वुएलिंग
वुएलिंग ही स्पेनची किफायतशीर विमानकंपनी आहे. हिचे मुख्य केंद्र बार्सिलोना येथे आहे. या कंपनीचे नाव वुएलो (विमान) या स्पॅनिश शब्दावरून आहे. हिचे मुख्यालय बार्सेलोना महानगरात असून मुख्य तळ बार्सेलोना-एल प्रात आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि रोमच्या लिओनार्दो दा विंची आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहेत.
इतिहास
[संपादन]या विमान कंपनीची स्थापना फेब्रुवारी २००४ मध्ये झाली आणि १ जुलै २००४ रोजी बार्सेलोना ते इबिझा या शहरांदरम्यान पहिली विमानसेवा सुरू झाली. वुएलिंगने सुरुवातीला दोन एरबस ए३२० प्रकारची विमाने वापरून बार्सेलोना ते ब्रसेल्स, इबिझा, पाल्मा दे मायोर्का आणि पॅरिस शहरांदरम्यान विमानसेवा चालू केली.[१]
वुएलिंगने २००५ मध्ये माद्रिद-बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तर २००७ पॅरिस आणि २००९ मध्ये सेव्हियापासून सेवा सुरू केली.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
२००८ मध्ये या कंपनीत स्पॅनिश क्लिक एर समाविष्ट झाली. क्लिकएरचे आलेक्ष क्रुज हे या एकत्रीकरण झालेल्या विमान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले.[२] दि.१५ जुलै २००९ रोजी या दोन विमान कंपनीचे एकत्रीकरण कायदेशीर पूर्ण झाले आणि नवीन कंपनी वुएलिंग ब्रँडने सुरू झाली.[३]
सन २००९ मध्ये ५० ठिकाणी ८.२ मिल्लियन प्रवासी वाहतूक करणारी स्पेन मधील दोन क्रमांकाची ही विमान कंपनी ठरली.[४]
जानेवारी २०११ मध्ये नवीन ९ विमाने खरेदी करण्याची घोषणा केली. त्यापैकि ६ विमाने एप्रिल ते जून २०११ चे दरम्यान ताब्यात आली आणि राहिलेली दोन २०११ चे शेवटी मिळाली.२१ मार्च २०१२ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी आलेक्ष क्रुज यांनी रोम हे नवीन बेस निर्माण करण्याची घोषणा केली. दि.२५ मार्च २०१२ रोजी त्याचे उद्घाटन झाले आणि तेथे एक विमान तैनात केले. रोम मध्ये आत्तापर्यंत अनेक आगमन ठिकाणे निर्माण झाली आहेत.
दि.५ डिसेंबर २०१२ रोजी या विमान कंपनीने फ्लोरेंस येथे बेस निर्माण करण्याची घोषणा केली आणि तेथे एक विमान ठेवून युरोप मधील नवीन चार ठिकाणी विमान सेवा सुरू केली. दि.२५ ऑक्टोबर २०१३ रोजी म्हणजे १० महिन्यांनंतर या कंपनीने फ्लोरेन्स ते कटणीय ही इटलीतील पहिली स्थानिक विमान सेवा सुरू केली.
नोव्हेंबर २०१३ पासून या कंपनीने सतत बार्सिलोना केंद्राचे विकासाचा मार्ग अवलंबिला. ६ नोव्हेंबर २०१३ रोजी ब्रुसेल्स येथे केंद्र सुरू करण्याची घोषणा केली आणि येथे एक विमान ठेवून पुर्वीचे चार मार्गाबरोबरच मे २०१४ पासून नवीन ७ मार्ग सुरू केले. शिवाय नोव्हेंबर २०१३ मध्ये रोम-फिउमिकीनो केंद्र निर्माण केले.
सन २०१४ चे मध्यापासून तेथून ३० विमान मार्ग अस्तित्वात आले. त्यांचे हे बार्सिलोना नंतरचे दुसरे क्रमांकाचे केंद्र ठरले. कंपनीचे संकल्पनाचे पुंनर्रजीवन करण्यासाठी आणि व्यवस्थापनातील कांही बदल घडविण्यासाठी ऑक्टोबर २०१६ मध्ये या कंपनीने ब्रुसेल्स,कटणीय,पालेर्मो ही केंद्रे बंद केली.
करार
[संपादन]वुएलिंगचे खालील कंपन्यांशी व्यापारी करार आहेत -
विमान ताफा
[संपादन]
ऑगस्ट २०२५ च्या सुमारासची व्ह्युएलिंगची विमाने:[५][६]
| विमान | सेवेत | आदेश | प्रवासी | नोंदी |
|---|---|---|---|---|
| एरबस ए३१९-१०० | ६ | — | १४४ | |
| एरबस ए३२०-२०० | ९२ | — | १८० | |
| १८६ | ||||
| एरबस ए३२०निओ | २२ | — | १८६ | |
| एरबस ए३२१-२०० | १८ | — | २२० | |
| एरबस ए३२१निओ | ४ | — | २३६ | |
| बोईंग ७३७ मॅक्स २०० | — | २५ | २०० | २०२६ पासून वितरण.[७] १०० पर्यायांसह आदेश.[८] |
| बोईंग ७३७ मॅक्स १० | — | २५ | २३० | |
| एकूण | १४२ | ५० | ||
अपघात आणि दुर्घटना
[संपादन]- १६ जुलै २०१५ रोजी इबिझा येथून बार्सेलोनाकडे जाणाऱ्या व्युलिंग विमानाचे इंजिन उड्डाणादरम्यान निकामी झाल्याने एल प्रात विमानतळावर तातडीने उतरवण्यात आले. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही आणि विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले.[९]
- २९ सप्टेंबर २०२१ रोजी बार्सेलोनाहून म्युनिकला जाणाऱ्या विमानाच्या वैमानिक कक्षात धूर दिसल्याने ते पॅरिसला उतरवण्यात आले.[१०]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "वूईलिंग एअरलाइन्सचा इतिहास".
- ↑ "वूईलिंग आणि स्पॅनिश क्लिक एयर यांनी विलीन होण्यास सहमति दिली". 2012-02-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-11-11 रोजी पाहिले.
- ↑ "यूके तील हवाई परिवहन मधील एक नवीन नाव". 2017-01-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-11-11 रोजी पाहिले.
- ↑ "वूईलिंग एअरलाइन्सची सेवा". 2013-07-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-11-11 रोजी पाहिले.
- ↑ "Orders and Deliveries | Airbus". www.airbus.com. ३ एप्रिल २०२४. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Vueling Fleet Details and History". planespotters.net. २९ एप्रिल २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Vueling to become IAG's first Boeing 737 Max operator". flightglobal.com. १ ऑगस्ट २०२५.
- ↑ चुका उधृत करा:
<ref>चुकीचा कोड;:0नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ↑ "Vueling engine failure forces emergency landing in Barcelona". catalannews.com. १६ जुलै २०१५. २९ एप्रिल २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Vueling flight to Munich diverted to Paris due to smoke in cockpit". aviation24.be. २९ सप्टेंबर २०२१. २९ एप्रिल २०२६ रोजी पाहिले.[permanent dead link]