खेळाडू वर्गातील लेखातील विस्तार साचा बदलून विस्तार|टेनिस खेळाडू साचा घालीत आहे.
रिकाम्या ०५:५५, ८ सप्टेंबर २०१० (UTC)

विस्तार साचे

[संपादन]
विस्तार साचातच विस्तार कसा करावा याचे स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन करणारा दुवा असावा ,शिवाय लेखांच्या वर्गवारी नुसार आदर्श मांडणीक्रमाचा आराखडा अथवा आदर्श लेख निर्देशीत करता आलेतर पहावे असे वाटते. माहितगार ०६:१३, १० सप्टेंबर २०१० (UTC)

विक्शनरीवर साचा त्रूटी दुर करण्यात सहाय्य हवे

[संपादन]
विकिपीडिया:सजगता प्रकल्पावर आधारीत विक्शनरीवरील wikt:Wiktionary:सजगता साचा जसाच्या तसा चालू होऊ शकला नाही. काही साचे विषयक त्रूटी असावी त्रूटी दूर करण्यात सहाय्य हवे हि विनंती माहितगार १०:२८, १३ सप्टेंबर २०१० (UTC)

सहमती हवी

[संपादन]
Wikipedia Meetups करिता इंग्रजी विकिपीडियात सध्या "विकिपीडिया मिलन" असा शब्दप्रयोग केला आहे. मराठी विकिपीडियात सध्या विकिभेट असा शब्द प्रयोग आहे. सर्वांना अधीक सुगम आणि सुलभ शब्द प्रयोग कोणता वाटतो ते लवकरात लवकर नमुद करा कारण संबधीत पानांच्या शीर्षके लवकरात लवकर बनवणे जरूरी आहे माहितगार ०८:४३, १४ सप्टेंबर २०१० (UTC)

छायाचित्र दिसत नाही सहाय्य हवे

[संपादन]

Photo:Shaniwarwada, पुणे

नमस्कार, विकिपीडिया:विकिभेट/पुणे/निमंत्रण पानात छायाचित्र दिसत नाही आहे. इंग्रजी विकिपीडीयावरील पानात दिसते आहे पण मराठी विकिपीडियावरील पानात दिसत नाही आहे. काही सहाय्य देऊ शकल्यास पहावे हि विनंती माहितगार १०:५७, १४ सप्टेंबर २०१० (UTC)
सहय्याकरिता धन्यवाद

वर्ग : विस्तार विनंती

[संपादन]

सध्या मराठी विकिवरील लेखांची संख्या ३०,८२५ आहे व वर्ग:विस्तार विनंती मधील लेखांची संख्या १३,२४२ आहे म्हणजे जवळजवळ ४०%. सध्या वर्गातील लेखांना वर्गीकरणाची गरज आहे. सांगकाम्या रिकाम्या हे काम फार उत्तम रितीने तसेच जलद करत आहे. मी माझ्या समजुतीनुसार काही बदल रिकाम्या कडून करून घेतले आहेत. परंतु ह्या वर्गात असणार्‍या लेखांना वर्गीक्रुत करण्यासाठी सर्वांच्या सहभागाची गरज आहे. ह्याचा उपयोग जर पहायचा असेलतर दालन:क्रीडा मधील तुम्ही काय करू शकता हे सदर पहावे, इथे इच्छुक सदस्याला आपण एकाच ठीकाणी विस्तारण्या जोग्या लेखांबद्दल माहिती देउ शकतो. अश्या प्रकारे आपण ह्या वर्गीकरणाचा फायदा करून घेउ शकतो.

