फ्रेंच ओपन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रेंच ओपन
Frenchopen.svg
शहर पॅरिस
फ्रान्स ध्वज फ्रान्स
मैदान स्ताद रोलां गारो
मैदान प्रकार क्ले / आउटडोअर
पुरूष १२८ एकेरी / १२८ पात्र / ६४ दुहेरी
महिला १२८ एकेरी / १२८ पात्र / ६४ दुहेरी
विजयराशी १७,५२०,०००
संकेतस्थळ
ग्रँड स्लॅम स्पर्धा

फ्रेंच ओपन (फ्रेंच: Les internationaux de France de Roland-Garros) ही फ्रान्सच्या पॅरिस शहरात भरवली जाणारी एक वार्षिक टेनिस स्पर्धा आहे. फ्रेंच ओपन ही टेनिस जगतातील चार महत्त्वाच्या व मानाच्या ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी एक आहे. दोन आठवडे चालणारी ही स्पर्धा पॅरिसच्या १६व्या जिल्ह्यातील स्ताद रोलां गारो ह्या क्रीडासंकुलात दरवर्षी मे व जून महिन्यांदरम्यान भरवली जाते. १९२८ सालापासून फ्रेंच ओपन ह्याच ठिकाणी खेळवली गेली आहे व लाल मातीच्या कोर्टावर खेळली जाणारी ही एकमेव ग्रँड स्लॅम आहे.

ह्या स्पर्धेची सर्वात पहिली आवृत्ती पुरुषांसाठी १८८१ साली तर महिलांसाठी १८८७ साली खेळवली गेली व केवळ फ्रेंच टेनिसपटूच ह्यात भाग घेऊ शकत असत. १९२५ साली ही स्पर्धा सर्व आंतरराष्ट्रीय टेनिसपटूंसाठी उपलब्ध झाली तर १९६८ सालापासून फ्रेंच ओपन स्पर्धा खुली करण्यात आली ज्यात व्यावसायिक व हौशी ह्या दोन्ही प्रकारचे खेळाडू भाग घेऊ लागले. आजच्या घडीला फ्रेंच ओपनमध्ये पुरुष एकेरी व दुहेरी, महिला एकेरी व दुहेरी, मिश्र दुहेरी, मुले, मुली तसेच व्हीलचेअर स्पर्धांचे आयोयन केले जाते.

येथील वैशिष्ट्यपूर्ण मातीच्या कोर्टमुळे फ्रेंच ओपन स्पर्धेला एक वेगळे वलय प्राप्त झाले आहे. येथील सामने शारिरिक दृष्ट्या सर्वात खडतर व दमवणारे मानले जातात. मातीवर आदळल्यानंतर टेनिस बॉलचा वेग कमी होतो ज्यामुळे वेगवान सर्व्हिस करणारे खेळाडू येथे निष्प्रभ ठरतात. इतर कोर्टांच्या मानाने संथ गतीने परंतु अधिक उंच उसळणारा बॉल परतवणे अनेक खेळाडूंना जमत नाही. ह्यामुळे आजवर जॉन मॅकएन्रो, पीट सॅम्प्रास, बोरिस बेकर, स्टीफन एडबर्ग, मारिया शारापोव्हा, व्हीनस विल्यम्स इत्यादी अनेक मातब्बर व यशस्वी टेनिसपटूंना फ्रेंच ओपन जिंकणे जमलेले नाही. विक्रमी १७ एकेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणार्‍या रॉजर फेडररला फ्रेंच ओपन विजेतेपद केवळ एकदाच मिळाले आहे. संथ कोर्टासाठी साजेशी शैली असणारे ब्यॉन बोर्ग, रफायेल नदाल, इव्हान लेंडल, जस्टिन हेनिन इत्यादी टेनिसपटूंना मात्र येथे प्रचंड यश मिळाले आहे.

विजेते [संपादन]

खुल्या युगात (१९६८ नंतर) ही स्पर्धा पुरुष एकेरीमध्ये ब्यॉन बोर्गरफायेल नदाल ह्या टेनिसपटूंनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ७ वेळा) तर महिला एकेरीमध्ये ख्रिस एव्हर्टने सात वेळा जिंकण्याचा विक्रम केला आहे. भारताच्या लिअँडर पेसने पुरुष दुहेरीमध्ये फ्रेंच ओपनचा चषक विक्रमी ३ वेळा उचलला आहे.

२०११ मधील विजेते [संपादन]

स्पर्धा विजेता उप-विजेता स्कोर
पुरुष एकेरी स्पेन रफायेल नदाल स्वित्झर्लंड रॉजर फेडरर 7–5, 7–6(7–3), 5–7, 6–1
महिला एकेरी चीन ना ली इटली फ्रांचेस्का स्कियाव्होनी 6–4, 7–6(7–0)
पुरुष दुहेरी कॅनडा डॅनियेल नेस्टर
बेलारूस मॅक्स मिर्न्यी
कोलंबिया हुआन सेबास्तियन काबाल
आर्जेन्टिना एदुरादो श्वांक
7–6(7–3), 3–6, 6–4
महिला दुहेरी चेक प्रजासत्ताक आंद्रेया ह्लावाकोव्हा
चेक प्रजासत्ताक ल्युसी ह्रादेका
भारत सानिया मिर्झा
रशिया एलेना व्हेस्निना
6–4, 6–3
मिश्र दुहेरी ऑस्ट्रेलिया केसी डेलाका
अमेरिका स्कॉट लिप्स्की
स्लोव्हेनिया कातारिना स्रेबोत्निक
सर्बिया नेनाद झिमोंजिक
7–6(8–6), 4–6, [10–7]

बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

गुणक: 48°50′49.79″N 2°14′57.18″E / 48.8471639, 2.2492167

मागील
ऑस्ट्रेलियन ओपन
ग्रँड स्लॅम स्पर्धा
मे-जून
पुढील
विंबल्डन