सदस्य चर्चा:अश्विनी सुर्वे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत अश्विनी सुर्वे, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन अश्विनी सुर्वे, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९५,७१५ लेख आहे व २८२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) १३:३८, २८ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]

चर्चा:विदर्भ एक्सप्रेस[संपादन]

नमस्कार,

विदर्भ एक्सप्रेस लेखातील काही बदल आपणाकडून अनवधानाने होत असण्याची शक्यता वाटते, या संदर्भाने चर्चा:विदर्भ एक्सप्रेस येथील चर्चा अभ्यासावी,काही शंका असल्यास चर्चेत सहभागी व्हावे अशी नम्र विनंती आहे.

आपल्या आवडीचे लेखन आणि वाचन होत राहो ही शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:३४, १५ नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]

धन्यवाद[संपादन]

आपल्या शुभेच्छासाठी धन्यवाद!! अश्विनी सुर्वे

लेखसंख्या[संपादन]

नमस्कार,

आपण किती लेख लिहीले ती संख्या प्रदर्शित करण्यासाठीचा एखादा मॅक्रो असल्याचे मला माहिती नाही परंतु तुमच्या सदस्यनावाखाली किती लेख तयार केले गेले ही माहिती या पानावर मिळू शकते. एखाद्या महिन्यात तुम्ही योगदान केले असल्यास त्या महिन्याच्या माहितीत तो उल्लेख असेल, उदा. सदस्य katyare यांनी ऑक्टोबरमध्ये एक तर एकूण १,०५२ नवीन लेख सुरू केले.

ही संख्या दाखविण्यासाठी मराठी विकिपीडियावर अजून संकेत नाही. तुम्ही यासाठी एखादा साचा तयार केल्यास तोच किंवा तसाच वापरून नवीन पायंडा पाडता येईल.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०८:३२, ७ जानेवारी २०१५ (IST)[reply]

ता.क. सदस्य संतोष दहिवळ यांनी आपल्या सदस्य पानावर दिनदर्शिकेसह लेखनावांचा उल्लेख केला आहे. कदाचित तो तुम्हास उपयोगी पडू शकेल.

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन[संपादन]

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत[संपादन]

नमस्कार अश्विनी सुर्वे,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

अश्विनी, नक्की कोणत्या अवॉर्ड्सबद्दल बोलताय? सदस्यांनी केलेल्या योगदानाबद्दल त्यांना देण्यात येणाऱ्या अवॉर्ड्सबद्दल तर नव्हे? - अभिजीत साठे (चर्चा) २१:०२, २५ जून २०१५ (IST)[reply]

चर्चा - अवॉर्ड[संपादन]

हो बरोबर. माझे योगदान चालूच आहे परंतु अवॉर्ड्स साठी काही वेगळे योगदान द्यावे लागते का असा प्रश्न होता. अश्विनी सुर्व

अश्विनी अवॉर्ड्ससाठी वेगळे योगदान द्यावे लागत नाही. आजवरच्या आपल्या योगदानासाठी मी आपल्याला हा बार्नस्टार देत आहे. असेच संपादन चालू राहो ही अपेक्षा. - अभिजीत साठे (चर्चा) १७:४४, २६ जून २०१५ (IST)[reply]
उप-संपादकाचा बार्नस्टार
अश्विनी सुर्वे

, मराठी विकिपीडियावरील लेखांमधल्या चुका सुधारून लेख दर्जेदार बनवण्यामधील तुमच्या कामगिरीची कदर म्हणून मराठी विकिपीडियाच्या वतीने हा गौरव तुम्हांला प्रदान करण्यात येत आहे.



तुम्ही दोघेही अवॉर्ड्स (Awŏdrs-अवॉड्रस) असे का लिहितां? अवॉर्ड्‌स (Awards) असे लिहिता येणार नाही?. (चर्चा) १९:१६, २६ जून २०१५ (IST)[reply]

अवॉर्ड्स व्यतिरिक्त सदस्यांनी विशिष्ट संपादनसंख्या पार केल्यावर वेगळा वर्ग लावता येतो, उदा. १०० पेक्षा अधिक संपादने.
अभय नातू (चर्चा) १९:५३, २६ जून २०१५ (IST)[reply]
ज, माझ्या लॅपटॉपवर मी लेहिलेला अवॉर्ड्स व तुम्ही लिहिलेला अवॉर्ड्‌स हे दोन्ही शब्द एकसारखेच दिसत आहेत. - अभिजीत साठे (चर्चा) २२:०६, २६ जून २०१५ (IST)[reply]


धन्यवाद अभिजीत साठे आम्हास दिलेल्या बार्नस्टार बदद्ल. अश्विनी सुर्वे १०:५०, २७ जून २०१५

ज, आपण सुचविलेल्या शब्दाचा नक्की विचार करीन. धन्यवाद अश्विनी सुर्वे १०:५०, २७ जून २०१५


धन्यवाद अभय नातू, आपण दिलेल्या माहितीबदद्ल...अश्विनी सुर्वे ११:००, २७ जून २०१५

नवे लेख[संपादन]