ह्या साठी सर्वांच्या आक्रमक सहभागाची गरज दिसते आहे

Maihudon ०६:३६, १५ सप्टेंबर २०१० (UTC) एकदम सहमत. - * अनेक लेख असे आहेत(वर्गःविस्तार विनंती मध्ये) ते कालांतरानी जवळपास पूर्ण झालेले आहेत.पण त्यातील साचा काढण्यात आला नाही. ही वैयक्तिक त्रुटी आहे.ती आधी दुर करावयास हवी.त्याने आकडा कमी होईल. - * काही लेख खरोखरीच १-२ वाक्याचे आहेत.ते पूर्ण करावयास हवे.त्यासाठी, लेखात इंग्रजी विकिचा दुवा टाकावयास हवा. तेथील लेख बघुन ते पूर्ण करता येउ शकतील वा त्यात भर घालता येउ शकेल. प्रत्येकास प्रत्येक विषयाचे आकलन असेलच असे नाही.पण तो भाषांतर नक्की करु शकेल. - * याबाबत माझे काय/कोणत्या प्रकारे सहाय्य हवे ते सांगा.ते काम करण्याचा मी प्रयत्न करील.सर्वांचाच विचार घ्यावा. तसे आपण सर्वांना कळविलेच आहे. - * त्यात धोरण म्हणुन ठरवावे व सर्वांनी काम सुरु करावे. त्याचा सहजच फडशा पाडत येईल.ते तितकेसे कठीण वाटत नाही. - * बॉट software बद्दल कोठे माहिती मिळेल तेही कृपया सांगावे.

- *दुसरे असे की अनेक पाने अवर्गीकृत आहेत.ते पण काम करावे लागेल. वि. नरसीकर (चर्चा) ०७:३९, १५ सप्टेंबर २०१० (UTC)

सुचना चांगली आहे. वस्तुतः ४०% आकडा डिसेप्टीव्ह आहे कारण तो केवळ विस्तार विनंती साचा लावलेल्या पानांबद्दलचीच आकडे वारी देतो. प्रत्यक्षात ९५% पेक्षाही अधीक पानात एकही परिच्छेद नाही या अर्थाने जवळपास सर्वच पानांना विस्ताराची आवश्यकता आहे.
आपल्या सुचनेप्रामाणे विस्तार विनंत्यांचे उपवर्गीकरण करता येईल, पण विषय/वर्गवार म्हणजेच एका अर्थाने प्रकल्पवार लेखनात आपल्या सारखे काही अपवादक संपादक मडळी सोडता किमान मराठी विकिपीडियावर विषयवार लेखन करण्याचा ट्रंड आतापर्यंत तरी कमी राहिल्याचे आढळून येते. कदाचित याचे कारण इंग्रजी विकिपीडियाप्रमाणे लेख चर्चा पानावरील प्रकल्पविषयमाहिती साचा कडून संपादक मडळी प्रकल्पांकडे वळतात आणि मग प्रकल्पवार/विषयवार लेखन आणि सुधारणेत हातभार लागतो असे मला वाटते.त्या दृष्टीने किमान ज्या विषयांकरिता प्रकल्प आहेत त्या विषयांचे चर्चा पानावर साचे लावणे प्रकल्पसाचे प्राधान्याने गरजेचे आहे त्याच प्रमाणे त्या विषय प्रकल्पातील विस्तार विनंत्यांचे उपवर्गीकरण पार पाडावे.आणि बाकी विषयांबद्दल १०० पेक्षा अधीक संपादने पार पाडणार्‍या सदस्याच्या कोणत्या विषयात काम अधीक आहे याचा अभ्यास करत प्रकल्प निर्मिती आणि उपवर्गीकरणे पुरवावीत आणि असे करत सर्व लेखांचे आपण म्हणता तसे वर्गीकरण पूर्ण होऊ शकेल का ते पहावे असे वाटते माहितगार ०७:२३, १५ सप्टेंबर २०१० (UTC)

प्रचालकपद

[संपादन]

डॉन, अभिनंदन आणि वाढीव जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळण्यासाठी शुभेच्छा.

