Jump to content

चर्चा:विदर्भ एक्सप्रेस

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोस्ट (करणे )

[संपादन]

कोस्ट (करणे )- हा शब्द जहाजांच्या बाबतीत वापरल्या जातो. जेंव्हा जहाज किनाऱ्यानजिक येते,(किनाऱ्यापासून ते थोड्या अंतरावर असते) तेंव्हा त्याचे इंजिन बंद केल्या जाते. त्याच्या गतीमुळे व त्याच्या वजनामूळे ते इंजिनाच्या ताकतीशिवाय संथपणे किनाऱ्याजवळ येते. त्यास 'कोस्ट करणे' असे म्हणतात. थोडक्यात,'कोस्ट' म्हणजे इंजिनाच्या ताकतीविना पूर्वी प्राप्त केलेल्या मोमेंटमने पुढे सरकणे.(भूप्रदेशात रोलिंगने पुढे जाणे)


अभय नातू (चर्चा) ०६:२४, १३ नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]


प्रशासकांशी चर्चा केल्याशिवाय त्यांची आवृत्ती उलटविणे बरोबर कृती नाही. सध्या येथे सर्वात उच्च अधिकारी आहेत असा माझा समज आहे.--वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १८:२७, १५ नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]

धन्यवाद नरसीकरजी. प्रशासकांचे नव्हे तर कोणत्याही सदस्याचे बदल अचानक उलटवणे ठीक नाही. अर्थात, खोडसाळपणे केले गेलेले बदल, निनावी बदल, उत्पात, पुनःपुन्हा केले जाणारे बदल उलटवलेलेच ठीक.
आपल्या निनावी मित्राचा बदल उलटवताना मी कारण दिले होते की येथे coast म्हणजे किनारा, तट, इ अर्थ अपेक्षित नाही. आपल्या निनावी मित्राने दोन-तीनदा बदल उलटवताना कोणतेच कारण दिलेले नाही.
अभय नातू (चर्चा) २०:४२, १५ नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]


संस्कृत शब्द "समधिसर्पति { समधिसृप् }" असा काही आढळतो आहे.मराठी पर्यायात १)पार्श्वदोलन २) घसरणे, ३) सरकणे ४)सटकणे ५)ढळणे ६)लाटण ७)लोटण ८)लोठण ९)लोळण १०)वेल्हन ११)चाकाळणे १२) सुळकणे १३) घरंगळणे १४) गरंगळणे १५)गरारा (मोल्सवर्थ) १६)गिरगिरणे (मोल्सवर्थ)१७) कलंडणे (मोल्सवर्थ)१७)घुळणें (मोल्सवर्थ)१८) रुळते (मोल्सवर्थ) वरगळणें, वरंघळणें

पैकी व्यक्तीश: सुळकणे अधीक बरा वाटतो

>>हे छोटे अंतर पार करण्यासाठी इंजिन कोस्ट[मराठी शब्द सुचवा] करीत असल्याने आधी एकदम गाडीला ब्रेक लागल्यासारखा तर नवीन प्रकारचा विद्युतप्रवाह मिळायला लागल्यावर जोर लागल्यासारखा धक्का गाडीला बसतो.<<

हे वाक्य सुळकणे लावून खालील प्रमाणे दिसेल

>>हे छोटे अंतर पार करण्यासाठी इंजिन सुळकत असल्याने (हलकेच/सावकाश/जलद घसरत असल्याने) आधी गाडीला एकदम ब्रेक लागल्यासारखा तर, नवीन पद्धतीचा विद्युतप्रवाह मिळायला लागल्यावर जोर लागल्यासारखा धक्का गाडीला बसतो.<<
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:२०, १५ नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]

'घरंगळणे' हा शब्द कसा वाटतो? ते म्हणजे एक प्रकारचे रोलिंगच आहे. मुलतः जहाज किनाऱ्याकडे कोस्ट करतांना, त्याचे नियंत्रण कप्तानाकडे असते.(इतर वेळेत तो नसला तरी जहाजचालन इतर कर्मचारी आटोपतात.)तो अनुभवी असतोच.कोस्ट करण्यापूर्वी जहाजाचा वेग किती ठेवायचा हे तो अनुभवाने ठरवितो.समजा कमी झाला तर इंजिन अल्प काळाकरीता सुरु करावे लागते.तो थोडा आवश्यकतेपेक्षा किंचित जास्तच ठेवण्यात येतो कारण आवश्यक तेथे थांबवायचे झाल्यास मग नांगर टाकण्यात येतो.नांगर टाकण्याने जहाजास अल्पशी, गतीच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने खेच बसते.नांगर किती खाली सोडावयाचा हे सुद्धा अनुभवानेच ठरते.त्याद्वारे नेमके नियंत्रण करून योग्य ठिकाणी जहाज थांबविण्यात येते.यात सुकाणूचा वापरही दिशा वळविण्यास करतात. असो. गाडी चालवितांनाही एॲक्सिलरेटर सोडले तरही अत्यल्प खेच बसते.असेच रेल्वे इंजिनाचेही होते.फक्त त्याचा लवाजमा मोठा असल्याने ती रेल्वेगाडीत प्रकर्षाने जाणवते ईतकेच.