अश्विनी, एखादा नवा लेख बनवण्यापूर्वी तो येथेच आधीच अस्तित्वात आहे की नाही हे तपासावे. ह्यामुळे आपले duplication efforts वाचतील. एअर न्यू झीलंड हा लेख आधीच तयार आहे. त्याचबरोबर आपण तयार केलेल्या लेखांमध्ये एकही दुवा किंवा वर्गीकरण नसते. कृपया असे करणे टाळावे. - अभिजीत साठे (चर्चा) २१:०६, २५ ऑगस्ट २०१५ (IST)[reply]


धन्यवाद अभिजीत साठे (चर्चा), आपण दिलेल्या वरील सूचना मी या पुढील लेखात पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन! अश्विनी सुर्वे ११:१५, ४ ऑगस्ट २०१५

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण[संपादन]

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

मशीनी भाषांतर[संपादन]

नमस्कार! आपण नुकतीच या विकिवर १६६ संपादने पूर्ण केली आहेत याबद्दल आपले प्रथमतः अभिनंदन!आपण या विकिवर चांगली भर घालत आहात. विकिपीडियात आपले योगदान बहुमूल्य आहेच.

दुसरे असे कि,आपण नुकताच इस्लामिक कैलिग्राफी हा एक मोठा नविन लेख तयार केला आहे त्याबद्दलही आपले अभिनंदन.तो लेख मशीनी भाषांतर केलेला आहे असे वाटत आहे. तो लेख वाचतांना नीट अर्थबोध होत नाही. त्यातली वाक्ये / वाक्यांश नीट समजत नाहीत. आपणास विनंती करण्यात येते कि आपण या लेखात व यापूर्वी मशीनी भाषांतर केलेल्या अन्य लेखात योग्य ते बदल करावेत जेणेकरुन तो/ते लेख वाचनीय होतील.

या संदेशाचा हेतू आपणास निरुत्साह करणे किंवा आपले दोष दाखविणे हा नसून उलट, आपण करीत असणारे काम चांगल्या रितीने व्हावे यासाठी प्रोत्साहन देणे असा आहे. कृपया गैरसमज करु नये ही विनंती.

आपणास हवा असल्यास साचा:सदस्यचौकट पुणेकर हा साचा बघावा व आपल्या सदस्यपानावर लावावा.

--वि. नरसीकर (चर्चा) ११:१५, २७ ऑक्टोबर २०१६ (IST)[reply]


अभिनंदन[संपादन]

नमस्कार अश्विनी सुर्वे,

मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून आपण मराठी भाषेचे भवितव्य उज्वल करण्यात अमूल्य योगदान केले आहे. मराठी विकिपीडियावर १०० पेक्षा अधिक संपादने पार पाडल्याबद्दल आपले अभिनंदन. मराठी विकिपीडियावरील आपला संपादन कालावधी अधिक सहज आणि भरीव ठरण्यात आपणास सहयोग मिळावा यासाठी खालील पानांपकडे आपल्या सवडीने दृष्टीक्षेप टाकावा ही नम्र विनंती.

उपयोगी पाने


विकिपीडीया एक सहयोगाने पुढे जाणारे संकेत स्थळ आहे. विकिपीडियात हवे असलेले लेख माहिती तसेच करावयाच्या गोष्टीं नोंदवल्यात आणि संबधीत प्रकल्पात समन्वय आणि मराठी विकिपीडियावर संपादने करण्याबद्दल आपल्या परिचितांनाही सांगून प्रवृत्त केल्यस, तुमच्या एकट्यावर येणारा संपादनांचा भार हलका होईल आणि कामही कसे फत्ते होईल हे पहाता येईल काय, या बद्दल अवश्य विचार करा.
मराठी विकिपीडियावरील उपलब्ध सहाय्य पानांबद्दलचा आपला अभिप्राय चावडीवर आवर्जून नमूद करावा.
आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!
विकिपीडिया मदतचमू
~~~~

धन्यवाद वि. नरसीकर (चर्चा) आपण दिलेल्या माहितीबदद्ल...अश्विनी सुर्वे

इस्लामिक कैलिग्राफी या लेखात वाचतांना नीट अर्थबोध होईल असे योग्य बदल मी करेन. २:३०, २८ ऑक्टोबर २०१६

विकिपीडिया मदतचमू

मराठी विकिपीडियावरील उपलब्ध सहाय्य पानांबद्दल माहिती दिल्याबद्दल आपले मन:पूर्वक आभार अश्विनी सुर्वे

वुएलिंग[संपादन]

वुएलिंग ला लेख छान झाला आहे.शुभेच्छा.

--वि. नरसीकर (चर्चा) ११:२२, ११ नोव्हेंबर २०१६ (IST)[reply]

मराठी भाषा गौरव दिन[संपादन]

नमस्कार व महाजालावर मराठी भाषेच्या वाढीस हातभार लावल्याबद्दल धन्यवाद! मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 27th Feb Marathi gaurav din टायवीन२२४०माझ्याशी बोला १३:५१, २७ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

नमस्कार, कृपया आपल्या संपादनात lovelocal या संकेतस्थळाचा संदर्भ म्हणून नियमित वापर दिसून येतो, जे की एक ई-वाणिज्य स्वरूपाचे संकेतस्थळ आहे. आपणास माहीत आहे की, अनेक वेळा तो संदर्भ उडवण्यात आलेला आहे. तेव्हा विनंती आहे की, कृपया परत lovelocal चा दुवा येथे वापरण्यात येऊ नये.

संतोष गोरे (💬 ) १५:५८, ११ जून २०२१ (IST)[reply]

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.