Jump to content

डिंपल कापडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Dimple Kapadia (es); Dimple Kapadia (ms); ډمپل کپاډيا (ps); Димпъл Кападия (bg); Dimple Kapadia (tr); ڈمپل کپاڈیہ (ur); Dimple Kapadia (sv); Дімпл Кападія (uk); Dimple Kapadia (ace); 蒂普·卡柏迪亞 (zh-hant); Dimple Kapadia (mul); Dimple Kapadia (uz); ডিম্পল কপাড়িয়া (as); Dimple Kapadia (map-bms); डिंपल कपाड़िया (bho); ডিম্পল কপাড়িয়া (bn); Dimple Kapadia (fr); Dimple Kapadia (jv); डिंपल कापडिया (mr); ଡିମ୍ପଲ କାପାଡ଼ିଆ (or); Dimple Kapadia (pt-br); Dimple Kapadia (nn); Dimple Kapadia (nb); Dimpl Kapadiya (az); Dimple Kapadia (min); Dimple Kapadia (gor); Dimple Kapadia (en); ديمبل كاباديا (ar); Dimple Kapadia (hu); ડિમ્પલ કાપડિયા (gu); Dimple Kapadia (eu); Dimple Kapadia (ast); دیمپل کاپادیا (azb); डिम्पल कपाडिया (mai); Dimple Kapadia (sq); Դիմպլ Կապադիա (hy); 蒂普·卡柏迪亞 (zh); Dimple Kapadia (da); डिम्पल कपाडिया (ne); ディンプル・カパディア (ja); Dimple Kapadia (tet); ديمبل كاباديا (arz); דימפל קפאדיה (he); डिम्पल कपाड़िया (hi); ᱰᱤᱢᱯᱚᱞ ᱠᱟᱯᱚᱫᱤᱭᱟ (sat); ਡਿੰਪਲ ਕਪਾਡੀਆ (pa); டிம்பிள் கபாடியா (ta); Dimple Kapadia (it); Dimple Kapadia (pt); Димпл Кападия (ru); Dimple Kapadia (bjn); Dimple Kapadiová (cs); Dimple Kapadia (sl); Dimple Kapadia (fi); دیمپل کاپادیا (fa); Dimple Kapadia (ga); Dimple Kapadia (id); Dimple Kapadia (pl); ഡിംപിൾ കപാഡിയ (ml); Dimple Kapadia (nl); Dimple Kapadia (bug); డింపుల్ కపాడియా (te); Dimple Kapadia (de); ڈمپل کپاڈیا (pnb); Димпл Кападия (tg); 딤플 카파디아 (ko); Dimple Kapadia (su); Dimple Kapadia (ca) actriz india (es); ભારતીય અભિનેત્રી (gu); aktore indiarra (eu); actriz india (ast); actriu índia (ca); actores (cy); ban-aisteoir Indiach (ga); بازیگر هندی (fa); 印度女演員 (zh); indisk skuespiller (da); actriță indiană (ro); indisk skådespelare (sv); שחקנית הודית (he); ҳунарпешаи ҳинд (tg); भारतीय अभिनेत्री (जन्म: 1957) (hi); భారతదేశ నటి, హిందీ చిత్రాల్లో ప్రముఖంగా నటించింది. (te); ਭਾਰਤੀ ਫਿਲਮੀ ਅਦਾਕਾਰਾ (pa); Indian actress (en-ca); indická herečka (cs); இந்திய நடிகை (ta); attrice indiana (it); ভারতীয় অভিনেত্রী (bn); actrice indienne (fr); India näitleja (et); Indian actress (en); actriz indiana (pt); actriz india (gl); indisk skuespiller (nb); indische Schauspielerin (de); индийская актриса (ru); pemeran asal India (id); indisk skodespelar (nn); ഇന്ത്യന്‍ ചലചിത്ര അഭിനേത്രി (ml); Indiaas actrice (nl); aktorka indyjska (pl); індійська акторка (uk); Hint aktris (tr); Indian actress (en-gb); Indian actress (en); ممثلة هندية (ar); ଭାରତୀୟ ଅଭିନେତ୍ରୀ (or); intialainen näyttelijä (fi) Dimple Chunnibhai Kapadia (ms); डिंपल चुनीभाई कापडिया, डिम्पल कापडिया (mr); ଡିମ୍ପଲ କପାଡ଼ିଆ (or); Dimple kapadia, Dimple Chunnibhai Kapadia (id); Dimple Kapadia (cs); Dimple Kapadia (ml)
डिंपल कापडिया 
Indian actress
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावDimple Kapadia
जन्म तारीखजून ८, इ.स. १९५७
मुंबई
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९७३
नागरिकत्व
व्यवसाय
भावंडे
  • Simple Kapadia
अपत्य
वैवाहिक जोडीदार
उल्लेखनीय कार्य
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

डिंपल चुन्नीभाई कापडिया (जन्म ८ जून १९५७)[] एक भारतीय चित्रपटअभिनेत्री आहे. वयाच्या १६व्या वर्षी राज कपूर यांच्या " बॉबी (१९७३) चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्याच वर्षी तिचा राजेश खन्ना यांच्याशी विवाह झाला आणि डिंपलने अभिनयापासून फारकत घेतली. १९८४ मध्ये राजेश खन्नापासून विभक्त झाल्यावर ती पुन्हा अभिनयाकडे वळली. नंतर आलेल्या "सागर" (१९८५) चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.[]