अभय नातू ०१:२२, २४ सप्टेंबर २०१० (UTC)

प्रचालकपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन!
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:२६, २५ सप्टेंबर २०१० (UTC)
अभिनंदन, काही शंका अथवा अडचणी असल्यास आवर्जून नमूद कराव्यात माहितगार ०७:५२, २६ सप्टेंबर २०१० (UTC)

आभार

[संपादन]

हार्दिक अभिनंदन व आपण सर्वांनी निवडुन दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.असाच लोभ कायम ठेवा ही विनंती. वि. नरसीकर (चर्चा) ०३:१६, २४ सप्टेंबर २०१० (UTC)

वर्धमान

[संपादन]

नमस्कार!

कृपया वर्धमान या लेखाचे पुनर्निर्देशन महावीर कडे करावे ही विनंती.इंग्रजी विकिवर तसे केले आहे म्हणुन. वि. नरसीकर (चर्चा) ०९:३०, २८ सप्टेंबर २०१० (UTC)

वर्गीकरण

[संपादन]

कृपया येथे पहा.या पानावरील खेळ वा तत्संबंधी अवर्गीकृत वर्गांचे, आपल्या सवडीने वर्गीकरण करण्यास मदत करावी ही नम्र विनंती.

वि. नरसीकर (चर्चा) ०६:४०, १ ऑक्टोबर २०१० (UTC)

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००८

[संपादन]

या व अशा प्रकारच्या साच्यात कृपया 'मराठीतील वर्ग' टाकावा ही विनंती.त्याने लेखाचे आपोआप वर्गीकरण होईल.इतरांचा गोंधळ होउ शकतो.वि. नरसीकर (चर्चा) ०८:५२, ३ ऑक्टोबर २०१० (UTC)

अवर्गीकृत पाने

[संपादन]

कपया खालील खेळ विषयक लेखांचे वर्गीकरण करण्यास मदत करावी ही विनंती.माझे त्याविषयीचे ज्ञान तोकडे आहे-याने अवर्गीकृत पाने मधील लेख तेवढेच कमी होतील. कृपया आपल्या सवडीने हे काम करावे. घाई नाही.


वि. नरसीकर (चर्चा) ०९:१०, ३ ऑक्टोबर २०१० (UTC)

तात्पुरते पान

[संपादन]

महाराष्ट्र विधानसभा सदस्य/तात्पुरत पान या पानाचे काम झाले असेल तर हे वगळावे ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा) १३:३१, ५ ऑक्टोबर २०१० (UTC)

कृपया बदल करा

[संपादन]

२०१० राष्ट्रकुल खेळामधील तिरंदाजी – महिला रिकर्व्ह वैयक्तिक

वि. नरसीकर (चर्चा) ११:२५, २० ऑक्टोबर २०१० (UTC)


अभिनंदन

[संपादन]

माफ करा तुमचे अभिनंदन करण्यास उशीर झाला आहे. मी आजच माझ्या कामावर रुजू झालो आणि आपली निवड झाल्याचे पाहिले. मनःपूर्वक अभिनंदन. gypsypkd (चर्चा) १०:२२, २६ ऑक्टोबर २०१० (UTC)

Mumbai Wikipedia Meetup

[संपादन]

Wikipedia:Meetup/Mumbai

माहितगार ०८:३५, २७ नोव्हेंबर २०१० (UTC)

Don,

Where are you located? Can we meet some timme before Dec 13th?

अभय नातू १६:२१, २९ नोव्हेंबर २०१० (UTC)

It seems to be a major problem

[संपादन]

Dear Maihudon, Problem may be wide spread we dont know since most of the people would not know other ways to access marathi wikipedia and if they do not see they would not know where to report. I am also presently facing the same problem on Marathi Wikipedia , and Marathi Wiktionary, it is irrespective of browser I do have all updated browsers with me but same problem coming across browsers, Right now I am accessing it by deactivating Java from my Firefox browser.माहितगार १४:३५, १८ फेब्रुवारी २०११ (UTC)

विचीत्र समस्या!

