Jump to content

के.डी. सेठना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
के.डी. सेठना
जन्म नाव कैखोसरू धनजीभॉय सेठना
टोपणनाव अमल किरण
जन्म २६ नोव्हेंबर, १९०४ (1904-11-26)
श्रीअरविंद आश्रम, पुडुचेरी
मृत्यू २९ जून २०११ (वय १०६)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र कवी, अभ्यासक, लेखक, तत्त्वज्ञ, संस्कृती-समीक्षक

कैखोसरू धनजीभॉय सेठना (२६ नोव्हेंबर, १९०४२९ जून, २०११) हे भारतीय कवी, विद्वान, लेखक, तत्त्वज्ञ आणि सांस्कृतिक समीक्षक होते. त्यांनी ५० हून अधिक पुस्तके प्रकाशित केली. ते केकू या नावाने ओळखले जात असत तसेच अमल किरण या टोपणनावाने ते लेखन करत असत. []

बालपण

[संपादन]

सेठना यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९०४ रोजी मुंबईत पारशी कुटुंबात झाला. त्यांचे वडील डॉक्टर आणि नेत्रचिकित्सक होते.

युवावस्था आणि शिक्षण

[संपादन]

सेठना यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण सेंट झेवियर्स महाविद्यालयात घेतले. इंग्रजी ही जणू मातृभाषाच असल्यासारखे त्यांचे सारे शिक्षण झाले. घरात बोलल्या जाणाऱ्या पारसी गुजराती भाषेत ते अस्खलितपणे बोलू शकत नसत. त्यांनी आपल्या साहित्यिक कारकिर्दीला फार लवकर सुरुवात केली, वृत्तपत्रे आणि मासिकांमध्ये पुस्तकांची त्यांनी केलेली परीक्षणे प्रकाशित होऊ लागली. १९२४ मध्ये पारनासियन्स नावाचे त्यांचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले. एचजी वेल्स, जॉर्ज बर्नार्ड शॉ, गिल्बर्ट कीथ चेस्टरटन आणि थॉमस हार्डी यांच्या साहित्यावरील निबंधांचा हा संग्रह होता. []

सेठना यांचा आध्यात्मिक प्रवास

[संपादन]

महाविद्यालयीन विद्यार्थी असताना, सेठना यांनी हठयोग आणि राजयोग आणि विशेषतः स्वामी विवेकानंदांची पुस्तके वाचण्यास सुरुवात केली. काही काळानंतर सेठना यांना एका थिऑसॉफिस्टकडून श्रीअरविंद यांच्याबद्दल माहिती मिळाली आणि त्यांनी श्री अरबिंदो आश्रमावरील एक लेख वाचला. लग्न झाल्यावर, आपल्या पत्नीसमवेत त्यांनी श्रीअरविंद आणि श्रीमाताजी ( मिरा अल्फासा ) यांना भेटण्यासाठी पॉंडिचेरीला जाण्याचा निर्णय घेतला. []

श्रीअरविंद आश्रमात प्रवेश

[संपादन]

सेठना आणि त्यांची पत्नी डिसेंबर १९२७ मध्ये आश्रमात आले. श्रीमाताजी आणि श्रीअरविंदांना भेटल्यानंतर, त्यांनी आपल्या पत्नीसह आश्रमात सामील होण्याचा निर्णय घेतला.पत्नीचे नाव बदलून "ललिता" ठेवण्यात आले. सेठना यांना श्रीअरविंद यांच्याकडून "अमल किरण" हे नवीन नाव मिळाले, ज्याचा अर्थ "शुद्ध किरण" असा आहे.

आश्रमात दाखल झाल्यानंतर त्यांना आश्रमवासीयांच्या विविध व्यावहारिक गरजा लक्षात घेऊन, आश्रम स्टोअर्सचे व्यवस्थापन करण्याचे काम देण्यात आले.

ते कविता करत असत आणि त्यावरील अभिप्राय जाणून घेण्यासाठी त्या कविता ते श्रीअरविंद यांच्याकडे पाठवीत असत. १९३६ मध्ये श्रीअरविंद यांनी त्यांचे सावित्री: एक आख्यायिका आणि एक प्रतीक हे महाकाव्य सेठना यांना टंकलेखनासाठी द्यायला सुरुवात केली. परिणामी, श्री अरबिंदो यांच्या आध्यात्मिक काव्यांवर दोघांमध्ये पत्रव्यवहार सुरू झाला.