मादक सौंदर्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या डिंपलने आपल्या अभिनयातील विविधता सिद्ध करण्यासाठी आपल्या चित्रपट निवडित अधिक चोखंदळता दाखवली.[] ती कालांतराने अधिक गंभीर भूमिकेंमध्ये प्रेक्षकांसमोर आली आणि समांतर सिनेमांकडे वळली. "काश" (१९८७), "द्रिष्टी" (१९९०), "लेकिन..." (१९९०) आणि "रुदाली" (१९९३) या समांतर सिनेमांमधील तिच्या भूमिकांसाठी तिची विशेष नोंद घेतली गेली. रुदालीसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा समिक्षक फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.[] १९९३ मध्ये आलेल्या गर्दिश मधील तिची सहाय्यक भूमिका लक्षणिय ठरली आणि "क्रांतीवीर" (१९९४) मधील तिच्या भूमिकेसाठी तिला चौथा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

डिंपलने १९९० आणि २००० च्या दशकांत अधूनमधून काही चित्रपटांमधून अभिनय केला. "दिल चाहता है" (२००१) आणि अमेरिकन निर्मिती असणाऱ्या लीला (२००२) चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेंमध्ये दिसली. त्यानंतर "हम कौन है" (२००४),"प्यार मे ट्विस्ट (२००५), "फिर कभी" (२००८), "तुम मिलो तो सही" (२०१०), "बिईॅंग सायरस" (२००५),"लक बाय चान्स" (२००९),"दबंग" (२०१०), "पटियाला हाऊस" (२०११) आणि "कॉकटेल" (२०१२) मध्ये सहाय्यक भूमिकेत दिसली.

कारकीर्द

[संपादन]

डिंपलला लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याचे स्वप्न होते आणि ती स्वतःला "चित्रपट वेडी" समजते. [] राज कपूरने तिच्या १३ व्या वर्षीच तिच्यातील अभिनय गुणांची दखल घेतली, आणि १९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या बॉबी सिनेमात एका तरुण युगुलप्रेमकथेत अभिनेत्री म्हणून जगासमोर आणले. तिने बॉबी ब्रिगेंझा नावाच्या मध्यमवर्गीय ॲंग्लो इंडियन मुलीची भूमिका केली होती, रिशी कपूरची प्रमुख भूमिका असणारा हा पहिलाच चित्रपट होता.[] "बॉबी" हा एक व्यावसायिकदृष्ट्या गाजलेला आणि टिकाकारांनी नावाजलेला चित्रपट होता. डिंपलच्या अभिनयाची विशेष दखल घेतली गेली आणि त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेर पुरस्कार डिंपलला जया भादुरीसोबत अभिमान चित्रपटासाठी विभागून दिला गेला. [] २००८ मध्ये, rediff.com ने प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षणात दमदार पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये डिंपल चौथ्या क्रमांकावर होती.

बॉबीच्या यशापाठोपाठ डिंपल तरुण वर्गाची एक फॅशन आयकॉन बनली. बॉबी प्रदर्शित होईपर्यंत डिंपलचा राजेश खन्ना बरोबर वयाच्या १६ व्या वर्षीच विवाह झाला होता आणि नंतर मुलांच्या संगोपनासाठी ती चित्रपटांपासून दूर गेली.

पुनर्पदार्पण (१९८४) आणि १९८० दशक

[संपादन]

राजेश खन्नापासून १९८२ मध्ये विभक्त झाल्यानंतर, तिने चित्रपट सृष्टीत परत येण्याचा विचार केला. पण या वेळी तिच्या अभिनयाचा कस लागणार होता.[] १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या रमेश सिप्पी यांच्या "सागर" मध्ये काम केले. सिप्पींच्या एका मित्राने डिंपल पुन्हा काम करण्यास उत्सुक असल्याचे त्यांना सांगितले. त्यांनी तिला स्क्रिन टेस्टसाठी बोलावले आणि ती पुन्हा अकदा रिशी कपूरसोबत रूपेरी पडद्यावर झळकली.[]

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ "'I want to laugh, really laugh!'". MiD DAY. 2007-06-08. 2011-09-19 रोजी पाहिले.
  2. ^ "The best of Dimple Kapadia". Rediff.com. 2010-06-08. 2011-01-03 रोजी पाहिले.
  3. ^ "Dimple Kapadia: The sensuous star". द टाइम्स ऑफ इंडिया. Indiatimes. 2005-08-31. 2012-09-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-09-18 रोजी पाहिले.
  4. ^ Miglani, Surendra (2003-10-05). "Parallel cinema". The Tribune. Spectrum. 2011-09-19 रोजी पाहिले. ...with movies like Kaash, Drishti, Lekin, Rudaali and Leela, she (Dimple) showed that off-beat films too are her forte.
  5. ^ a b c The Illustrated Weekly of India. The Times Group. 108 (27–38): 8. 1987. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ a b Raheja, Dinesh (2004-09-08). "Dimple: A Most Unusual Woman". Rediff.com. 2011-09-19 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]