सुळकण्यावर(निसटण्यावर) नियंत्रण नसते.ओली साबणाची वडी हातातुन सुळकते.तो मला तेवढा चपखल शब्द वाटत नाही.येथे गतीशी संबंध आहे त्यामुळे गतीवाचक शब्दच योजावयास हवा.इंजिन/जहाज प्रकारात ते पूर्वीच गतिमान असते. त्याच्या गतित फरक पडतो एव्हढेच.साबणाच्या वडीला पूर्वी गति नसते.ती सुळकण्याने प्राप्त होते.माझे मत मी मांडले.अर्थात सर्वानुमते जे योग्य वाटेल तेच.--वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १०:३७, १६ नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]


>>इंजिन/जहाज प्रकारात ते पूर्वीच गतिमान असते. त्याच्या गतित फरक पडतो एव्हढेच.साबणाच्या वडीला पूर्वी गति नसते.ती सुळकण्याने प्राप्त होते.<<
आपले उपरोक्त विश्लेषण योग्य वाटते.आज to roll शब्दावर शोध घेतल्यानंतर सरकारी परिभाषाकोशात पार्श्वदोलन ते चाकाळणे असे बरेच अजून शब्द नजरेस आले ते वर जोडले.आपण म्हणता तसे घरंगळणे नक्कीच विचार करण्या जोगा आहे अजून काय मते येतात ते पाहूयात

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:२६, १६ नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]

  • >>हे छोटे अंतर पार करण्यासाठी इंजिन घरंगळत असल्याने आधी गाडीला एकदम ब्रेक लागल्यासारखा तर, नवीन पद्धतीचा विद्युतप्रवाह मिळायला लागल्यावर जोर लागल्यासारखा धक्का गाडीला बसतो.<<


  • शब्द अनेक आहेत पण इंग्रजी शब्दातील नेमका भावार्थ प्रगट करणारा,तो शब्द नसल्यास,त्या अर्थाचे जवळपास पोचणारा शब्द हवा असे माझे मत आहे.इंग्रजीतील'रोलिंग' चाके असणाऱ्या वाहनांसाठी वापरल्या जातो. जहाजाला चाके नसतात.
>>'कोस्ट' म्हणजे इंजिनाच्या ताकतीविना पूर्वी प्राप्त केलेल्या मोमेंटमने पुढे सरकणे.(भूप्रदेशात रोलिंगने पुढे जाणे)<< या माझ्या वर प्रथम मांडलेल्या वाक्यावरही लक्ष द्यावे ही विनंती.

--वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १६:२२, १६ नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]

हो आपल म्हणण बरोबर आहे.इतर शब्द नमूद करण्याचा उद्देश सापेक्ष अर्थछटा अधिक सुस्पष्ट होण्यास मदत होते एवढेच. जहाज बोटींच्या बाबतीत कोस्ट होते ला तटी जाते वापरता येऊ शकत, इंग्रजीत रेल्वेकरता 'कोस्ट होणे' हा पाण्यातला शब्द काढून, जमिनीवरील रूळांवर आपण स्विकारतो पण मराठीत 'रेल्वे तटी जाते' असे म्हणणे बरोबर वाटत नाही.'रूळणे' हा शब्द मराठीत सध्या आपण पुढे जाण्याकरता वापरत नाही पण मोल्सवर्थनुसार पुढे जाण्याच्या अर्थाने तो मराठीत पुर्वी वापरला गेलेला असावा असे वाटते पण रेल्वे नेहमीच रूळावरून जाते म्हणून येथे रूळते शब्द वापरणे प्रशस्त होणार नाही.
>>हे छोटे अंतर पार करण्यासाठी इंजिन घरंगळत असल्याने आधी गाडीला एकदम ब्रेक लागल्यासारखा << भौतिकशास्त्राचा विचार करता या वाक्यास कुठेतरी पुर्नरचनेची आवश्यकता वाटते. 'घरंगळते म्हणून ब्रेक लागल्यासारखा धक्का बसतो' हे सुसंगत वाटत नाही.समोर उंचवटा येऊन गतिस अडथळा न आल्यास घरंगळणारी वस्तु सावकाश थांबते घरंगळणाऱ्या वस्तूला स्वत:ला धक्का लागणार नाही, तरी सुद्धा अशा वस्तु वर आरूढ माणसांनी सुद्धा गती घेतलेली असते त्या गतीस अडथळा आल्यामुळे ब्रेक लागल्या सारखा धक्का जाणवतो असे असावे.उर्ध्वदोलन सारखा दोलन शब्दाला काही अजून प्रत्यय शोधता आल्यास अभिप्रेत अर्थाच्या कदाचित अधिक जवळ पोहोचेल पण फार संस्कृत प्रचूर होईल म्हणून घरंगळणे ठिक वाटते.कदाचित गरंगळणे हे शब्दरूप वापरून पहाता येईल >>>>हे छोटे अंतर पार करण्यासाठी इंजिन गरंगळत असल्याने आधी गाडीला एकदम ब्रेक लागल्यासारखा << घरंगळणे शब्द वापरावयास हरकत नाही पण वाक्यरचनेत कदाचित सुधारणेस अजून वाव आहे असे वाटते.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:३३, १७ नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]
  • आपली चर्चा कोस्ट बद्दल आहे.वाक्यरचनेत हवे तेवढे बदल करता येउ शकतात.मुळ शब्द ठरवावा मग वाक्य तयार करता येईल.
  • दुसरे असे कि आपण दोघे-तीघेच चर्चा करीत आहोत.यात दुसरे कुणी कुदत नाही काय? नाहीतर इतर चर्चेत रांग लागते.

--वि. नरसीकर (चर्चा • योगदान) २०:०९, १७ नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]

अहो आता चर्चा पुरे. कोणताही शब्द वापरा, भा.पो. झाल्याशी कारण!! - अभिजीत साठे (चर्चा) २०:३७, १७ नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]

--अश्विनी सुर्वे मला मराठी शब्द सुचत नसल्याकरणाने ही चुक झाली. पण आपण सुचवलेला शब्द अगदी अचूक आहे. धन्यवाद.