Jump to content

बोरोबुदूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बोरोबदूर

बोरोबुदूर हा इंडोनेशिया स्थित एक बौद्ध विहार आहे. हे जगातील सर्वात मोठे बौद्ध विहार आहे. हे स्थळ बौद्ध स्तूपांसाठी प्रसिद्ध आहे.[]

इसवी सनाच्या नवव्या शतकामध्ये जावामध्ये या स्तूपांचे बांधकाम करण्यात आले आहे.

स्वरूप

[संपादन]
बोरोबुदूर मंदिरात प्रार्थना करताना भिक्खू

बोरोबुदूर येथे असलेले हे मंदिर जगातील सर्वात मोठे बौद्ध मंदिर मानले जाते. याला एकूण ९ अधिष्ठान आहेत. त्यापैकी ६ हे आयताकृती आणि उर्वरित ३ वर्तुळाकार आहेत. यामध्ये एकूण ५०४ बुद्धमूर्ती कोरलेल्या आहेत. मध्यभागी असलेल्या मुख्य स्तूपाच्या भोवती एकूण ७२ बुद्धमूर्ती दिसतात.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Miksic, John (2012-11-13). Borobudur: Golden Tales of the Buddhas (इंग्रजी भाषेत). Tuttle Publishing. ISBN 9781462909100.
  2. ^ "Largest Buddhist temple". Gunniess World Records. 9. 11. 2019 रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)