[संपादन]

Hi, i am using Firefox or IE8 --प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) ०४:३४, २१ फेब्रुवारी २०११ (UTC)

शुभेच्छा

[संपादन]

नमस्कार डॉन,आपण खरोखरच संपादन मॅरेथॉनचे डॉन आहात, मराठी भाषादिनी संपादने करून उत्साहाने सहभाग नोंदवलात,आपल्याबरोबरीने धावणारे संपादनपटु भेटोत, आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो हि शुभेच्छा.माहितगार १९:४३, २७ फेब्रुवारी २०११ (UTC)

सहजच

[संपादन]

डॉन,

बरेच दिवसात आपले बोलणे नाही. तुम्ही क्रिकेट विश्वचषक लेखमालेला न चुकता रोज अद्ययावत करीत आहात हे पाहिले.

अभय नातू ०५:०६, ३ मार्च २०११ (UTC)

साचा

[संपादन]

क्षेपणास्त्र हा साचा बनवतो आहे पण काहीतरी घोळ होतो आहे. काय चुकते आहे ते पाहणार/सांगणार का? निनाद ०४:३६, १८ मार्च २०११ (UTC)

साचा:क्षेपणास्त्रे हे बनवले पण पानावर वापरले तर त्यात माहिती भरता येत नाहीये. ते {{{साचा:क्षेपणास्त्रे}}} असेच दिसत राहते. :( निनाद ०५:१६, १८ मार्च २०११ (UTC)
मला साचा बनवून नको होता तर तो कसा बनवायचा याची मदत हवी होती. मी प्रयत्न केला पण नक्की काय टप्पे घ्यायला हवे होते ते लक्षात आले नाही. पण हरकत नाही. निनाद २२:१४, १८ मार्च २०११ (UTC)

अंतिम सामना

[संपादन]

अंतिम सामन्याची माहिती भरली होती पण ती अभय ने "चर्चा" मध्ये पाठवली. तुम्हाला पुन्हा लेखामध्ये भरता येईल का? (वाटल्यास योग्य ते बदल करून......

प्रग्याण ओझा

[संपादन]

प्रज्ञान ओझा हे शुद्धलेखन मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांत बरोबर आहे. मराठीत त्याचा उच्चार प्र-द्-न्या-न होतो तर हिंदीमध्ये प्र-ग्या-न असा. तरी प्रज्ञान ओझा किंवा प्रग्यान ओझा (हिंदी उच्चार) असे पान ठेवून इतरांकडून पुनर्दनिर्देशन करावे.

अभय नातू ०४:३३, २८ जून २०११ (UTC)

=प्रज्ञान ओझा

[संपादन]

हिंदी-मराठी किंवा कुठल्याही भारतीय भाषांत प्रज्ञान असेच लिखाण होईल. जो तो आपाआपल्या उच्चाराप्रमाणे वाचेल. ज्ञचा पंजाबी-तेलुगू उच्चार अजूनही ज्‍ञ आहे, तर तो गुजराथ-बंगालमध्ये ग्ग असा ऐकू येतो. महाराष्ट्र आणि ही चार-सहा राज्ये सोडली तर ज्ञ चे उच्चारण बहुधा ग्य असे होते. क्ष हा उच्चार हिंदीच्या बहुतेक बोलींमध्ये ख होतो. लक्ष्मण तिथे आधी लखमन होतो आणि नंतर लखन. असाच प्रकार श, ष, स या अक्षरांचा होतो. बंगालीत श-ष-स या तिघांचा उच्चार श होतो आणि व-बंचा ब. उडिया भाषेत श-ष-स चा उच्चार स तर, असमीया भाषेत ख़(नुक्तावाला ख) होतो. त्याच भाषेत च-छंना स म्हणतात. मराठी विकिपीडियावर स्थानिक उच्चार का नकोत हे यावरून स्पष्ट होईल. परकीय शब्द मराठीत लिहिताना, ते अगोदरच मराठीत कसे लिहितात ते शोधावे, आणि तसेच लिखाण करावे, भले त्याचा उच्चार चुकीचा होत असला तरी. मराठीत तो परकीय शब्द आधी लिहिला गेलेला नसेल तर तो इंग्रजीत कसा लिहितात ते पहावे आणि त्या रोमन लिपीतल्या शब्दाचे मराठीकरण करून उच्चा्र करावा आणि तसेच लिहावे. इतर भाषा बोलणारे लोक आपली संस्कृती विसरत नाहीत, तर, मराठीभाषकांनी का विसरावी? इंग्रजीत भारतीय भाषांचे उच्चार कुठे बरोबर असतात? अगदीत हिंदीभाषकही मराठी शब्द चुकीचे उच्चारतात.