१९३७ मध्ये सेठना आणि त्याच्या पत्नीचा घटस्फोट झाला आणि नंतर त्यांनी सेहरा नामक मुंबईतील पारशी मैत्रिणीशी लग्न केले. १९८० मध्ये तिचा मृत्यू होईपर्यंत ती त्यांची सोबती राहिली. []

मदर इंडिया

[संपादन]

१९४९ मध्ये आश्रमाने मदर इंडिया हे जर्नल सुरू केले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही स्तरावरील चालू घडामोडींवर श्रीअरविंदांच्या विचारांशी सुसंगत अशा दृष्टिकोनातून चर्चा करणे हा त्याचा उद्देश होता. सेठना यांची संपादक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांचे सर्व राजकीय लेख श्रीअरविंद यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवले जात असत. मात्र १९५० मध्ये श्रीअरविंद यांनी देह ठेवल्यानंतर मात्र राजकारणाला थेट स्पर्श न करण्याचा सल्ला त्यांना श्रीमाताजी यांनी दिला.

मदर इंडिया या मासिकामध्ये श्रीअरविंद आणि त्यांच्या योगावर आधारित लेखांखेरीज साहित्य, संस्कृती आणि कला क्षेत्रातील इतर अनेक विषयांचा समावेश असे. []

साहित्यिक लेखन

[संपादन]

मदर इंडियामधील त्यांच्या योगदानाव्यतिरिक्त, सेठना यांनी अधूनमधून इतर नियतकालिकांमध्ये लेख प्रकाशित केले आणि श्रीअरविंद आणि श्रीमाताजी, पूर्णयोग, कविता, विज्ञान, तत्त्वज्ञान, प्राचीन भारतीय इतिहास आणि इतर विषयांवर पन्नासहून अधिक पुस्तके लिहिली. लाइट अँड लाफ्टर या पुस्तकामध्ये त्यांची विनोदबुद्धी दिसून येते. []

निधन

[संपादन]

२९ जून २०११ रोजी वयाच्या १०६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. [] []

साहित्य

[संपादन]
  • पी. राजा (2018), केडी सेठना . नवी दिल्ली, साहित्य अकादमी. आयएसबीएन 9788126052837

आंशिक ग्रंथसूची

[संपादन]
  • लाइट अँड लाफ्टर
  • टॉक्स ऑन पोएट्री
  • इंडिया अँड द वर्ल्ड सीन
  • द इंडियन स्पिरिट अँड द वर्ल्डस फ्युचर
  • अल्टार अँड फ्लेम
  • द मदर, पास्ट - प्रेजेंट - फ्युचर
  • ऑब्सक्यूर अँड द मिस्टिरियस
  • द प्रोब्लेम ऑफ आर्यन ओरिजिन्स  
  • ओव्हरहेड पोएट्री
  • द पासिंग ऑफ श्रीऑरोबिंदो, १९५१
  • श्रीऑरोबिन्दो ऑन शेक्सपियर  
  • श्रीऑरोबिन्दो - द पोएट
  • द ऑब्स्क्युअर अँड द मिस्टीरियस : अ रिसर्च इन मल्लरमेज सिम्बोलिस्ट पोएट्री   
  •   टेलहार्ड दे चार्डिन अँड श्री ऑरोबिंदो  - अ फोकस ऑन फंडामेंटल्स, भारतीय विद्या प्रकाशन, वाराणसी, १९७३
  • द स्पिरिच्युॲलिटी ऑफ द  फ्युचर. 
  • द व्हिजन अँड वर्क ऑफ श्रीऑरोबिंदो   
  •   प्रॉब्लेम्स ऑफ एन्सिएंट इंडिया, २०००, आदित्य प्रकाशन, न्यू दिल्ली,
  • एन्सिएंट इंडिया इन अ न्यू  लाईट, आयएसबीएन 978-8185179124

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "A Centenary Tribute to Amal Kiran : Read online". Sri Aurobindo and The Mother (इंग्रजी भाषेत). 2022-12-21 रोजी पाहिले.
  2. ^ P. Raja (2018), pp. 10-12
  3. ^ P. Raja (2018), pp. 13-21
  4. ^ P. Raja (2018), pp. 22-45
  5. ^ P. Raja (2018), p. 47
  6. ^ P. Raja (2018), p.6, 65
  7. ^ D.A. (6 December 2004). "Celebrating a century: A genius celebrates his first hundred years". 12 April 2005 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 April 2013 रोजी पाहिले.
  8. ^ P. Raja (2018), p.66

बाह्य दुवे

[संपादन]