बूर्गान्य
| बूर्गान्य Bourgogne |
|||
| फ्रान्सचा प्रदेश | |||
|
|||
बूर्गान्यचे फ्रान्स देशामधील स्थान |
|||
| देश | |||
| राजधानी | दिजाँ | ||
| क्षेत्रफळ | ३१,५८२ वर्ग कि.मी. | ||
| लोकसंख्या | १६,३८,५८८ | ||
| घनता | ५२ प्रति वर्ग कि.मी. | ||
| संकेतस्थळ | bourgogne.fr | ||
बूर्गान्य (फ्रेंच:
Bourgogne ; इंग्लिश लेखनभेदः Burgundy, बरजंडी) हा फ्रान्स देशाच्या २७ प्रदेशांपैकी एक प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या मध्य-पूर्व भागात स्थित असून तो ऐतिहासिक बरजंडी प्रांताचा एक भाग आहे.
कृषीप्रधान व ग्रामीण स्वरूपाच्या बूर्गान्यमध्ये तुरळक लोकवस्ती आहे. येथील लोकसंख्या घटत चालली असून सरासरी वय वाढते आहे. येथील बरजंडी वाइन जगप्रसिद्ध आहे.
इतिहास [संपादन]
इ.स. ४११ मध्ये रोमन साम्राज्य कोसळल्यावर जर्मनीतील बरजंडीयन्स ह्या नावाने ओळखली जाणारी जमात या प्रदेशात आली व त्यांनी येथे आपले राज्य वसवले. त्यांनीच या प्रदेशाला त्याचे नाव दिले. यानंतरच्या काळात आपले राज्य टिकवण्यासाठी त्यांना रोमन व हूण सैन्याशी सतत झुंजावे लागले. इ.स. ९००च्या सुमारास याचे तीन छोट्या राज्यांत विभाजन झाले - लेक जिनिव्हाजवळील अपर बरजंडी, प्रोव्हांस जवळील लोअर बरजंडी व फ्रान्समधील डची ऑफ बरजंडी. अपर व लोअर बरजंडी इ.स. १०३२मध्ये पवित्र रोमन साम्राज्यात विलीन झाले तर फ्रान्सने डची ऑफ बरजंडी इ.स. १००४मध्ये बळकावले.
विभाग [संपादन]
बूर्गान्य प्रशासकीय प्रदेश खालील चार विभागांमध्ये विभागला गेला आहे.
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
|
||||||||