पंजाबीत सत्यवीर सत्वीर होतो, प्रकाश परकाश आणि परेड चे प्रेड. पंजाबी लिपीला पंजाबीत गुरमुखी (म्हणजे मराठीत गुराच्या तोंडातून बाहेर पडलेले शब्द--बहुधा, ज्ञानेश्वरांचा रेडा ज्या भाषेत बोलला असेल त्या भाषेची लिपी) म्हणतात, मराठी आणि अन्य भारतीय भाषांत गुरुमुखी. मराठी उच्चार अजिबात चुकीचा नाही, पण यदाकदाचित जर असलाच तरी मराठीत गुरुमुखी असेच लिहायला पाहिजे....J ०५:५४, २८ जून २०११ (UTC)


भारतीय संघाचा वेस्त इंडीज दौरा २०११

[संपादन]

लेखातील शुद्धलेखन दुरुस्त करण्याआधी तो लेख मी दुरुस्त मथळ्याखाली स्थानांतरित केला होता असे मला वाटते. काही चूक राहिली असेल तर सुधारावी. लेखातल्या तक्त्यांतले ‘ईंडीझ’ मला इंडीज करता आलेले नाही, कुणी जाणकाराने करावे....J ०७:३५, २८ जून २०११ (UTC)

Hello,

I think you should have a look at वर्ग:Speedy deletion requests, that contains many pages that should be deleted.

Regards

--Hercule २३:३३, ९ जुलै २०११ (UTC)

चावडी ध्येय आणि धोरणे - निमंत्रण
नमस्कार, Maihudon/जुनी चर्चा ३


चावडी ध्येय आणि धोरणेवर "मराठी विकीवर परकीय विशेष नामे कशी लिहावीत?" ह्या बाबतचे धोरण ठरवण्याचे काम सुरू आहे. ज्येष्ठ सदस्य श्री. जे ह्यांनी ह्या बाबतचे निर्देश आपल्या लेखाद्वारे चावडीवर मांडले आहेत. आम्ही आपणास सदर चर्चेत, सहभागी होण्याचे सादर निमंत्रण देत आहोत. आपणही ह्या बाबतच्या आपल्या प्रतिक्रिया/सूचना/मते/अपेक्षा चावडी ध्येय आणि धोरणेवर मांडून चर्चेत सहभागी व्हावे आणि हे धोरण ठरवण्याच्या कामी अमूल्य योगदान करावे ही विनंती. धन्यवाद !

राहुल देशमुख १८:०५, १८ जुलै २०११ (UTC)
आपणासी जे जे ठावें, ते दुसर्‍यांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन.

व्हारच्युअलायझेषण

[संपादन]

डॉन नमस्कार,

मराठी तिथीन त्याच्या बहुआयामी आभासाची (व्हारच्युअलायझेषण) ची योजना मी आखतो आहे. करिता दिलेले निवेदन आपण पहिलीच असेल. ह्या बाबत आपण आपले मते/सूचना कळवल्या तर त्या करिता मदत होईल आणि (हिंदू धर्म) आणि इतरही अनेक प्रकल्पांना त्याचा थेट फायदा/वापर घेता येईल. केळ्वावे. राहुल देशमुख ०६:३६, २ ऑगस्ट २०११ (UTC)

Invite to WikiConference India 2011

[संपादन]

Hi Maihudon,

The First WikiConference India is being organized in Mumbai and will take place on 18-20 November 2011.
You can see our Official website, the Facebook event and our Scholarship form.

