Jump to content

विकिपीडिया:माध्यम प्रसिद्धी मजकूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विकिपीडिया:माध्यम प्रसिद्धी मजकुर या पानावरून पुनर्निर्देशित)

विकिपीडियाचा नवा चेहरा मोहरा

[संपादन]

आंतरजालावरील विश्वप्रसिद्ध विकिपीडिया मुक्तज्ञान कोश संकेतस्थळास,सुलभता उपक्रमांतर्गत नवा चेहरा-मोहरा प्राप्त झाला आहे. अमेरीकेतील स्टँटॉन फाऊंडेशनने दिलेल्या देणगीतून, विकिपीडीयाचे वाचक आणि संपादकांना विकिपीडिया वापरण्यास अधिक सुलभता प्राप्त व्हावी म्हणून एक उपक्रम राबविण्यात आला. त्यात, 'व्हेक्टर' नावाच्या नवीन यूजर इंटरफेसची अंमलबजावणी १ सप्टेंबर २०१० पासून मराठी विकिपीडिया आणि विकिपीडियाच्या सर्व भाषी सर्व सहप्रकल्पातून पूर्ण केल्या गेली. या नवीन यूजर इंटरफेसचे मराठीकरण मराठी विकिपीडिया सदस्यांनी अहोरात्र काम करून पूर्ण केले आहे. त्यामुळे केवळ मराठी विकिपीडियाच नाही, तर इंग्रजी, हिंदी अथवा जगातील कोणत्याही भाषेतील विकिपीडियास भेट देताना, विकिपीडियाचे वाचक मराठीतून नॅव्हीगेट (सुचालन) करू शकतील.

मराठी विकिपीडियातील ध्वन्यात्मक (फोनेटीक) देवनागरी लेखनाची सुविधासुद्धा सुरळीत केल्या गेली आहे. ही व्यवस्था पुन्हा सुरळीत करून देण्याकरिता लागणार्‍या आज्ञावली लेखनात तमीळ, मल्याळम आणि हिंदी भाषांच्या विकिपीडीया सदस्यांनीसुद्धा मोलाचे सहकार्य मराठी विकिपीडियास देऊ केले.एकमेकांना सहकार्य करीत एकत्रितपणे लेखनकार्य करणे हे विकिपीडिया संस्कृतीचे नेहमीच द्योतक ठरत आले आहे.

विकिपीडियाने भारतातील तसेच जगातील सर्वाधिक भेट दिल्या जाणार्‍या पहिल्या दहा संकेतस्थळात आपले स्थान अबाधित केले आहे. अशा विश्वाचे स्वप्न पहा, की ज्यात, प्रत्येक मनुष्यमात्र संपूर्ण ज्ञानाच्या गोळाबेरजेत 'मुक्तपणे देवाणघेवाण' करू शकेल असे विकिपीडियाचे एक घोषवाक्य आहे. अशी बांधीलकी जपणारा विकिपीडिया हा वाचकांनीच एकत्रितपणे इंटरनेट वर संपादित केलेला मुक्‍त ज्ञानकोश म्हणून आंतरजालावर सुपरिचित आहे.


नवीन वैशीष्ट्ये

विकिमिडिया फाउंडेशनची ’सदस्य अनुभव चमू (यूजर एक्सपिरीयन्स टिम)’ ही आपणास काम करणे सोपे व्हावे म्हणून विकिसमाजातील स्वयंसेवकांसमवेत काम करीत आहे. आपल्यासमवेत, नवीन चेहरामोहर्‍यासह व सोप्या संपादन तोंडवळ्यासह काही सुधारणा आदानप्रदान करण्यास आम्ही आतुर आहोत. नवीन सदस्यास सुरुवात करण्यास अभिप्रेत हे बदल त्यांना सोपे पडतील. ते मागील वर्षी करण्यात आलेल्या विकिपीडिया वापरकर्त्यांच्या चाचणीवर (usability testing conducted over the last year) आधारित आहेत. आमच्या प्रकल्पांचा वापर (कोणासही)सोप्या पद्धतीने करता यावा ही विकिमिडिया फाउंडेशनची प्राथमिकता आहे आणि भविष्यात आम्ही यात आणखी अद्ययावतता आणून ती आपल्यासह आदानप्रदान करु. अधिक विस्तृत माहितीसाठी विकिमिडियासंबंधित (येथे संकेतस्थाळाचे पूर्ण नाव हवे)blog post या संकेतस्थळास भेट द्या.


विकिपीडियात काय बदलले आहे?

  • सुचालन: पाने वाचण्यास व संपादण्यास सोपे जावे म्हणून आम्ही काही सुधारणा केल्या आहेत. सध्या, प्रत्येक पानाच्या वरचे बाजूस असलेली ’टॅब’ ही जास्त स्पष्टपणे हे दर्शविते की, आपण तेच पान पहात आहात की त्याचे चर्चापान आणि आपण ते पान वाचत आहात की संपादन करीत आहात.
  • संपादन साधनपट्टीतील सुधारणा: आम्ही वापरात अधिक सुलभता मिळावी म्हणून संपादन साधनपट्टी ची पुनर्रचना केली आहे. पानांची रचना करणे अधिक सुगम आणि सोपे झाले आहे.
  • दुवे सहाय्यक: इतर विकिपानांना आणि बाह्य दुवे देण्याकरिता वापरास सोपे असे साधन तुम्हाला अधिक सुलभता उपलब्ध व्हावी म्हणून उपलब्ध केले आहे.
  • शोध सुधारणा: तुम्ही शोधत असलेले लेख/पान लवकर मिळण्याकरिता आम्ही शोध सुचवणीत सुधारणा केल्या आहेत.
  • इतर नवीन वैशिष्ट्ये:सारणी (टेबल) सोपी करण्यासाठी आम्ही आता एक नवीन सारणी (टेबल) सहाय्यक उपलब्ध केला आहे आणि संपादनांमध्ये सुलभता आणण्याकरिता शोधा आणि बदला (फाइंड एंन्ड रिप्लेस)वैशिष्ट्यसुद्धा उपलब्ध केले आहे.
  • विकिपीडिया लोगो: आम्ही आमचा लोगो अद्ययावत केला आहे. (येथे संकेतस्थाळाचे पूर्ण नाव हवे)Wikimedia blog येथे अधिक वाचा.
  • पहारा कळ (टॅब) आता एक तारा आहे.
  • स्थानांतरण कळ (टॅब) आता शोधपेटी पुढील अधोदर्शक बाणात ( ड्रॉपडाऊनमध्ये) आहे .