फिफा जागतिक क्रमवारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फिफा जागतिक क्रमवारी (FIFA World Rankings) ही जगातील राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघांची गुणवत्तेनुसार क्रमवारी ठरवण्याची एक पद्धत आहे. डिसेंबर १९९२ सालापासून सुरू असलेल्या ह्या क्रमवारीमध्ये प्रत्येक संघाला त्याच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनानुसार गूण मिळतात. सर्वाधिक गूण मिळवणारा संघ क्रमवारीमध्ये अव्वल क्रमांकावर पोचतो. आजवर आर्जेन्टिना, जर्मनी, ब्राझील, स्पेन, नेदरलँड्स, इटलीफ्रान्स ह्या सात संघांनी क्रमवारीमध्ये अव्वल क्रमांक गाठला आहे.

जागतिक फुटबॉल एलो गुणांकन ही एलो गुणांकन पद्धतीवर आधारित क्रमवारी देखील फुटबॉल संघांसाठी वापरली जाते.

सद्य क्रमवारी[संपादन]

१० एप्रिल २०१४ रोजी क्रमवारीमधील पहिले २० संघ

क्रम संघ गूण
1 स्पेनचा ध्वज स्पेन 1460
2 जर्मनीचा ध्वज जर्मनी 1340
3 पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल 1245
4 कोलंबियाचा ध्वज कोलंबिया 1186
5 उरुग्वेचा ध्वज उरुग्वे 1181
6 आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना 1174
6 ब्राझीलचा ध्वज ब्राझील 1174
8 स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड 1161
9 इटलीचा ध्वज इटली 1115
10 ग्रीसचा ध्वज ग्रीस 1082
11 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 1043
12 बेल्जियमचा ध्वज बेल्जियम 1039
13 Flag of the United States अमेरिका 1015
14 चिलीचा ध्वज चिली 1011
15 Flag of the Netherlands नेदरलँड्स 967
16 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स 935
17 युक्रेनचा ध्वज युक्रेन 913
18 रशियाचा ध्वज रशिया 903
19 मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको 876
20 क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया 871
Fifa.com

बाह्य दुवे[संपादन]