But the activities start now with the 100 day long WikiOutreach.

Call for participation is now open, please submit your entries here. (last date for submission is 30 August 2011)

As you are part of Wikimedia India community we invite you to be there for conference and share your experience. Thank you for your contributions.

We look forward to see you at Mumbai on 18-20 November 2011


खालील प्रस्तावावर तुमचे मत हवे

[संपादन]

mw:Extension:TitleBlacklist हे एक्सटंशन मराठी विकिपीडियावर अलरेडी आहेच त्याच्या अनुषंगाने विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न#Blocking of article titles in roman script by anon and new users हा प्रस्ताव मांडला आहे. प्रस्तावावर तुमचे मत हवे आहे. धन्यवाद माहितगार १५:३१, ११ ऑगस्ट २०११ (UTC)


मस्त

[संपादन]

नमस्कार! आपले मराठी विकी वरील संपादने पाहून बरे वाटले ! अतिधाय मोहक स्वरूपाचे आपले लिखाण आहे. रचना खरच छान आहे. आपल्याकडून बरेच काही शिकता येईल ! धन्यवाद !

सागर:मराठी सेवक १४:४१, २९ सप्टेंबर २०११ (UTC)

नमस्कार

[संपादन]

कुठे आहात महाराज! आजकाल येथे येत नाहीत वाटते? सर्व ठिक-ठाक असेल अशी आशा करतो.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १५:०३, ९ ऑक्टोबर २०११ (UTC)

चाहते, इ

[संपादन]

डॉन,

बरेच दिवसांनी तुमचा संदेश पाहून आनंद वाटला. आता आलात तर थांबून थोडे क्रीडालेखांमध्ये मदत करणार ना?

सचिन तेंडुलकर लेखात त्याच्या शंभराव्या आंतरराष्ट्रीय शतकाची नोंद करावी म्हणून वाट बघत होतो....पुन्हा एकदा संधी हुकली. असो.

चाहते तर काय, आमचे अगणित आहेत. चाहतेही आणि चाहते सुद्धा :-D

अभय नातू ०५:२९, २५ नोव्हेंबर २०११ (UTC)

+१, तुम्हांला बघून बरे वाटले.
बाकी, मध्यंतरी तुमच्या आयडीवरून तुम्ही खरेखुरे डॉन आहात, असा गैरसमज कोण्या सदस्याच्या मनात उद्भवला होता. :)
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ११:५९, २६ नोव्हेंबर २०११ (UTC)

.

विकीपत्रिका सभासद नोंदणी ....!
नमस्कार, Maihudon/जुनी चर्चा ३

मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विकिपीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत.

पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल.

मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या माहिती आणि पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर.

कळावे - खबर्या (विकीपत्रिका)


Image licensing

[संपादन]

Hello Maihudon, I saw you are uploading pictures to the Marathi Wikipedia, like this one or this one without a clear source and license given. Please notice that on Wikimedia projects (if not stated otherwise, which is not the case for this wiki) only Free Content Licensed images are allowed. If images aren't under a free license (I'm pretty sure the ones listed above aren't) and/ or you aren't able to state the source, please delete them. Please enter up all missing sources and license tags for the images you uploaded and get the ones you can't do that for deleted, thanks. Further information - Hoo man (चर्चा) ०२:०१, २१ मे २०१२ (IST)[reply]

Great to see that you deleted the two pictures I've listed above. Please make sure to recheck all your other uploads as well, cause I see many images there, which aren't suitable for Wikimedia projects (yet alone cause many lack an exact source). - ०४:५६, २३ मे २०१२ (IST)
I just noticed, that it wasn't you, who deleted the pictures, but you or Mahitgar (who deleted the listed pictures, if he wishes to do so) should still review your other uploads - Hoo man (चर्चा) ०५:०९, २३ मे २०१२ (IST)[reply]

शुद्धलेखन उत्पात

[संपादन]

नमस्कार,

आपण म्हणता तसे आपण मांडलेल्या उदाहरणावरच माहिती गोळा करून त्याचे विश्लेषण मी उद्यापर्यंत करणार होतो/आहे. पण तत्पूर्वी आपण दिलेल्या संदेशाबद्दल थोडा आगावू खुलासा करतो.

