युएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| स्थापना | इ.स. १९६० |
|---|---|
| प्रदेश | युरोप (युएफा) |
| संघांची संख्या | ५२ (पात्रता फेरी) १६ (अंतिम स्पर्धा) |
| सद्य विजेते | |
| सर्वाधिक विजय | (३ वेळा विजेते) |
युएफा यूरो फुटबॉल अजिंक्यपद (इंग्रजी: UEFA European Football Championship) ही युरोप खंडामधील देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांची एक स्पर्धा आहे. युएफा ही युरोपियन फुटबॉल संस्था दर ४ वर्षांनी ह्या स्पर्धेचे आयोजन करते. इ.स. १९६० साली पहिली यूरो स्पर्धा खेळवली गेली. ह्या स्पर्धेत युरोपातील १६ देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ भाग घेतात. दर स्पर्धेआधी प्रदीर्घ पात्रता फेऱ्या खेळवण्यात येतात ज्यांमधून हे १६ संघ निवडले जातात. यूरो २००८ जिंकणारा स्पेन हा सद्य विजेता देश आहे.
आजवर खेळवण्यात आलेल्या १३ स्पर्धांपैकी जर्मनीने ३, फ्रान्स व स्पेन देशांनी २ वेळा तर इटली, चेकोस्लोव्हाकिया, नेदरलॅंड्स, डेन्मार्क, ग्रीस व सोव्हियेत संघ देशांनी एकवेळा अजिंक्यपद मिळवले आहे.
पुढील यूरो स्पर्धांचे आयोजन २०१२ साली पोलंड-युक्रेन तर २०१६ मध्ये फ्रान्स हे देश करतील.
[संपादन] मागील विजेते
१तिसऱ्या स्थानासाठीचा सामना खेळवण्यात आला नाही.
- की:
- एटा — एक्स्ट्रा टाईम नंतर
- पेशू — पेनल्टी शूटआउट
[संपादन] बाह्य दुवे
|
|||||
|
|||||||||||||||||||||||||||||