<<<<<जर उदाहरणासाठी पाहिले तर तुम्हाला दिसुन येईल कि अनेक विधानसभा मतदारसंघांचे शुध्दलेखन झाले आहे, ज्या मुळे अनेक मतदार संघांचा दुवा लाल झालेला आहे.

उदाहरण -

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ या लेखात मला एकूण ३४ (फक्त विधानसभा मतदारसंघ) लाल दुवे आढळून आले. त्यातच आपण आत्ताच्या संदेशात उल्लेख केलेल्या दुव्याविषयी -

बोरीवली विधानसभा मतदारसंघ हे पान निर्माण केले सदस्य:Maihudon यांनी त्यानंतर नावासंदर्भात/नावाच्या शुद्धलेखनासंदर्भात वा आपण म्हणता तशी माहिती गहाळ होण्यासंदर्भातही कोणी त्यात हस्तक्षेप केलेला दिसत नाही. पुरावा येथे पाहा.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ >> निकाल >> विभागानुसार >> मुंबई शहर आणि उपनगर यात दिसणारा बोरिवली विधानसभा मतदारसंघ हा लाल दुवा पहिल्यापासून आहे तसाच आहे तो शुध्दलेखना नंतर लाल झालेला नाही. *पुरावा येथे पाहा.

त्यामुळे यात शुद्धलेखन उत्पाताचा विषयच येत नाही. असो. असेच बाकीच्या लाल दुव्यांविषयीही विश्लेषण देतो.

-संतोष दहिवळ (चर्चा) ००:११, २५ मे २०१२ (IST)[reply]

एक विनंती

[संपादन]

नमस्कार, अमराठी लोकांपर्यंत मराठी विकिपीडियाच्या अत्यावश्यक धोरणांबद्दल मार्गदर्शन / माहिती पोहोचवणे गरजेचे भासते आहे. त्या दृष्टीने संपादन गाळक प्रभावी करण्याचे काम चालू आहे.याचाच भाग म्हणून , बॉट फ्लॅग न घेतलेल्या बॉट्सचे वर्गीकरण आणि Babel द्वारे मराठी न येणाऱ्या लोकांचे वर्गीकरण अशी दोन कामे आहेत. आपल्याकडे सवड असल्यास एक विनंती आहे. अमराठी लोक सहसा {{Babel|de|ru-4|en-2|fr-1|mr-0}} साचा त्यांच्या सदस्य पानात लावताना mr-0 म्हणजे मराठी येत नाही असे नोंदवत असतात. त्याचे User mr-0 असे वर्गीकरण व्हावयास हवे तसे ते होत नाही आहे . तसे वर्गीकरण केल्यास हि सर्व मंडळी एकाच वर्गिकरणात सापडतील घाई नाही सवडीनुसार जमेल तसे सहाय्य करावे हि नम्र विंनंती.माहितगार (चर्चा) ०८:०७, २७ मे २०१२ (IST)[reply]

Article requests

[संपादन]

Hi! Do you do article requests in Marathi? If so, there is an article I would like to have written in Marathi. Thank you WhisperToMe (चर्चा) ०९:४८, २८ मे २०१२ (IST)[reply]

स्टेडियम

[संपादन]

साचा:Infobox Stadiumसाचा:माहितीचौकट स्टेडियम हे दोन साचे एकत्रित करावेत काय? - अभिजीत साठे (चर्चा) ०७:०९, ९ जून २०१२ (IST)[reply]